Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलीने लग्नामध्ये केलेला हा अतरंगी डान्स होतोय जबरदस्त वायर’ल, एक्सप्रेशन्स नक्की बघा

ह्या मुलीने लग्नामध्ये केलेला हा अतरंगी डान्स होतोय जबरदस्त वायर’ल, एक्सप्रेशन्स नक्की बघा

येता काळ हा लग्नाच्या धमधुमीचा असणार आहे. खरं तर एवढ्या कडकडीत उन्हाळ्यात लग्न म्हणजे परीक्षाच असते. किंबहुना आताही आपण या उन्हाळ्याची परीक्षा देतच आहोत. पण एकदा का यंदा कर्तव्य आहे असं म्हंटलं की मग काही मागे फिरता येत नाही. खासकरून या लग्न सोहळ्याची तयारी एव्हाना सुरू केली असेल तर थांबवता येत नाही. अगदीच काही अनपेक्षित झालं तरच हा सुखसोहळा लांबणीवर पडतो.

अन्यथा बऱ्याच धुमधडाक्यात हा लग्न सोहळा आणि इतर विधी हे साजरे होत असतात. अर्थात यातही व्यवस्थापन अगदी उत्तम केलं तर सोहळा ही मस्त होतो आणि त्याचा आनंद ही घेता येतो. खासकरून लग्नाचे विधी सकाळीच (किंवा दुपारी) ठरल्या मुहूर्तावर झाले आणि मग, त्यानंतर लगेचच रिसेप्शन न ठेवता ते संध्याकाळी ठेवलं तर अजून मजा येते. त्यात सायंकाळ झाल्यामुळे वातावरण ही सैलावलेलं असतं. उन्हं उतरतीला गेलेली असतात. रिसेप्शन मोकळ्या जागेत असेल तर हवेची ही कमतरता नसते. तसेच लग्नातील विधी पूर्ण झाल्याने वधुवर आणि वऱ्हाडी सुद्धा आरामात असतात. मनावरचा ताण निघून गेलेला असतो. त्यात अजून फक्त एका गोष्टीची गरज असते जी बहुधा भागवली जातेच. कोणत्याही रिसेप्शन सोहळ्यात डीजे आणि डान्स फ्लोअर असला की उरला सुरला शिणवटा ही निघून जातो.

मग फक्त गाणी वाजायची खोटी असते, की आपोआपच पाय थिरकायला लागतात. त्यात अर्थातच तरुणाई आघाडीवर असते. आयुष्याचा आनंद घ्यावा तो या तरुण वयात असं म्हंटलं जातं ते काही उगीच नाही. कारण या वयात ऊर्जा ही असते आणि मनसोक्त आयुष्य जगायची उर्मी ही जबरदस्त असते. आणि हा आनंद सगळ्यात जास्त मिळतो तो डान्सच्या माध्यमातून ! त्यामुळे गाणी सुरू झाली की तरुणाई डान्स फ्लोअर वर अवतरली म्हणून समजा. त्यातही काही जणं आणि काही जणी अगदी धमाल असतात. कारण त्यांचा डान्स, अगदी धमाल असतो. अगदी सहजगत्या डान्स करून जातात. म्हणजे डान्सचा आनंद ही घेतात आणि त्यांचा डान्स बघून, इतरांना ही आनंद होतो. आता आपल्या टीमने बघितलेल्या एका व्हिडियोचं उदाहरण घ्या ना. हा व्हिडियो काही दिवसांपूर्वी वायरल झाला होता. या व्हिडियोच्या अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला मस्त धमाल डान्स बघायला मिळतो तसेच तरुणाईची ऊर्जा काय असते हे सुद्धा अनुभवता येत. हे सगळं होतं ते एका मुलीमुळे.

व्हिडियो सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत ही मुलगी या व्हिडियोच्या केंद्रस्थानी असते. ती नाचते पण जबरदस्त ! तिचे हावभाव आणि देहबोली हे दोन्ही गाण्याच्या मुडला न्याय देणारे असतात. तसेच तिला बघून आजूबाजूची तरुण मुलंमुली सुद्धा अजून जोशात नाचायला लागतात. या व्हिडियोमुळे बऱ्याच दिवसांनी आपल्याला ‘काला कौआ काट खायेगा’ हे गाणं कानावर पडतं. या गाण्याची मजा, या मुलीचा आणि तरुणाईचा उत्साह यांमुळे आपलं मन नक्कीच प्रसन्न होतं. आपल्या टीमने हा व्हिडियो बघितला आणि आम्हाला आवडून गेला. म्हंटलं आपल्या वाचकांना याविषयी जाणून घ्यायला आवडेल. त्यातूनच आजच्या या लेखाची निर्मिती झालेली आहे.

आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *