Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

ह्या मुलीचा आईसोबत भांडतानाचा हा क्युट व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

लहान मुलांच्या डान्सचे वायरल व्हिडियोज आपण नेहमीच बघत असतो. त्यांच्यात असलेल्या उर्जेचं, उत्साहाचं आणि कौशल्याचं कौतुक वाटत राहतं. लहान मुलांच्या या वायरल व्हिडियोज सोबत अजून ही काही व्हिडियोज वायरल होत असतात. यात प्रामुख्याने वायरल होणारे व्हिडियोज असतात ते म्हणजे लहान बाळांचे आणि त्यांच्या आई वडील किंवा पालकांच्या लुटुपुटू भांडणाचे. यात मोठ्यांचा लटका राग आणि त्याच्या जोडीला लहान बाळांचा निरागसपणा यातून एक गंमत निर्माण होते ज्याची तुलना होऊ शकत नाही. आपल्या टीमने या सारख्या व्हिडियोज पैकी काही व्हिडियोज नुकतेच पाहिले. त्यातील एका व्हिडियो विषयी लिहिलेलं वाचकांना आवडेल असं वाटलं आणि हा लेख लिहिला जातो आहे. हा व्हिडियो आहे एका सहा महिन्यांच्या बाळाचा. हे बाळ म्हणजे एक छोटी मुलगी आहे. हा व्हिडियो तिच्या मावशी/आत्या ने चित्रित केलेला आहे. तर व्हिडियोत आपल्याला दिसतात ते माय आणि लेक.

या व्हिडियोला पार्श्वभूमी अशी आहे की ही चिमुकली सतत टीव्ही जवळ जात असते. तिची आई तिला सतत असं करण्यापासून परावृत्त करत असते. पण ही चिमुकली ऐकत नाही. मग काय आई रागावते. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आईचं रागावणं सुरू झालेलं असतं. पण ही चिमुकली सुदधा वयाच्या मानाने धीट म्हणायला हवी. ती सुदधा तिच्या लहान बाळांच्या भाषेत प्रतिउत्तर करत असते. गंमतच येते. कारण ही भाषा काही आपल्याला तर कळत नाही. ती कळते फक्त त्या माउलीला. त्यांची ही जुगलबंदी चालू असताना एक क्षण असा येतो जेव्हा ही चिमुकली आईने उगरलेलं बोट खाली करण्याचा प्रयत्न करते. तिच्या या कृतीने तिची आई नकळत हसते. आपणही त्यात सामील होतो. आपल्याला कौतुक वाटत असतं. त्याचवेळी या चिमुकलीच्या चेहऱ्यावर एक निरागस हसू उमटतं. आपण सगळेच जण यावर एकमतात असू की कोणत्याही बाळाने दिलेलं निरागस हास्य आपला सगळा शिणवटा काढून टाकतं. यावेळी ही आपण हाच अनुभव घेत असतो. मग या माय लेकीच्या बोलण्यात खेळकरपणा आलेला असतो. पण आईचा हात पुन्हा वर जातो तेव्हा ही चिमुकली पुन्हा हा हात खाली करण्याचा प्रयत्न करते.

अखेर आईला सुद्धा हसू येतं आणि ही चिमुकली सुद्धा हसत सुटते आणि काही क्षणांत हा सुंदर व्हिडियो संपतो. खरं तर व्हिडियो तसा छोटाच आहे. अवघ्या एका मिनिटापेक्षा कमी वेळेचा. पण असं असलं तरीही यातून होणारं मनोरंजन आणि होणारा आनंद आपल्या मनातील ताण काहीसा हलका करतो. आपल्या आजूबाजूस मनोरंजनाची असंख्य माध्यमं उपलब्ध असतात आणि कंटेंट तर जबरदस्त असतो. पण निरागसपणा असलेला कंटेंट मनाला जो आनंद देऊन जातो त्याची तुलना कशाशी ही करता येत नाही. आपल्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. आपल्या वाचकांना याविषयी लेख वाचायला आवडेल असं वाटलं आणि हा लेख लिहिला गेला आहे.

तेव्हा आपल्या वाचक म्हणून या लेखाविषयी असलेल्या प्रतिक्रिया आम्हाला कळू द्या. तसेच आपण वेळोवेळी ज्या सकारात्मक सूचना करत असता, त्या सुद्धा आम्हाला उपयुक्त ठरतात. त्यांतून उत्तमोत्तम लेख लिहिले जातात. येत्या काळातही आपलं हे प्रेम, आमच्या टीमवर कायम राहू द्या. स्नेह वृद्धिंगत होत राहू दे आणि लोभ कायम असू द्या ही विनंती. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *