Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलीच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्ही देखील फॅन्स व्हाल, बघा मुलीने केलेला अप्रतिम डान्स

ह्या मुलीच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्ही देखील फॅन्स व्हाल, बघा मुलीने केलेला अप्रतिम डान्स

आपण सोशल मीडिया वर खूप वायरल व्हिडियोज का बघतो? अर्थातच मनोरंजन होण्यासाठी म्हणून ! साहजिकच आहे , थकल्या भागल्या अवस्थेत घरी आलं किंवा प्रवास करत असलो की काही तरी मनोरंजन व्हावं अस वाटत असतं. त्यावरचा एक जबरदस्त उतारा म्हणजे वायरल व्हिडियोजचा आनंद घेणे होय. अर्थात ही गेल्या काही वर्षातली सोशल मीडियाची देणगी आहे. बरं याची गंमत अशी की हे वायरल व्हिडियोज आताच काय पण येत्या काळातही आपण कधीही बघू शकतो. अगदी आपल्या मर्जीनुसार !

काही वेळा तर अस ही होतं की जुने जुने वायरल व्हिडियो आपल्याला आताच्या काळात बघायला मिळतात. गेल्या दोन वर्षांच्या कोविड काळात आपण घरी असताना हे प्रकार अंमळ जास्तच झाले होते. अगदी नऊ ते बारा वर्षांपूर्वीचे व्हिडियोज ही आपल्याला बघता येत होते. इतकंच काय, आपल्यापैकी अनेकांनी या व्हिडियोजच्या खाली जाऊन याविषयी कमेंट्स ही केल्या असतील. एवढ्या खात्रीने सांगायचं कारण म्हणजे या कमेंट्स करण्याचा मोह आमच्या टीमला ही आवरला नव्हता. अर्थात हे लोण ही उतरलं. त्यात आता जनजीवन पूर्वपदावर येऊ पाहत असताना या गोष्टींकडे कुठे लक्ष जातंय म्हणा ! पण आमच्या टीमला वायरल व्हिडियो बघायला आवडतात. त्यामुळे असे व्हिडियोज वरचेवर बघण्यात येतच असतात.

पण काय होतं ना, की एवढ्या वर्षानंतर प्रत्येक व्हिडियोत ती मजा मस्ती असतेच अशी नाही. त्यामुळे त्यांच्या विषयी लिहावं अस वाटत नाही. बरं आम्ही लिहिलं की आपले काही जागरूक वाचक हा व्हिडियो जुना आहे याची जाणीव करून देत असतात. मग आम्हाला ही वाईट वाटतं. पण काही वेळा मात्र असा एखादा व्हिडियो सापडतो जो जुना असतो. पण त्यातील धमाल अजूनही तशीच असते. या व्हिडियो बद्दल लिहावं असं अगदी पहिल्या क्षणापासून वाटतं. मग काय लेखणी धावायला लागते आणि लेख पूर्ण होतात. आजचा हा लेखही असाच आहे. अर्थात तो ज्या व्हिडियोमुळे लिहिला जातोय त्यांच्याविषयी माहिती घेऊयात. हा व्हिडियो जवळपास चार वर्षे जुना आहे. अर्थातच कोविड पूर्व काळातला असल्याने तेव्हा सोशल डिस्टन्स ठेवणं किंवा मास्क परिधान करणं वगैरे दिसून येत नाही. असो. पण हा व्हिडियो बहुधा ‘बथुकम्मा’ या सणाच्या निमित्ताने चित्रित केलेला असावा. किंवा इतरवेळी चित्रित केलेला ही असू शकतो. पण हे वाटायचं कारण या व्हिडियोत ऐकायला येणार गाणं होय. ‘रामा रामा रामा उय्यालो’ हे लोकप्रिय गाणं आपल्याला ऐकायला येतं. अर्थात मूळ गाण्याऐवजी त्याचं डीजे व्हर्जन ऐकायला मिळत. पण हे मूळ गाणं, तेलंगणा मधील ‘बथुकम्मा’ या दसरा काळात साजऱ्या होणाऱ्या सणादरम्यान वाजवलं जातं.

तसंही सण म्हंटलं की फुलांचा मुबलक वापर होतच असतो. या सणात तर यांचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणात होतो हे कळतं. असो. या काळातलं हे अतिशय लोकप्रिय अस गाणं आहे. आता लोकप्रिय आहे म्हंटलं की या गाण्यावर डान्स करणारी मंडळी ही असतातच. हे गाणं ही यास अपवाद नाहीये. आपल्या टीमने बघितलेल्या आजच्या व्हिडियोत आपल्याला या गाण्यावर एक छोटी मुलगी डान्स करताना दिसते. आता शब्द तेलगू असल्याने कळून येत नाहीत म्हणा, पण ताल आणि लय मात्र आपल्या मनात वसते. त्या सोबतच आपलं मन जिंकून जाणारी अजून एक गोष्ट म्हणजे या मुलीचा अफलातून डान्स होय. हा व्हिडियो चित्रित करताना शाळकरी वयाची ही मुलगी होती. वय अगदीच लहान ! पण तरीही तिचा डान्स करण्याचा उत्साह अगदी मोठ्या माणसांना ही लाजवून जाईल. किंबहुना आनंद देऊन जाईल असं म्हंटलं पाहिजे. याच उदाहरण आपल्याला व्हिडियोत ही मिळतं. ही मुलगी आणि तिचे, तिच्याचसारखे लहान मित्र डान्स करत असतात आणि जवळच काही मोठ्या मुली उभ्या असतात. या मुलीचा डान्स बघून त्यांना ही आनंद होतो. त्याच काय आपणही या आनंदात सामील झालेलो असतो.

आता डान्स करणारी व्यक्ती स्वतः आनंद घेत डान्स करत असली की माहोल ही आनंदमय व्हायला वेळ लागत नाही. तुम्हाला ही याचा अनुभव आलाच असेल. काय माहिती, इतरांना आनंद देणाऱ्या डान्सर्स पैकी तुम्ही स्वतः ही असाल. बरं यासाठी डान्स यायलाच पाहिजे असं नाही. पण तो मनापासून आवडायला हवा हे नक्की. तुम्हाला एकदा आवडला की बाकीच्यांना ही आपसूक आवडायला लागतो बघा. असो. वायरल व्हिडियोज बद्दल लिहीत राहील की अस होतं. लिहितच जातो.

पण आता थांबायला हवं. कारण या व्हिडियो विषयी आम्ही लिहिलं आहे तो व्हिडियो आपल्याला बघायला ही आवडेलच. किती वेळ नुसतं वाचत बसणार. तेव्हा, आपल्या टीमने हा व्हिडियो लेखाच्या खाली दिला आहे. आपण त्या व्हिडियोचा आस्वाद घ्या. त्याचप्रमाणे आपल्या टीमचा हा लेख ही आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.