Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलीचा अप्रतिम डान्स पाहून तुम्हीसुद्धा मंत्रमुग्ध व्हाल, बघा हा अप्रतिम परफॉर्मन्स

ह्या मुलीचा अप्रतिम डान्स पाहून तुम्हीसुद्धा मंत्रमुग्ध व्हाल, बघा हा अप्रतिम परफॉर्मन्स

लहान मुलांचे वायरल व्हिडियोज बघणं कोणाला आवडत नाही ? आपण सगळेच या व्हिडियोजचा आनंद घेत असतो. किंबहुना लहान मुलांना त्यांची कला सादर करताना बघणं म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. संपूर्णपणे झोकून देत, आपल्या निरागसतेने ही छोटी मंडळी आपलं मन जिंकून घेतात. हे आज सगळं आठवण्याचं कारण म्हणजे एका सुप्रसिद्ध डान्स रियालिटी शोमध्ये आपल्या सगळ्यांनी बघितलेला एक परफार्मन्स. बरं हा डान्स परफॉर्मन्स आहे सात ते आठ वर्षे जुना. पण त्यातील प्रसन्नता अजूनही ताजी असल्याचं जाणवतं.

हा व्हिडियो आहे डान्स इंडिया डान्स स्पर्धेच्या ऑडिशन प्रक्रिया काळातला. या ऑडिशन्स तेव्हा दिल्ली शहरात चालल्या होत्या. ‘दिलवालो की दिल्ली’ असं जिला म्हणतात त्या दिल्लीतील एक छोटी परी इथे परफॉर्मन्स करणार होती. तिच्या येण्याआधी परीक्षक नेहमीप्रमाणे पुढील स्पर्धकांना बोलवत होते. तिचा नंबर आला आणि ती मंचावर गेली.

एवढ्या छोट्या मुलीला बघून गीता माँ तर आश्चर्यचकितच झाल्या. त्यांच्या देहबोलीतून हे कळून येत होतं. दुसरे परीक्षक ही उत्सुक होते की ही छोटी परी आता काय जादू करणार ते. या चिमुकलीने सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार केला. मग गाणं सुरू झालं आणि जी तिची जादू परिक्षकांवर झाली की विचारू नका. अहो आणि परिक्षकच का? आपणही मंत्रमुग्ध होतो या छोटीचा डान्स बघून. या छोटीचं नाव माही आहे. या माहिच्या डान्स परफॉर्मन्स मध्ये दोन गाणी अंतर्भूत असतात. नगाडे संग ढोल बाजे हे रणवीर आणि दीपिका यांच्या रासलीला चित्रपटातील प्रसिद्ध गाणं. परफॉर्मन्स ची सुरुवात या गाण्याने होते. ही चिमुकली माही सुद्धा गाण्याची मजा घेत असते. त्यामुळे तिचे हावभाव सुद्धा अगदी आनंदी असतात. परिक्षकांमधले अहमद सरांच्या तीक्ष्ण नजरेतून हे सुटत नाही. आपणही कौतुकाने बघत असतो. मग सुरू होतं दुसरं गाणं. ‘हे शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई’ हे राजस्थानी लोकगीत याप्रसंगी कानावर पडतं. एव्हाना तीनपैकी दोन परीक्षक थेट मंचावर दाखक झालेले असतात. हा छोटा रिचार्ज बडा डान्स धमाका बघायला. पण त्याचं दडपण न घेता माही अशी काही नाचते की तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक वाटल्यावाचून राहत नाही.

मग डान्स संपतो आणि परीक्षक काय सांगतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. मंचावरून जाता जाता दोन्ही परीक्षक या छोटीला नमस्कार करतात. तीही अगदी आशिर्वाद देते आणि सगळेच मनमुराद हसतात. पण या व्हिडियोची अर्धी मजा यानंतर सुरू होते. या चिमुकल्या माही ला एक प्रश्न विचारला जातो आणि त्यासाठी ती अहमद सर आणि बाकीच्या परिक्षकांजवळ येते. मग तिच्याच तोंडून तिच्या आई वडिलांना बोलवलं जातं. पण हे तर केवळ निमित्त असतं. या छोट्या सुपर डुपर डान्सरला या शोच्या प्रवासात सामील करून घेतलं आहे हे सांगण्याचं निमित्त. यासाठी तिच्या खांद्यावर मग डान्स इंडिया डान्स चा केप बांधला जातो. सुपरमॅन किंवा सुपरवुमनचा केप असतो तसा. बरं ही छोटी इतकी हुशार की तिला लगेच कळतं की आपल्याला यांनी शोमध्ये घेतलेलं आहे. तिथे मंचावर तिचे आईवडील सुद्धा खुश होत उड्या मारत असतात. तर ईथे ही माही अहमद सरांनी आपल्याला मंचावर घेऊन जावं असं सांगते.

ते सुद्धा तिला उचलून घेऊन मंचावर घेऊन जातात. आपल्याला वाटतं तिला आई वडिलांच्या जवळ जायचं असेल. ते कारण असतंच. पण सोबतच तिला आपला आनंद व्यक्त करत भन्नाट नाचायचं असतं. अहमद सर जसे तिला खाली ठेवतात तशी ती जी नाचायला सुरुवात करते की अहमद सर आणि बाकीचे सगळे परीक्षक अगदी आश्चर्याने आणि आनंदाने बघत असतात. या आनंदाच्या माहोलात हा व्हिडियो संपतो. आज जवळपास सात ते आठ वर्षे झाली, पण या व्हिडियोतील माहीचा डान्स आजही मस्त वाटतो. काही क्षण का होईना आपण यानिमित्ताने आपल्या मागच्या डोकेफोड गोष्टींना मागे ठेवत मनमुराद आनंद लुटुतो. बरं वाटतं.

हा व्हिडियो तर आपण जेव्हा जेव्हा बघितला असेल तेव्हा तेव्हा आपल्याला आवडला असेल हे नक्की. त्याचप्रमाणे या व्हिडियोबद्दलचा हा लेखही आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपण आमच्या मराठी गप्पा टीमला आपले लेख शेअर करत, सकारात्मक कमेंट्स करत प्रोत्साहन देत असता, त्याबद्दल धन्यवाद ! आपला लोभ आमच्या मराठी गप्पाच्या टीमप्रति कायम असावा ही विनंती. मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.