Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलीने घेतलेला उखाणा पाहून तुम्हीदेखील कौतुक केल्याशिवाय राहणार नाही, बघा किती गोड बोलते हि मुलगी

ह्या मुलीने घेतलेला उखाणा पाहून तुम्हीदेखील कौतुक केल्याशिवाय राहणार नाही, बघा किती गोड बोलते हि मुलगी

लहान मुलांचे व्हिडीओ सर्वचजण आवडीने पाहत असतात. सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हिडिओ लहान मुलांवरच असल्याचे दिसते. ते आपले मनोरंजनही करतात आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. आजकालच्या मुलांमध्ये टॅलेंट खचाखच भरलेले आहे. त्यामुळे अशा मुलांचे व्हिडिओ व्हायरल होतात. ते पाहिले की आपल्यालाही असेच काहीसे करावे वाटते. लहानपणीची आठवण आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. अगदी आपण लहान असताना अनेक खेळ खेळत होतो. अनेक कला शिकत होतो आणि शिकवतही होतो. शेवटी विषय असाय की काही कला अंगभूत असतात. तर काही शिकावा लागतात. काही कला तर अगदी पाठांतर केल्यावरच प्राप्त होतात. काही कला आणि सादर करणारी लहान मुले फारच भन्नाट असतात. अशाच एका भन्नाट मुलीचा एकदम सुंदर चिमुकलीचा व्हिडिओ समोर आला आहे. ही मुले किती अतरंगी असावी, याची कल्पना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर येते.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या बालपणीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. या व्हायरल झालेल्या व्हिडीओत या छोट्याशा मुलीने असल्या अतरंगी पध्दतीने उखाणा घेतला आहे की, ते पाहून तुम्हीही चकित व्हाल. नाव घे… नाव घे… लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर महाराष्ट्रीयन स्त्रियांमध्ये मजेशीर परंपरा आहे ती उखाणे घेण्याची. नाव घे म्हणून प्रत्येकीला लग्नानंतर तर सातत्याने आग्रह केला जातो. लग्न ठरल्यावर तर होणाऱ्या नववधूला पहिला सल्ला दिला जातो तो मराठी उखाणे पाठ करण्याचा. मग शोध सुरू होतो तो उखाण्यांचा आणि उखाणे पाठ करण्याचा. उखाण्यांची महाराष्ट्रातील परंपरा किती जुनी आहे, याबाबत जरी माहिती नसली तरी आजही उखाणे घेण्याची मजेशीर परंपरा सुरूच आहे. अशीच ही गमतीदार आणि सुंदर अशी परंपरा तरुणाई नेटाने पुढे नेत आहेत. यात लहान मुलीही कमी नाहीत बर का?… मजेमजेने काही लहान मुलीही उखाणे पाठ करतात. आणि नंतर ते उखाणे कायमच त्यांना पाहुण्यांसमोर सादर करावे लागतात.

कारण एकदा का काही कला आपल्या मुलांना येते हे घरच्यांना कळले की मग प्रत्येक पाहूणा आला की घरचे पाहुण्यांसमोर ती कला सादर करून दाखव, असा आदेश सोडतात. अशाच पाहुण्यांसमोर एक मुलगी आपली उखाणा घेण्याची कला सादर करत आहे. तिचा व्हिडीओ एका पाहुण्याने शूट केला आणि कौतुकाने सोशल मीडियावर टाकला आणि बघता बघता हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. या मुलीने उखाणा घेताना ज्या पद्धतीने घेतला आहे, जसा तिचा आवाज आहे, ते पाहून तुम्हीही तिचे हसून कौतुक कराल. अगदी इमोशनल आणि सगळ्यांना भावेल असा उखाणा तिने तयार केला आणि न अडखळत म्हणून सुद्धा दाखवला. भारी गोष्ट म्हणजे या मुलीने उखाणा घेत असताना तिच्या चेहऱ्यावर सातत्याने हसू आहे, जे एकदमच सुंदर आहे. हा व्हिडीओ तुमचंही मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *