Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलीने जाहिरातीतल्या सं’तूर मॉमला दिलेला सल्ला ऐकून हसून आवरणार नाही, बघा हा वायरल व्हिडीओ

ह्या मुलीने जाहिरातीतल्या सं’तूर मॉमला दिलेला सल्ला ऐकून हसून आवरणार नाही, बघा हा वायरल व्हिडीओ

लहान मुलं कधी काय बोलतील याचा नेम नसतो बघा. किंबहुना त्यांच्या या बोलण्याचा फटका आपल्या सगळ्यांना कधी ना कधी बसलेला असतो. त्यांचं अतिशय सरधोपट पणे खरं बोलणं काही वेळेस गंमत निर्माण करतं तर काही वेळेस गोत्यात आणतं. पण त्यातला निरागसपणा ही तेवढाच भावणारा असतो. हा निरागसपणा त्यांच्या अभिनयातूनही दिसून येतोच. त्यात आजकालची लहान पिढी ही स्मार्ट असते. त्यांना स्वतःला पटकन व्यक्त करता येतं आणि त्यात आत्मविश्वासही लाजवाब असा असतो. अशाच एका चिमुकलीचा अभिनय करतानाचा व्हिडियो आमच्या टीमला सापडला. या मुलीचं नाव सांची वानखेडे, राहणार नाशिक. वय अवघे काही वर्षे, दहा वर्षांच्या आत म्हणा ना. पण अभिनय एवढा भन्नाट की विचारू नका. त्यात आम्हाला जो व्हिडियो मिळाला तो वायरल झालेला.

या व्हिडियोत एका प्रसिद्ध प्रहसनातील वाक्य ती म्हणत असते. हे प्रहसन इतर कोणी तरी सोशल मीडियावर शेअर केलेलं असतं. एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीतून तिच्या वडिलांकडून हे कळतं. पण सांची ही वाक्ये एवढ्या सहजतेने बोलून जाते की ती वाक्य तिच्याच साठी लिहिली आहेत असं वाटावं. यात ती एका गावाकडील महिलेने एका प्रसिद्ध साबणाच्या जाहिरातीतील वाक्यावर गंमतीदार भाष्य केलेलं प्रहसन ऐकवते. तसेच चेहऱ्यावरील अभिनयही उत्तम म्हणावा असा. यात तिचे बालसुलभ हावभाव चालू असतात त्यामुळे गंमत येते. सांची हिने यापुढील काळात अभिनेत्री व्हावं असं तिच्या आई वडिलांना वाटतं असं त्यांच्या मुलाखतींवरून कळतं. येत्या काळात तसं झाल्यास आपल्यास आश्चर्य वाटावयास नको. पण तत्पूर्वी सांची हिला तिच्या शालेय जीवनासाठी मराठी गप्पाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, नक्की पाहून घ्या. सांची प्रमाणेच अजून एका लहान मुलीचा अभिनय असणारे अनेक व्हिडियो प्रसिद्ध झाले होते. तिचं नाव शिवांजली पोरजे. पुढे तिने कारभारी लय भारी या मालिकेत अभिनयही केला. तिच्या विषयी आमच्या टीमने लेख लिहिला आहेच. आपल्याला तो वाचायचा असल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शन चा वापर करा. त्यात शिवांजली असं लिहून सर्च करा. आपल्याला तो लेख मिळेल आणि वाचता येईल. तुम्ही देत असलेल्या वेळेबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. असंच प्रेम राहू द्या.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *