Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलीचं मोठ्या बाईंसारखं बोलणं ऐकून हसू आवरणार नाही, बघा क’शी बोलतेय हि मुलगी

ह्या मुलीचं मोठ्या बाईंसारखं बोलणं ऐकून हसू आवरणार नाही, बघा क’शी बोलतेय हि मुलगी

वायरल व्हिडियोज बघणं आपल्या सगळ्यांना आवडतं. खासकरून लहान मुलांचे व्हिडियोज तर खूप भावतात. अगदी लहान असतील तर त्यांच्या बाललीलांनी आपलं मनोरंजन होतं. थोडी मोठी मुलं असतील तर मग त्यांच्या बोबड्या बोलांनी आणि प्रश्न उत्तरांनी आपल्याला हरखून जायला होतं. अजून थोडी मोठी मुलं असतील तर त्यांच्यातील कलागुण आणि अगदी नौटंकीपणा बघून पण मजा येते. आज आपल्या टीमने असाच एक मजेशीर व्हिडियो पाहिला. आजचा लेख त्याविषयीच आहे.

हा व्हिडियो आहे एका छोट्या ताईचा आणि तिने केलेल्या अभिनयाचा. पहिली दुसरीत असावी ही चिमुकली. पण बोलणं आणि अभिनय मात्र अगदी मोठ्या माणसासारखा. त्यातही निरागसपणा नैसर्गिकपणे डोकावतो. त्यामुळे संपूर्ण व्हिडियो मनोरंजक होतो. व्हिडियो ची सुरुवात होते तेव्हा ही छोटी कलाकार साडीच्या वेषात बसलेली असते.

सोबत कॅमेऱ्यामागून कोणीतरी ओळखीचं बसलेलं असतं. बहुतेक आई असावी. तर या दोघींचं बोलणं सुरू होतं. यात ही छोटी एका शेजारणीची भूमिका वठवत असते, असं दिसून येतं. सुरुवातीला हवापाण्याचे विषय निघतात. किती गरम होतंय हे सांगत असताना या छोटीने केलेले हावभाव अगदी मस्तच. तसेच देहबोलीसुद्धा तिच्या वाक्यात चपखलपणे साजेशी वाटेल अशीच. मग कॅमेऱ्यामागून तिच्या साडीचं कौतुक होतं. त्यावरही तिची प्रतिक्रिया किती नैसर्गिकरित्या वठवलेली दिसून येते. खूपच छान. मग मात्र या बोलण्यातला खरा विषय निघतो. ही लुटुपुटूची शेजारीण मीठ मागायला आलेली असते. कारण असतं जेवणाला वडापाव करण्याचा बेत असतो. त्यासाठी दुसऱ्यांकडे जाऊन थोडं मीठ आणल्याची बतावणी ही केली जाते. आता थोडंस कमी पडतंय म्हणून मग मीठ मागितलं जातं. या संपूर्ण संवादात या छोट्या अभिनेत्रीचा वावर इतका सहज असतो की हिचं वय लहान नसतं तर सगळंच खरं वाटलं असतं. त्यांचा संवाद पुढेही चालूच राहतो.

जवळपास तीन मिनिटांचा हा व्हिडियो आहे. पण संपूर्ण तीन मिनिटांत आपलं मनोरंजन अगदी शंभर टक्के होत असतं. त्यात कॅमेऱ्यामागील व्यक्तीही तितक्याच सहजतेने सामील होतात म्हणून व्हिडियोची रंगत वाढत जाते. यातील सवांद ठरवून बोलले गेले आहेत की तत्क्षणी सुचले आहेत ते कळत नाहीत. पण अभिनय आणि संवाद यांची जी उत्तम भट्टी जमून आली आहे त्यास तोड नाही हे खरंय.

मराठी गप्पाच्या टीमला असं वाटलं की हा व्हिडियो वायरल होतो आहे तेव्हा आपण त्याविषयी नक्कीच लिहावं. जेणेकरून आपल्या वाचकांना याचा आनंद लुटता यावा. पण केवळ हाच लेख नाही, तर आम्ही लिहिलेल्या प्रत्येक लेखामागे हीच प्रामाणिक भावना असते. आपणही या भावनेस प्रोत्साहन देता आणि आपले लेख अगदी उत्साहाने आणि मोठ्या संख्येने शेअर करत असता. यात आमचा खरा आनंद सामावलेला आहे. कारण आमच्या लेखांमुळे आपले काही क्षण आनंदात जावेत हीच सदिच्छा !! आपला लोभ यापुढेही कायम असू द्या. मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *