Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलींनी ग्रुप डान्समध्ये केलेल्या स्टेप्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

ह्या मुलींनी ग्रुप डान्समध्ये केलेल्या स्टेप्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

सोशल मीडिया म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एखाद्या डिपार्टमेंट स्टोअर सारखा झाला आहे. इथे आपल्याला मनोरंजक अशा बऱ्याच गोष्टी मिळतात. तसेच आपल्याला स्वतःला व्यक्त व्हायचं असेल तर ते ही करता येतं. इतकंच काय पण आपल्याला अनेक नवनवीन गोष्टी शिकता ही येतात. अर्थात प्रत्येक व्यक्तीनुसार या गोष्टी बदलत असतात. पण एक मात्र खरं की अतिशय सहजपणे अनेक गोष्टी शिकण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे सोशल मीडिया. त्यातून मग असं ही होतं की सोशल मीडियाचा आधार घेत शिकलेली कौशल्यं वापरून अनेक जण स्वतः कंटेंट निर्माण करू लागतात. अनेक वेळेस मोठी इन्फ्लुएन्सर ही होतात.

यांपैकी एक म्हणजे दीपक तुलस्यान हे व्यक्तिमत्त्व. आपल्या पैकी अनेकांना जर डान्स आवडत असेल तर आपण दीपक यांचे काही डान्स व्हिडियोज बघितले असण्याची शक्यता आहे. कारण दीपकजी हे सोशल मीडियावर डान्स व्हिडियोजच्या माध्यमातून सतत कार्यरत असतात. त्यांचा स्वतःचा असा एक डान्स स्टुडियो असून तो दिल्लीस्थित आहे.

हा डान्स स्टुडियो चालवण्यात त्यांना, त्यांच्या सहकारी दीपिका अगरवाल यांचीही मदत होते असं त्यांच्या मुलाखतींतून कळतं. दीपक हे सुमारे २०११ च्या आसपास दिल्लीत आले अस कळतं. त्याआधी दीपक एका छोट्या गावात राहत असत. त्यांच्या मुलाखतींतून असं लक्षात येतं की त्यांच्या वडिलांचे तिथे दुकान होतं. दीपक हे तिथे असेपर्यंत शिक्षण सांभाळून वडिलांना दुकानाच्या कामातही मदत करत असत. पुढे जेव्हा ते दिल्लीला आले तेव्हापासून त्यांचा ओढा हा जास्त करून डान्सकडे राहिला. डान्स क्लासेस सोबतच त्यांनी युट्युब वरील अनेक व्हिडियोज मधून डान्स शिकत आपल्या डान्स कौशल्याला पैलू पाडले. या काळात पार्ट टाइम जॉब करत आपली डान्सची आवड त्यांनी जपली. हा काळ कठीण होता पण दीपक यांनी आपली जिद्द सोडली नाही. तसेच दीपिका यांनीही त्यांना या काळात मदत केली. त्यांच्या या मेहनतीला पुढे फळं मिळत गेली आणि त्यातूनच आज त्यांची डान्स अकादमी आणि दोन युट्युब चॅनेल्स सुरू आहेत असं दिसून येतं. त्यातील एक चॅनेल हे या अकादमीचं असून दुसरं चॅनेल हे त्यांचं वैयक्तिक चॅनेल आहे.

या दोन्ही चॅनेलच्या माध्यमातून दीपक हे मुलांना डान्स शिकवत असतात. अर्थात त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे डान्स परफॉर्मन्स हे आबालवृद्ध सगळ्यांसाठी असतात पण त्यांच्या डान्समध्ये प्रामुख्याने लहान आणि तरुण मुलांमुलींचा समावेश असतो. त्यांचे अनेक व्हिडियोज खूप प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक व्हिडियो आपल्या टीमच्या पाहण्यात आला. या व्हिडियोला आतापर्यंत सवा दोन करोडहुन अधिकांनी पाहिलं आहे. यावरून या व्हिडियोची लोकप्रियता लक्षात यावी. या व्हिडियोत आपल्याला दीपक सर आणि त्यांचे सगळे लहान लहान विद्यार्थी ‘राता लंबियां’ या गाण्यावर परफॉर्मन्स देताना दिसतात. कोरिओग्राफी अर्थातच दीपक यांनी केली असून, डान्स परफॉर्मन्सच्या शेवटी ते स्वतः येऊनही डान्स करून जातात. त्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांनी आधी सादर केलेल्या उत्तम डान्स परफॉर्मन्सला चार चांद लागतात. त्यातील स्टेप्स या सहज पण उठावदार आहेत त्यामुळे चट्कन लक्षात राहतात आणि आपण डान्सचे चाहते असाल तर या स्टेप्स करण्याचा मोह आपल्याला जरूर होतो. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही हे वाटलं असणारच. आपण जर हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर पहा आणि उत्तम डान्सचा आनंद घ्या.

तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला आजचा लेख. उदयोन्मुख कलाकारांविषयी आपल्या वाचकांना माहिती मिळावी हा आपल्या टीमचा उद्देश असतो. त्यातच आज वर उल्लेख केलेला डान्स व्हिडियो बघितला. यातूनच मग हा लेख लिहावा अस वाटलं आणि लेखन केलं गेलं. हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.