Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलीने गायलेले हे सुंदर गाणं ऐकून तुम्हीदेखील मंत्रमुग्ध व्हाल, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

ह्या मुलीने गायलेले हे सुंदर गाणं ऐकून तुम्हीदेखील मंत्रमुग्ध व्हाल, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

म्हणता म्हणता नवीन वर्षाचा पहिला महिना सरत ही आला आहे. हा लेख लिहीत असताना २६ जानेवारी हा दिवस सुद्धा उजाडला आहे. अर्थात ही केवळ एक तारीख नव्हे हे तर आपण जाणतोच. आपला देश प्रजासत्ताक झाला तो हा दिवस आहे. त्यामुळे आपल्या मनात या दिवसाविषयी विशेष प्रेम असतं, आहे आणि यापुढेही राहील हे नक्की. त्यामुळे हा दिवस उत्तमप्रकारे कसा साजरा होईल याकडे आपलं लक्ष असतं.

त्यात सध्याची आजूबाजूची परिस्थिती नाजूक असली तरी प्रत्येक जण आपापल्या परीने हा प्रजासत्ताक दिन उत्तम जाईल याकडे लक्ष देईलच. जवळपास प्रत्येक ठिकाणी या दिवशी देशभक्तीपर गीतं ऐकायला मिळतील हे ही नक्की. यात काही गीतं तर अजरामर आहेत. त्यातही लता दीदींनी गायलेलं ‘जो शाहिद हुंए हैं उनकी, याद करो कुरबानी’ हे गाणं तर आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. ते गाणं आपण जेवढ्या वेळा ऐकलं असेल तेवढ्या वेळा आपण भावुक झालोच असणार यात शंका नाही. त्या गाण्याचे शब्द, त्याच्या सुरावटी आणि गानसम्राज्ञी लता ताईंचा लाभलेला सुवर्णस्पर्श यांमुळे हे गाणं अजरामर ठरलं आहे.

इतकं की या गाण्यात कुठे कोणतं वाद्य वाजतं, कोणती धून कधी कशी कोठे आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात असतं. एरवी आपल्याला हे कितपत जाणवत असेल याबाबत शंका आहे. कारण त्यावेळी लता दिदींचा स्वर आणि वाद्यवृंद यांच्या साथीने आपण ते ऐकत असतो. त्यात आपण अगदी गुंग होऊन जातो. पण आज आपल्या टीमने एक व्हिडियो पाहिला. हा कोणत्या वर्षीचा व्हिडियो आहे हे सांगता येत नाही. पण एखाद्या वर्षी स्वातंत्र्यदिना निमित्त हा व्हिडियो रेकॉर्ड केला गेल्याचं लक्षात येतं. मागील स्वातंत्र्यदिनी नसलं तरी उद्याच्या प्रजासत्ताक दिनी याविषयी लिहायला मिळावं हे भाग्यच आहे. तर मंडळी आपल्याला यात आपल्याला एक छोटी गायिका भेटते. वयाने लहान असली तरी स्वभावाने समजूतदार अशी ही मुलगी. या व्हिडियोत ती हे गाणं गाते. पण सोबत आजूबाजूला कोणताही वाद्यवृंद नसतो. ती एका बऱ्यापैकी मोठ्या पण रिकामी भासणाऱ्या जागेत बसलेली असते. सोबत चित्रीकरण करणारे एक गृहस्थ कॅमेऱ्याच्या पाठीमागे बसलेले असतात. ती गायला सुरुवात करते आणि अगदी पहिल्या क्षणापासून ते गाणं संपेपर्यंत आपण केवळ तिचा गोड आवाज मनात साठवून ठेवत असतो. इतकंच नव्हे तर तिने उच्चारलेला प्रत्येक शब्द आपण ऐकून तो समजून घेत असतो. त्यातील अर्थ समजून घेत ती ही गात असते.

त्यामुळे तो प्रत्येक शब्द आपल्या मनाला भिडतो. आपल्या संरक्षण दलांविषयी आपल्याला अभिमान आणि विश्वास आहेच. तो या छोट्या मुलीच्या गाण्याने अजून वृद्धिंगत होतो. सोबतच अजून एक गोष्ट घडते. ती म्हणजे आपण या मुलीच्या गाण्याच्या वेळी तिला नकळतपणे साथ देत असतो. गाणं ऐकत असताना नकळतपणे मूळ गाण्यातील वाद्यवृंद जणू आपल्या डोक्यात बसला आहे की काय अशा पद्धतीने आपण ते गाणं ऐकत असतो. काही वेळा हातांनी ही ताल धरलेला असतो. एक मात्र खरं की गाणं संपत आणि त्या मुलीला थोडं हायसं वाटतं. आतापर्यंत गाणं उत्तम व्हावं याकडेच तिचं लक्ष असतं. पण आता ती शांत झाली असली तरी आपल्या मनात मात्र या गाण्याने कायमची जागा केलेली असते. मन भावुक झालेलं असतं हे नक्की.

खरं तर या व्हिडियो विषयी, या गाण्याविषयी, या मुलीच्या गायकीविषयी अजून थोडं लिहिता येईल. पण या क्षणी आपण हा लेख वाचण्याऐवजी तो व्हिडियो पहा. किंबहूना एक करा. तो व्हिडियो सुरू करा आणि पुढची काही मिनिटं फक्त डोळे मिटून ते गाणं ऐका. तिचा स्वर कानात साठवा आणि गाण्याचे शब्द मनात पेरले जाऊदे. गाणं संपलं की डोळे उघडा आणि काय अनुभव होता त्याचा विचार करा. सहसा आम्ही व्हिडियो बघा म्हणून सांगत असतो. पण हा व्हिडियो ऐका मग पहा असं सांगावंस वाटतं. असो. आपली टीम या लेखासोबत हा व्हिडियो शेअर करेल. त्याचा अनुभव नक्की घ्या. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. जय हिंद ! वंदे मातरम !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *