मराठी गप्पावर आपण गेल्या काही दिवसांत वायरल व्हिडियोज ची एक मालिकाच पाहिली असेल. तुमच्या प्रतिसादामुळे अनेकविध वायरल व्हिडियोज तुमच्या पर्यंत आणण्याचा आमच्या टीमचा प्रयत्न असतो. याच मालिकेतील एक भन्नाट व्हिडिओ आज आमची टीम आपल्या भेटीस घेऊन आली आहे. सहसा भन्नाट वायरल व्हिडियोज म्हणजे कोणीतरी अतरंगी वागत असेल आणि बोलत असेल असं एक अघोषित समीकरण झालेलं आहे. पण या ऐवजी साध्या सोप्प्या मराठीत पण मार्मिक कविता कोणी केली तर? आणि ही कविता दा’रू या विषयावर असेल तर? होय असंच काहीसं एका प्रवासात घडलं.
एका मुलीला तिच्या मैत्रिणीने दा’रू हा विषय देऊन कविता निर्माण करायला सांगीतली. प्रवासातला खेळात असं होतं असावं, असा कयास आपण बांधू शकतो. पण यात मजेशीर अट अशी की या कवितेत कुठेही दा’रुविषयी टीका करायची नाही. त्या मुलीनेही मग हे आव्हान स्वीकारलं. पण यात दा’रू पिणारे किंवा न पिणारे यांचं मन दुखावलं जाऊ नये, म्हणून त्यांची माफीही मागितली. पण नंतर तिने जी कविता सादर केली आहे ती ऐकून दा’रू पिणारे आणि न पिणारे या दोहोंना मजा येईल. कारण यात अगदी एखाद्या दा’रु पिणाऱ्या व्यक्तीची मानसिकता दर्शवली आहे. त्यांच्या मनात असलेलं एकटेपण, दा’रूची वाटणारी सोबत पण तरीही दारू मुळे होणारं नुकसान, याची असलेली कल्पना या सगळ्या मुद्द्यांना ही कविता स्पर्श करते. इतकेच नव्हे तर दा’रू पिणाऱ्याच्या आयुष्यात कसे कसे बदल घडत जातात हेही ही कविता दाखवते.
आम्ही तो व्हडिओ खाली देत आहोत, नक्की बघा. या कवितेचा व्हिडियो आपल्या पर्यंत आणताना दा’रू पिणे, याचं अवडंबर करण्याचा किंवा त्यास प्रोत्साहन देण्याचा मराठी गप्पाच्या टीमचाही हेतू नाही. इथे केवळ मनोरंजन म्हणून हा वायरल व्हिडीओ आपल्या पर्यंत आमची टीम आणत आहे. भन्नाट आणि वायरल व्हिडियोज बद्दलच्या माहितीसाठी मराठी गप्पाची टीम सातत्याने आमच्या वाचकांसाठी कार्यरत असते. आपल्याला वायरल व्हिडियोज बद्दल वाचायचं असल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर आपण करू शकता. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च केल्यास आपल्याला आमच्या टीमने लिहिलेले लेख मिळू शकतील. आपल्या बहुमूल्य वेळेसाठी धन्यवाद !
बघा व्हिडीओ :