Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलीने ‘कच्चा बदाम’ गाण्यावर केलेल्या हा भन्नाट स्टेप्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

ह्या मुलीने ‘कच्चा बदाम’ गाण्यावर केलेल्या हा भन्नाट स्टेप्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

सोशल मीडिया म्हणजे मानवी मनाचा आरसा आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. या नवं माध्यमातून ट्रेंडिंग होणारे अनेक विषय बघितले तर लोकांच्या मनात नक्की कोणत्या विषयांनी जागा बनवली आहे याचा अंदाज येऊ शकतो. यात अर्थातच मनोरंजन विषयक अनेक ट्रेंड्स ही दिसून येतात. बरं हे ट्रेंड्स सदैव बदलत असतात. त्याचमुळे की काय अनेकवेळा हे कमी कालावधीचे असतात. म्हणजे एखादं दुसरा दिवस किंवा आठवडा या प्रमाणे ! पण काही ट्रेंड असे ही असतात की आठवडेच्या आठवडे उलटले तरी त्यांच्या विषयी चर्चा चालूच राहते.

जसे की एखादं गाणं वा डान्स हा ट्रेंडिंग असला की वायरल होतोच होतो. मग त्यावर प्रत्येकजण आपापल्या परीने काही तरी नवीन कलाकृती करण्याचा प्रयत्न करत असतात. या नवीन कलाकृती मग एकेक करून सोशल मीडियावर येत जातात आणि त्यातील काही वायरल व्हायला सुरुवात होते. म्हणजे एखादा मूळ डान्स किंवा गाणं प्रसिद्ध होतं आणि त्याच्या जोडीला इतर छोट्या छोट्या कलाकृती वायरल होत असतात.

आता कच्चा बदाम या गाण्याचं उदाहरण घेऊयात. भुबन बाड्याकर या पश्चिम बंगाल मधील एका बदाम विक्रेत्यांनी गायलेलं हे गाणं गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध झालं आहे. त्यांच्याकडील बदाम विकताना ते हे गाणं गात असतं. ‘आपल्या जवळ रंग उडालेली चैन असेल वा जुनाट मोबाईल असेल तर आपण तो मला देऊन कच्चे बदाम विकत घेऊ शकता’ अशा आशयाचे हे गाणं आहे. अर्थात याचा आशय वगैरे नजीकच्या काळात कापरासारखे उडून गेलेले दिसले. अर्थात याला कुठे तरी कारणीभूत ठरले ते भुबन स्वतः ! कारण त्यांनी ज्या पद्ध्तीने हे गाणं गायलं आहे त्या लयीचं प्रेक्षकांना विशेष कौतुक वाटलं आहे अस लक्षात येतं. किंबहुना आपण ही हे गाणं ऐकलं की ती लय आणि मग ते शब्द मनात घोळत राहतात. तसेच त्यांचं हे गाणं वायरल होण्यासाठी काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कारणीभूत ठरले आहेत. काहींनी भुबन यांच्या समवेत म्युझिक व्हिडियो केले आहेत तर काहींनी स्वतःचे व्हिडियो बनवले आहेत. पण या सगळ्या व्हिडियोज मधून एका प्रकारच्या काही स्टेप्स अगदी लोकप्रिय ठरल्या आहेत असं दिसून येतं. इतक्या की आपल्याकडील इतर अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि सोशल मिडियावरील लोकांनाही त्या स्टेप्स करण्याची भुरळ पडलेली दिसून येते.

त्यामुळे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण या स्टेप्स करताना दिसतात. इतकंच काय तर अनेक मुलं आणि पालक ही या गाण्यावर एकत्र डान्स करताना या स्टेप्स वापरताना आपण सोशल मीडियावर बघू शकतो. यावरून या गाण्याची आणि पर्यायाने या डान्स स्टेप्सची लोकप्रियता किती शिगेला पोहोचली आहे याची कल्पना यावी ! या लोकप्रियतेच्या लाटेवर आता अजून एका व्हिडियोची चर्चा होते आहे. हा व्हिडियो एका लहान मुलीचा आहे. ती या व्हिडियोत आपल्याला तिच्या आप्तस्वकीयांसोबत एके ठिकाणी गेलेली दिसून येते. त्या ठिकाणी या सगळ्यांचा जेवणाचा बेत चालू असलेला कळून येतो. तसेच थोडा पिकनिकचा माहोल असावा. कारण गाणी वगैरे लावलेली असावीत. कारण कोणीतरी यावेळी ‘कच्चा बदाम’ हे गाणं सुरू करतं आणि मग या मुलीचा गोंडस असा डान्स आपल्याला बघता येतो. हा व्हिडीओ तसा फारच कमी वेळेचा आहे. त्यामुळे त्याच्या विषयी सविस्तर लिहिण्यापेक्षा आपल्या वाचकांसाठी तो आपल्या टीमने या लेखानंतर शेअर केला आहे. या व्हिडियोमूळे, ‘कच्चा बदाम’ चा ट्रेंड अजूनही जागृत असल्याचं लक्षात येतंय. येत्या काळात हा ट्रेंड अजून किती दिवस चालू राहतो हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे हे नक्की. असो.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *