Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलीचा अवघ्या १२ सेकंदाचा व्हिडीओ होतोय वायरल, चिमुकलीचे एक्सप्रेशन्स पाहून तुमचा देखील दिवस बनून जाईल

ह्या मुलीचा अवघ्या १२ सेकंदाचा व्हिडीओ होतोय वायरल, चिमुकलीचे एक्सप्रेशन्स पाहून तुमचा देखील दिवस बनून जाईल

आम्ही मित्रमंडळी मध्ये एकदा फिरता फिरता एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्याच्या घराची नुकतीच साफसफाई झाली असावी, कारण अनेक गोष्टींची जागा बदलल्याचे त्यानं सांगितलं. त्याचा फायदा असा झाला की त्याच्या लहानपणीचे फोटो असणारे अल्बम जवळच सापडले. मग काय त्याच्या एकेक फोटोवर कमेंट्स करत जी काही धमाल केली त्याला काही तोड नाही. अर्थात सगळं हे मैत्री खात्यात चालून जातं म्हणा. पण एक मात्र खरं की त्या फोटोजनी आमच्या ही लहानपणीच्या आठवणी जागवल्या.

त्यावेळी कॅमेरा ही तशी महाग गोष्टच असे. त्यातही व्हिडियो रेकॉर्डर वगैरे असला तरी अगदी श्रीमंतांकडेच असत. पण देवाने जसा प्रत्येकाला एक श्रीमंत मामा दिलेला असतो तसा कोणता ना कोणता नातेवाईक हा आपल्याला ही असतोच. त्या काळी अशा नातेवाईकांकडे कॅमेरा असत आणि त्यात या सगळ्या आठवणी चित्रित होत. काही वेळेस आपल्याकडे ही कॅमेरा आला की अगदी आनंदाचा परमोच्च बिंदू गाठल्या सारख वाटे. पण अस असलं तरी त्यावेळी मिळणारे कॅमेरा रोल अगदी महत्वाचे असल्याने ठराविकच फोटो घेतले जात. मग कधी तरी हिरमुसलेपणा येत असे. पण तंत्रज्ञान प्रगत झालं आणि सुरुवातीला डिजिटल कॅमेरा आणि आता तर फोन हे आपल्या हातात अगदी सहज खेळायला लागले. त्याचा एक चांगला परिणाम हा झाला की फोटो आणि व्हिडियो अशा दोन्हींमध्ये आपल्याला आठवणींना साठवता येऊ लागलं.

इतकंच काय वर उल्लेख केलेले अनेक हिरमुसले क्षण आता येत नाहित. किंबहुना आधीच्या काळात जे क्षण आपल्या बालपणात टिपायचे राहून गेले त्यांना ही टिपता येतं. याचा सगळ्यांत जास्त फायदा अर्थातच लहान मुलांच्या नटखट अदा चित्रित करताना होतो. त्यात आताची पोरं लय हुशार आहेत. त्यामुळे आपल्याला नसलेले कॅमेऱ्याचं भान त्यांना असतं. नसलं तर आपण आई वडील म्हणून शिकवतो. पण अस असलं तरी नकळत चित्रित होणारे क्षण आपल्याला जास्त लक्षात राहतात. इंग्रजीत ज्यांना आपण कॅण्डीड म्हणू असे क्षण सदैव लक्षात राहतात. बरं सोशल मीडियामुळे याची अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. आज असंच एक उदाहरण आपल्या टीमला बघायला मिळालं. हे उदाहरण म्हणजे एक व्हिडियो आहे. हा व्हिडियो तसा नवीनच असावा असं वाटतोय. खासकरून, ‘कच्चा बदाम’ या गाण्याच्या वापरामुळे अस वाटतं. पण खात्रीने काही सांगू शकत नाही. असो. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक छोटीशी गोंडस मुलगी यात दिसून येते. पहिल्याच फटक्यात तिचे टपोरे डोळे आपलं लक्ष वेधून घेतात. अगदी दृष्टच काढावी अस वाटतं. टचवूड. तर अशा या गोंडस मुलीचा नटखट स्वभाव ही थोड्याच वेळात दिसून येतो.

तिच्या समोर आणि कॅमेऱ्याच्या मागे बसलेल्या व्यक्ती डोळे आणि भुवयांच्या हालचाली करत असाव्यात किंवा अजून काही मस्करी करत असाव्यात. त्यांना प्रतिसाद म्हणून ही मुलगी सुद्धा डोळे असे काही फिरवते की हसू ही येतं आणि अगं हळू असही वाटून जातं. पण एकंदरच हा छोटासा व्हिडियो ही आनंद देऊन जातो. या बाळाच्या आयुष्यातील हा क्षण आपल्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटवतो. आपल्या थकल्या भागल्या मनाला एक प्रसन्नतेची झुळुक जणू स्पर्श करून जाते. येत्या काळात ही छोटी पोर जेव्हा मागे वळून ही आठवण बघेल तेव्हा ही आठवण तिच्या ही चेहऱ्यावर हसू उमटवेल हे नक्की ! शेवटी कोणत्याही कॅमेऱ्यात बंद केलेल्या का असेना, पण आठवणी या शेवटी आठवणी असतात आणि शेवटी त्याच आपल्याला सोबत करतात. असो.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.