वायरल व्हिडियोज वरील लेखांना आपण जो अभूतपूर्व प्रतिसाद देत आहात त्या बद्दल धन्यवाद. खासकरून डान्स व्हिडियोज वरील लेख आपल्याला जास्त आवडताहेत, असं आमच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त डान्स व्हिडियोज वरील लेख आपल्या भेटीस आणण्याच्या प्रयत्नात आहोत. त्याच प्रयत्नांतील हा एक लेख.
हा लेख आधारित आहे एका महाविद्यालयीन मुलीने केलेल्या डान्स वर. काही आठवड्यांपूर्वी आम्ही अशाच एका व्हिडियो वर लेख लिहिला होता. त्या व्हिडियोत गोव्यात शिकणाऱ्या आणि ब्रेक डान्स करणाऱ्या एका मुलाने धमाल उडवून दिली होती. आजच्या लेखातून एका मुलीने पॉपींग डान्स स्टाईलचा वापर करत कशी धमाल उडवून दिली आहे हे पाहू. ही मुलगी आहे मूळची लखनऊ ची. नवाबो का शहर म्हणून खासियत असलेल्या या शहरात कलासक्त लोकांची कमतरता नाही. ही मुलगी ही त्यातलीच. या मुलीचं नाव झेहरा अली. आर्किटेक्चर ची विद्यार्थिनी असलेल्या झेहराला लहानपणी पासून डान्सची प्रचंड आवड. तिने दिलेल्या एका मुलाखतींतून गेली पंधरा वर्षांहून अधिक काळ ती डान्स शिकते आहे, डान्स च्या स्पर्धांमधून भाग घेते आहे आणि शिकवते आहे असं तिने सांगितलं होतं. तिच्या व्हिडियोज मधून हे नक्कीच जाणवून येतं. खासकरून आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो तर अप्रतिम.
काही वर्षांपूर्वी एका महाविद्यालयात झेहरा, डान्स परफॉर्मन्स देत होती. त्यावेळी कोणी तरी हा व्हिडियो काढला आणि पुढे तो प्रचंड वायरल झाला. आम्ही ज्या युट्युब चॅनेल वर हा व्हिडियो पाहिला त्या चॅनेल वर जवळपास दोन कोटी लोकांनी या व्हिडियोचा आंनद लुटला होता. या व्हिडियोत झेहरा ही दोन प्रसिद्ध हिंदी गाण्यांवर पॉपींग डान्स प्रकार सादर करताना दिसते. पहिलं गाणं असतं ते शरारा शरारा. मेरे यार की शादी हैं या चित्रपटातलं गाणं. झेहरा आपल्या जागेवर जाऊन गाणं सुरू होण्याची वाट बघत असतानाही उपस्थित मुलं तीला प्रोत्साहन देताना दिसतात. यावरून तिच्या लोकप्रियतेची कल्पना यावी. ती सुद्धा आपल्या या लोकप्रियतेला जागते.तिच्या प्रत्येक स्टेप्स आपल्याला आवडतील अशाच असतात. त्यात तिचे हावभाव ही अगदी कॅमेऱ्याने टिपावे असे उत्तम. खासकरून जेव्हा हाताने गोळी मारण्याची स्टेप तर जबरदस्त लोकप्रिय ठरते. मग चालू होतं दुसरं गाणं. ऐश्वर्या राय बच्चन, अमिताभजी बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचं गाजलेलं गाणं. ह्या गाण्यावरच्या तिच्या स्टेप्सही भाव खाऊन जातात.
उपस्थित सगळी महाविद्यालयीन तरुणाई असल्याने सगळे जण या डान्सच्या नव्या प्रकाराचा आनंद घेत असतात. आपणही हा आंनद घेतोच. आपल्याकडे तसंही नृत्याचे विविध प्रकार आहेतच. त्यात या वेस्टर्न डान्सची भर. त्यामुळे आपण सामान्य प्रेक्षक असूनही एवढा आंनद घेतो. ज्यांना यातील तांत्रिक बाजूसुद्धा कळते ते तर अजूनच फिदा होतात. असो. झेहरा स्वतःचं एक युट्युब चॅनेल चालवते. त्यात तिने सादर केलेले विविध परफॉर्मन्स आणि मीडियाला दिलेल्या मुलाखतीही पाहता येतात. या मुलाखतींवरून झेहरा सध्या आर्किटेक्ट म्हणून अभ्यास पूर्ण करण्याच्या पाठी आहे असं दिसतं. पण तरीही डान्सचा सराव ही चालू असतो. त्यात तिच्या घरच्यांनाही खासकरून आई वडील आणि भाऊ यांना विशेष कौतुक आहे. या कौतुकात मराठी गप्पाची टीमही सामील आहे. येत्या काळात ब्रेक डान्स हा प्रकार ऑलिम्पिक खेळांत सहभागी होईल अशी चिन्ह आहेत. तेव्हा झेहरा आपल्याला त्या स्टेज वरही पाहायला मिळावी हीच सदिच्छा आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!
आपल्याला हा लेख आवडला असल्यास नक्की शेअर करा. तसेच आपल्या मराठी गप्पाच्या टीमने लिहिलेले अन्य लेखही नक्की वाचा आणि शेअर करा. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :