Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलीचा आवाज इतका सुंदर आहे कि व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय राहणार नाही

ह्या मुलीचा आवाज इतका सुंदर आहे कि व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय राहणार नाही

गीत, संगीत यांचं आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. आपला मूड कसाही असो, त्यासाठी योग्य असं निदान एखादं तरी गाणं असतंच. पण अनेकवेळा असंही होतं, की आपला मूड खराब असतो. आयुष्यात काहीही धड होत नाहीये असं वाटत असतं. मनाला उभारी देणारी एकही गोष्ट होत नसते. बरं हे एखादं दिवस असलं तर ठीक.

पण बराच काळ चाललं, तर नैराश्य वगैरे येण्याची भीती असते. पण या अशा सगळ्या माहोलांतून आपल्याला पुन्हा संगीतच मदतीचा हात देतं. एखादं शौर्यगीत, आशा पल्लवित करणारं गीत ऐकलं की मनाला उभारी येते. एवढा वेळ मनावर दाटून आलेले नकारात्मक विचारांचे ढग बाजूला जायला सुरवात होते. सकारात्मक विचारांचे प्रकाश किरण पुन्हा डोकावू लागतात. जे चाललंय ते अगदीच काही वाईट नाही, यातून ही मार्ग निघेल असं खात्रीने वाटू लागतं आणि मार्ग निघतो सुदधा ! आज हे सगळं लिहायचं कारण म्हणजे आमच्या टीमने या लेखाच्या आधी हा अनुभव घेतला आहे म्हणून हे सगळं सांगू शकतोय. बरेच दिवस आम्ही नाही म्हंटलं तरी आम्ही सतत लिहीत होतो. सतत एखादं काम केलं की तोचतोचपणा येतोच. काही नवीन सुचेना. जुजबी काही तरी सुचायचं आणि मग त्यावर लिखाण होई. पण हीच परिस्थिती बराच काळ होती.

त्यामुळे सगळेच पांगले होते. पण नेमका याचवेळी एक गाण्याचा व्हिडियो बघितला आणि मनात उत्साह पुन्हा दाटून आला. सगळी मरगळ दूर झाली. या व्हिडियोत गाणाऱ्या ताईंच्या आवाजाने मनाला जशी प्रसन्नता लाभली तशीच गाण्याच्या शब्दांनी उभारी दिली. या छोट्या ताई, ‘सूर नवा ध्यास नवा – छोटे सुरविर’ याच्या ऑडिशनला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी एक गाणं गायलं होतं, त्याचा हा व्हिडियो आहे. गाण्याचं नाव आहे – ‘मन सुद्ध तुझं, गोष्ट आहे पृथ्वी मोलाची’. दुर्दैवाने या छोट्या ताईंचं नाव कळत नाही. पण त्यांना आमच्या वतीने मानाचा मुजरा. त्यांना एवढ्या लहान वयात गाण्याची जी समज आहे, त्याचं तर विशेष कौतुक आहे. तसंच आवाजही त्यांनी उत्तमरीत्या जपला आहे. येत्या काळातही त्यांचा हा गायनप्रवास उत्तम चालत राहो हीच सदिच्छा ! तसेच या मूळ गाण्याचं ही कौतुक करावे तेवढं थोडंच आहे. दोन वर्षांपूर्वी, पहिल्यांदा लॉकडाऊन लागला तेव्हाही आपल्या मराठी कलाकारांनी यावर एक सुंदर व्हिडियो बनवला होता, को’विड वॉरियर्सना सलाम म्हणून. त्याची यानिमित्ताने आठवण झाली.

अर्थात आमच्या टीमने सामना केलेली समस्या ही काही गंभीर नव्हती. पण तरी आम्हाला या ताईंच्या गाण्याचा आणि त्या शब्दांचा एवढा आधार वाटला. त्यावेळी, को’विड वॉरियर्स ना याचा किती आधार वाटला असेल हे जाणवून गेलं. तसेच आपल्या दैनंदिन आयुष्यातही हे गाणं किती सकारात्मक बदल घडवून आणू शकतं हे जाणवलं. म्हंटलं आपल्याला याविषयी लिहायला हवं आहे. काय माहिती, आपल्यासारखीच, आपल्या वाचकांपैकी कोणाच्या तरी मनाला उभारी येण्यासाठी या गाण्याची गरज असेल. कदाचित हे गाणं आणि आपलं उदाहरण, त्यांना कळत नकळत मदत करून जाईल. बघा तुमच्या मनाला हे गाणं आणि हा व्हिडियो उभारी देऊन जातोय का ते ? हा व्हिडियो या लेखाच्या शेवटी, आपल्याला बघता येईल.

बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *