Breaking News
Home / जरा हटके / ह्या मुलीच्या जिद्दीला सलाम, एक पाय नाही पण हिंमत नाही हारली… रोज 1 किमी उड्या मारत जाते शाळेत

ह्या मुलीच्या जिद्दीला सलाम, एक पाय नाही पण हिंमत नाही हारली… रोज 1 किमी उड्या मारत जाते शाळेत

‘प्रयत्नांती परमेश्वर’ ही म्हण आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. शाळेत, आजीकडून किंवा इतर ठिकाणी असेल पण कुठे ना कुठे प्रत्येक माणसाच्या मनावर ‘प्रयत्नांती परमेश्वर’ हे वाक्य कोरलं गेलेलं आहे. आपण सगळेच ही म्हण वाचतो, ऐकतो पण आपल्यातील 1% लोकांनीही ही म्हण आपल्या जीवनात अंमलात आणलेली नसते. कारण प्रत्येकाला संघर्ष असतो पण त्याची पातळी, उपद्रव क्षमता होणारे परिणाम हे सगळं वेगवेगळ असतं. म्हणूनच आपण सगळे ‘प्रयत्नांती परमेश्वर’ ही म्हण आपल्या आयुष्यात अंमलात आणू शकत नाही. मात्र खऱ्या आयुष्यातही ही म्हण काहींच्या बाबतीत लागू पडलेली दिसते. एखादे ध्येय साध्य करण्यासाठी जे अतोनात मेहनत आणि प्रयत्न करतात, ते कधीच हरत नाहीत. त्याच वेळी, जे लोक स्वतःच्या संघर्षातून तरून पुढे जातात, ते आपल्या मेहनतीच्या जोरावर बराच काळ विजेतेपदावर टिकून राहतात. सोशल मीडियावरही अशाच लोकांच्या अनेक कथा पाहायला मिळतात. इंटरनेटवर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यात लोकांचा संघर्ष दिसून येतो. आता असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे, ज्यामध्ये एका मुलीच्या जिद्दीची कथा आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर नोएडातील एका तरुणाचा व्हीडिओ तुफान व्हायरल झाला होता. दिग्दर्शक, निर्माते विनोद कापरी यांनी रविवारी रात्री आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हीडिओ शेअर केला होता. यामध्ये प्रदीप मेहरा नावाचा एक तरूण रस्त्यावर धावताना दिसत आहे. हा तरुण दिवसभर मॅकडोनाल्डमध्ये काम करतो. त्याला भारतीय सैन्यात भरती व्हायचे आहे. मात्र, शारीरिक चाचणीसाठी लागणारा सराव करायला त्याला दिवसभर वेळ मिळत नाही. त्यामुळे प्रदीप मेहरा मध्यरात्रीच्या सुमारास काम संपल्यानंतर पाठीवर बॅग घेऊन घरापर्यंत धावत होता. हा व्हिडीओ भयंकर व्हायरल झाला. खऱ्या अर्थाने हा व्हिडीओ अनेक युवकांसाठी प्रेरणादायी होता. आता अशातच अजून एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

या मुलीचे कौतुक यासाठी की, तिच्यात जी जिद्द हे ती ओघानेच पाहायला मिळते. विशेष बाब म्हणजे ज्या वयात तिच्यात एवढी मोठी जिद्द आहे, ते पाहून आपल्या अंगात सुद्धा 10 हत्तीचे बळ येते. या व्हिडीओत आपल्याला प्राथमिक शाळेचा युनिफॉर्म घालून जाणारी मुलगी दिसते. पाठीवर बॅग असते आणि तब्बल कितीतरी किलोमीटरचा प्रवास ती पायी करते. आता तुम्ही म्हणाल, यात काय विशेष?

आम्हीही अनेक वर्षे शाळेत पायीच गेलो. गाड्या वगैरे गोष्टी तर शहरातील मुलांना उपलब्ध होत्या. पण आपल्यात आणि तिच्यात फरक आहे भावांनो… या मुलीला एक पाय नाही. त्यामुळे ती संपूर्ण प्रवास एकाच पायावर उडी मारत मारत करते. एकाच पायावर रोजचे येणे-जाणे, त्यामुळे तिच्या एकाच पायावर सगळ्या शरीराचे वजन असते. मग संध्याकाळी तिचा पाय किती दुखत असेल, याची कल्पना करूनच अंगावर शहारा येतो.

रोजचेच एका पायावर शाळेत जाणे असो व संध्याकाळी पाय दुखणे असो मात्र या सगळ्यात हार न मानता किंवा खचून न जाता ही मुलगी आपले काम आणि शिक्षण घेण्याची इच्छा यामुळे आपल्या शरीरातील सर्व शक्ती पणाला लावून रोजच्या दिवसाची सुरुवात करते. या मुलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर माणूस असाध्य ही साध्य करू शकतो, हे या लहान मुलीने सगळ्यांना दाखवून दिले आहे.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *