Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलीच्या गोड आवाजात स्वामींची आरती ऐकून तुम्हांला सुद्धा भुरळ पडेल, बघा व्हिडीओ

ह्या मुलीच्या गोड आवाजात स्वामींची आरती ऐकून तुम्हांला सुद्धा भुरळ पडेल, बघा व्हिडीओ

आपण अनेक वेळेस कुठे तरी जात असतो आणि एखादं वाहन आपल्या पाठून येऊन पुढे निघून जातं. अनेक वेळेस आपण काही विचारांमध्ये असतो. काही वेळेस विवंचनेत. पण त्या वाहनाच्या पाठच्या काचेवर आपली नजर जाते आणि मनाला हायसं वाटतं. कारण त्यावर एक दैवी आकृती रेखाटलेली असते आणि खाली शब्द असतात, “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” स्वामी समर्थांचे हे कालातीत शब्द. ‘जगी जन्म मृ’त्य असे खेळ ज्यांचा, घाबरू नकोस तू असे बाळ त्यांचा’ अशी ज्यांची महती आपण वर्णन करतो असे आपले स्वामी. त्यांची भुरळ आपल्याला पडतेच.

स्वामींची महती गाणारे अनेक श्लोक आणि गीते आहेतच. सोबत आरती ही आहे. आमच्या टीमला स्वामींच्या आरतीचा एक व्हिडियो सापडला आणि त्यावर एक लेख लिहावं, असं आमच्या टीमने ठरवलं. कारण ही आरती स्वामींच्या एका छोट्या भक्ताने गायली आहे. हा व्हिडियो आहे एका लहान मुलीचा. तिला घरातील एक मोठी व्यक्ती आरती कशी म्हणावी, उच्चार कसे असावे हे शिकवत असावेत. व्हिडियो सूरु होतो ते या मुलीच्या गोड आवाजातील आरतीने. आरती मधील शब्द आपल्या बोबड्या बोलांनी म्हणत ही चिमुकली आरती म्हणत असते. तिला मदत करायला तिच्या घरातील एक मोठी व्यक्ती असते. हा व्हिडियो काही सेकंदांचा. पण त्या काही क्षणांमध्ये या मुलीची निरागस स्वरातली ती आरती मनात घर करते. मनात चाललेले विचार काही क्षण बाजूला जाऊन आपण क्षणभर स्वामींचं नामस्मरण करतो आणि या मुलीचं नकळत कौतुकही आपल्याला वाटून जातं.

आमच्या टीमने आत्ता पर्यंत अनेक वायरल व्हिडियोज वर लेख लिहिले. मन शांत होईल असं ज्या व्हिडियोज ना पाहून-ऐकून वाटतं, त्यात हा व्हिडियो आघाडीवर आहे. आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, तुम्ही नक्की पाहून घ्या. आणि तुम्हांला व्हिडीओ कसा वाटला ह्याबद्दल प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आपल्याला आमच्या टीमने केलेले अन्य वायरल व्हिडियोज वरील लेख वाचायचे असल्यास वर उपलब्ध सर्च ऑप्शनचा आपण वापर करू शकता. त्यात जाऊन आपण वायरल असं लिहून सर्च केल्यास आपल्याला विविध लेख उपलब्ध होतील. आपल्या वेळेसाठी मनापासून धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.