Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलीने ‘गुलाबाची कळी’ गायलेलं गाणं होत आहे खूप वायरल, बघून तुम्हांलाही आवडेल

ह्या मुलीने ‘गुलाबाची कळी’ गायलेलं गाणं होत आहे खूप वायरल, बघून तुम्हांलाही आवडेल

आमच्या टीमने अनेक वायरल विडोयोज वरील लेख आपल्या भेटीस आणले आहेत. त्यातून बहुतांश वेळा, लहान मुलांचे वायरल व्हिडियोज जास्त पसंत केले जातात, हे लक्षात येतं. त्यांची निरागसता ह्यामागे मुख्य कारण आहे, असे म्हटल्यास वावगं ठरू नये. कदाचित आपण सगळेच त्या वयातील स्वतःच्या आठवणींमध्ये गुंतून जात असू, किंवा आपलं बालपण असं असतं तर असंही वाटून जात असेल. कारण काहीही असो, पण आमच्या या लेखांना अमाप वाचकसंख्या लाभली आहे. प्रथमतः आपल्या या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. तसेच आज अशाच एका व्हिडियोवर आमच्या टीमने लेख लिहिला आहे, ज्यामुळे आपण शाळेत असतानाच्या आठवणी जाग्या होतील.

हा व्हिडियो आहे एका चिमुकलीचा. ती शाळेतील अगदी पहिल्या यत्तेतील वाटते. अर्थात त्या विषयीची माहिती आमच्या टिमकडे नाही. या व्हिडियोत तिच्या आजूबाजूला मुलं दिसतात, जी बऱ्याच अंशी पेंगलेली वाटतात. कदाचित एखादा मोकळा तास असावा. या तासाला ह्या चिमूकलीला कोणी तरी गायला लावलं आहे. हे एक प्रसिद्ध गाणं आहे. तेजस्विनी पंडित यांच्यावर चित्रित झालेलं, ‘गुलाबाची कळी’ हे ते गाणं. पण या व्हिडियोतील छोट्या बाईसाहेब जरा गंमतीतच हे गाणं म्हणताहेत. त्यात गुलाबाच्या कळी हे कडवं गाताना थोडं ओरडल्यासारखं गात आहे असं वाटू शकतं. पण तिचा एकूणच निरागसपणा आपल्या चेहऱ्यावर हसू उमटवून जातो. गाणं गाताना इथे तिथे पाहणं पण तरीही आत्मविश्वासाने गाणं म्हणणं यामुळे तिचं कौतुकही वाटतं. तसेच आपल्या शाळेत असण्याच्या काळात कधी कधी गायनाच्या तासाला आपण किंवा आपले मित्र मैत्रिणी कसे ‘सुरात(?)’ गायले असू याची आठवण येऊन हसू ही येतं. अर्थात तिचा हा काही गायनाचा तास नाही हे ही खरंच.

पण आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात, हे नक्की. आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, नक्की पाहून घ्या. आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. शाळेचे ते दिवसंच वेगळे असतात. सध्या गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी अशी आपल्या जगण्याची अवस्था आहे. पण या लहान मुलांचे गंमतीदार वायरल व्हिडियोज पाहून आपण काही क्षण का होईना तो काळ सुखाने जगतो, यात आनंद मानायचा. आपल्याला अशाच अनेक आनंद देणाऱ्या वायरल व्हिडियोज विषयीचे लेख वाचायचे असल्यास वर उपलब्ध सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च केल्यास आपल्याला वैविध्यपूर्ण लेख वाचायला मिळतील. आपल्या बहुमूल्य वेळेसाठी धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.