Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलीने बोबड्या शब्दात गायलेलं गाणं पाहून तुम्ही पण तिच्या प्रेमात पडाल, बघा व्हिडीओ

ह्या मुलीने बोबड्या शब्दात गायलेलं गाणं पाहून तुम्ही पण तिच्या प्रेमात पडाल, बघा व्हिडीओ

आपली टीम वायरल व्हिडियोज वर लेख लिहिते यास बराच काळ लोटला आहे. या काळात आपण वाचक म्हणून आपल्या टीमला जो पाठिंबा दिलात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! या काळात एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे मनोरंजन होण्यासाठी एखादा व्हिडियो किती जुना किंवा नवीन आहे याचा फारसा फरक पडत नाही. त्या व्हिडियोत दिसणाऱ्या गोष्टी जर आजही आनंद देणाऱ्या असतील तर आजही हे व्हिडियोज लोकप्रिय ठरतात. आज आपल्या टीमने पाहिलेल्या एका व्हिडियोचं उदाहरण घ्या ना. हा व्हिडियो बघताच क्षणी आवडावा असा आहे. पण या व्हिडियो विषयी जेव्हा जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं हा तर ११ वर्षांपूर्वी अपलोड केलेला व्हिडियो आहे. पण त्यात असलेला कंटेंट आपल्याला आवडून जातो. हा व्हिडियो आहे एका अतिशय लहान मुलीचा. ती त्यावेळी इतकी छोटी होती की तिचं बोलणं हे बोबड्या बोलांचं होतं. याच बोबड्या बोलांनी तिने एक गाणं गायलं आणि म्हणता म्हणता तो व्हिडियो वायरल झाला.

आजघडीला जवळपास दीड लाखांहून अधिकांनी हा व्हिडियो पाहिला आहे आणि पसंत केला आहे. तिने गायलेलं गाणं म्हणजे सलील कुलकर्णी आणि संदीप खरे या जोडीचं प्रसिद्ध गाणं – ‘अग्गोबाई ढग्गोबाई’. हे गाणं किती लोकप्रिय ठरलं आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पण या चिमुरडीच्या बोबड्या बोलांनी आणि निरागस हावभावांनी ते गाणं जणू जिवंत होतं. अग्गोबाई ढग्गोबाई म्हणत ही छोटी या गाण्याची सुरुवात करते. मग गाणं गाता गाता प्रत्येक ओळींवर छान छान अभिनय पण करते. ढगाला उन्हाची केवढी झळ या वाक्यावर खरंच त्या ढगांना उन्हाचा ताप जाणवत असणार असं वाटतं. तर डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार या वाक्यावर तिचा अभिनय मन जिंकून जातो. ह्याच ओळी ती पुन्हा म्हणते तेव्हा तर नाटकीपणा आपल्याला हसवुन सोडतो. त्यातही शेवटी, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार म्हणताना तिने केलेला ‘जोर’कस अभिनय चेहऱ्यावर हास्य टिकवून ठेवण्यास मदत करते.

आपल्या टीमने हा व्हिडियो पाहिला तेव्हाच वाटलं की आपल्या वाचकांना या विषयी वाचायला आवडेल. तेव्हा या व्हिडियो विषयी अजून थोडी जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आलं की हा व्हिडीयो जवळपास अकरा वर्षे जुना आहे. या व्हिडियोत असलेल्या लहानग्या मुलीचं नाव आहे स्वरा. नावात असलेला गोडवा तिच्या बोबड्या बोलांतही उतरला आहे हे आपण अनुभवलं असेलच. आज ही स्वरा उत्तम डान्सर म्हणूनही नावारूपाला येते आहे. तिच्या नावाने असलेल्या युट्युब चॅनेल वरून ती नृत्य क्षेत्रात करत असलेली प्रगती लक्षात घेता येते. आपल्या टीमला तिच्या जुन्या वायरल व्हिडियोचं जसं कौतुक आहे, तसंच तिच्या कलाक्षेत्रात होत असलेल्या वाटचालीचं कौतुक ही आहे. येत्या काळात स्वरा उत्तम कलाकार म्हणून नावारूपास येवो या आमच्या टीमकडून तिला शुभेच्छा !! खूप मोठी हो बाळा !!

वाचकहो !आपल्याला हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या मनोरंजनासाठी कटिबद्ध असलेली आपली टीम।नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असते आणि त्यांच्यावर लेखन करत असते. आपणही आम्हाला लेख शेअर करून, सकारात्मक कमेंट्स करून उत्तम प्रतिसाद देत असता. हा प्रतिसाद म्हणजे आपल्या टीमसाठी प्रोत्साहनच. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन कायम आमच्या पाठीशी राहू द्या. आपला टीमवर असलेला लोभ कायम ठेवा. आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *