आपण खरे असाल तर आपल्याला कसलीच भीती नसते. सतत हे आपल्याला कोणी ना कोणी सांगत असतो, शिकवत असतो. पण काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल झाला आहे, ज्यावरून कळते ही म्हण खरी आहे. केरळमध्ये एक बस चुकीच्या लाईन मध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होती, तेव्हा एक महिला आपल्या स्कुटीवर बसून तिथून प्रवास करीत होती. बस मध्ये येते आहे ते पाहताच महिला त्या बस चा रस्ता सोडायला तयार नव्हती, कारण ती बरोबर लाईनमध्ये होती. या महिलेला सोशल मीडियावर बॉस लेडी म्हणून नाव दिल गेलेे. हा व्हिडीओ केरळचा आहे, ज्याने सोशल मीडियावर वादळ आणलाय. या व्हिडिओत स्पष्ट दिसतेय एक महिला स्कुटीवर बसली आहे आणि ती डाव्या बाजूने गाडी चालवते आहे. त्याचवेळी समोरून एक बस येते पण त्या बसची बाजू चुकीची आहे.
ती महिला काही केल्या तिथून हलायला तयार नाही, कारण तीची बाजू बरोबर होती. ती ठाण मांडून तिथेच स्कुटीवर बसून राहिली, नियमानुसार आपण आपल्या डाव्या बाजूने वाहन चालवणेच योग्य आहे. यात चुकी बसवल्याची होती. हा व्हिडिओ केव्हाचा आहे आणि कोणत्या शहरातील आहे ते अजून कळले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र पसरला आहे आणि जनता त्या महिलेची मोठया प्रमाणात प्रशंसा करीत आहेत. काही सोशल युजर्सने त्या महिलेला बॉस लेडी म्हणून नाव दिले. त्याच बरोबर काहींनी ट्विट केले की हे जर उत्तर भारतात झाले असते तर चित्र वेगळे असते. सध्या सोशल मीडियावर सतत ट्रॅफिक नियमावर आधारित किंवा रस्त्या संबंधी व्हिडिओ वायरल होत आहेत किंवा त्यावर मीम बनतात. 1 सप्टेंबर पासून एक नवा वाहतूक नियम आला आहे आणि याच वेळेत हा व्हिडिओ वायरल झाल्यामुळे सर्वत्र ह्या व्हिडिओची चर्चा चालू आहे. ही केरळ मधील घटना आहे. एक बसवल्याने बस चुकीच्या लाईन मधे घुसवलेली, हे दिसताच ती तिथून जराही हलली नाही. कारण ती बरोबर लाईनमध्ये होती. बघा व्हिडीओ.