आपल्या मराठी गप्पाच्या टीमचे सदस्य म्हणजे एकेक वल्ली आहेत. वायरल व्हिडियोज वर लेख लिहायचे म्हणून एकेक असे भन्नाट व्हिडियोज शोधून काढतात की काही विचारू नका. आजचा व्हिडियो हा अतिशय खास आहे, कारण आजतागायत आमच्या टीमने शोधून काढलेला सगळ्यात क्युट व्हिडियो आहे. हा गोड व्हिडियो आहे एका भोंडला समारंभा मधील. वाचकांपैकी अनेकांना भोंडला म्हणजे काय हे माहिती असेलंच. पण ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी थोडक्यात माहिती.
भोंडला हा समारंभ नवरात्रीत आयोजित केला जातो. यात केंद्रस्थानी असतात त्या लहान मुली. त्यांना जुन्या गाण्यांच्या मार्फत जीवनातील महत्वाच्या क्षणांची , घटनांची तोंडओळख करून दिली जाते. यात मध्यभागी सुब्बत्तेचे प्रतीक असलेला हत्ती चितारला जातो. त्या हत्तीची पूजा केली जाते आणि त्याच्या भोवती लहान मुली आणि अगदी स्त्रिया सुद्धा गोल गोल फिरत गाणी म्हणतात. भोंडला सणातील गाणी ही फारच प्रसिद्ध असतात. आपण युट्युबवर जाऊन सर्च केलंत तर आपल्याला अनेक गाणी ऐकायला मिळतील.
पण त्याआधी या वायरल व्हिडियो विषयी. या वायरल व्हिडियोत भोंडला खेळला जात असतो. बाहेरच्या रिंगणात स्त्रिया सहभागी झालेल्या असतात. तर रिंगणाच्या आतील बाजूस लहान लहान मुलींनी फेर धरलेला असतो. त्यातील एक चिमुकली अगदी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते. याचं कारण नऊवारी नेसलेली ही चिमुकली या सगळ्या सोहळ्याचा अगदी मनापासून आस्वाद घेत असते. लहान मुलींच्या एका गटाचं अघोषित प्रतिनिधित्व तिच्या कडे आलेलं असतं. पण ती मात्र स्वतःच्या तालात गुं’ग असते. पाठी गाणं चालू असतं, दे’वीला दंडवत सांग’. या गाण्याच्या लयीत तिचा डान्स सुरू असतो. चेहऱ्यावरचे हावभाव अगदी प्रोफेशनल डान्सर सारखे असतात. तिच्या लकबी, हावभाव एवढे गोड वाटतात की हा केवळ ४० सेकंदांचा व्हिडियो आपण वारंवार पाहतो. आपल्याच धुंदीत नाचत, बागडत या छोट्या बाईसाहेब अगदी आनंदात विहार करत असतात. तिची ही प्रसन्न मुद्रा पाहून आपणही प्रसन्न मूड मध्ये जातो. जेव्हा आपण स्वतःहून एखाद्या गोष्टीचा आनंद घेतो तेव्हा आपल्याला आजूबाजूच्या जगाचा विसर पडतो, पण आपल्याबाबतीत जगाचं कुतूहल जागं होतं.
हा व्हिडीओ याचं अगदी उत्तम उदाहरण आहे. आपल्याच आनंदात मश्गुल होऊन बागडणाऱ्या या छोट्या फुलपाखराला मराठी गप्पाच्या टिमकडून खूप खूप आशीर्वाद. खूप मोठ्ठी हो बाळा आणि असाच आनंद घेत घेत आयुष्य जग. खूप खूप शुभेच्छा !!
आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, आवडला तर नक्की शे’अर करा. आणि क’मेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आपल्याला हा लेख आवडला असेल तर हा आनंद वाटायला विसरू नका. त्यासाठी हा लेख नक्की शेअर करा आणि आनंद वाटून द्विगुणित करा. तसेच आमच्या टीमने लिहिलेले अन्य लेखही वाचायला विसरू नका. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :