Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलीने ‘वाजले कि बारा’ गाण्यावर केला अप्रतिम डान्स, एकदा बघा हा व्हिडीओ

ह्या मुलीने ‘वाजले कि बारा’ गाण्यावर केला अप्रतिम डान्स, एकदा बघा हा व्हिडीओ

लहान मुलं म्हणजे निरागसता, खट्याळपणा, खोडकरपणा आणि तेवढीच निर्व्याज माया यांचं समीकरण होय. पण हे समीकरण एवढ्या पूरतच असतं अस नाही. यात अजून एक महत्वपूर्ण घटक समाविष्ट असतो. हा महत्वपूर्ण घटक म्हणजे त्यांच्यात असलेली अपरिमित ऊर्जा. या वयात या उर्जेला व्यवस्थित चालना मिळाली तर त्यांच्यातील अनेक चांगले गुण बहरून येतात. त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळतो. याची जाण असणारे पालक आपसूक आपल्या मुलांना त्यामुळे विविध कला आणि क्रीडा प्रकारांमध्ये प्रोत्साहन देताना आपण पाहतोच. मुलांच्या उर्जेला योग्य दिशा मिळतानाचा अनुभव खूप उत्तम असतो. अशाच एका गुणी मुलीच्या पालकांनी तिच्या डान्सच्या आवडीला प्रोत्साहन देण्याचं ठरवलं. यातूनच मग पुढे सोशल मीडिया वरती या मुलीच्या डान्सचे व्हिडियोज त्यांनी पोस्ट करायला सुरुवात केली असं दिसून येतं. यातील एक व्हिडियो आपल्या टीमच्या पाहण्यात आला. त्यातील या मुलीचा उत्साह आणि ऊर्जा पाहून तिच्या या डान्स व्हिडियो वर लिहायचं अस ठरलं आणि आजचा हा लेख आकारास येतो आहे.

या मुलीचं नाव अवनी असल्याचं कळतं. काही दिवसांपूर्वी तिने एका लोकप्रिय मराठी गाण्यावर डान्स केला होता. हे गाणं म्हणजे, ‘नटरंग’ चित्रपटातलं ‘वाजले की बारा’ हे होय. अमृता खानविलकर यांनी या गाण्यावर डान्स करून प्रेक्षकांना किती आनंद दिला आहे हे काही वेगळं सांगायला नको. आजही हे गाणं ऐकलं की त्यांची आठवण होत नाही असं कधीच होत नाही. असो. तर आपल्या या छोट्या ताईने म्हणजे अवनीने यावर छान डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात यशस्वी झाली आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. व्हिडियोची सुरवात होते तेव्हा आपल्याला अवनी अगदी पारंपरिक महाराष्ट्रीयन पोषाखात दिसते. तसेच एखाद्या लावणीची जशी सुरुवात होईल तशीच ती सुरुवात ही करते. सुरुवातीच्या संगीतावर मस्त गिरक्या घेत ती या डान्स ला सुरवात करते. जवळपास चार गिरक्या घेत ती दुसरी स्टेप करते. पुन्हा गिरक्या असतात. खरं तर एखाद्या व्यक्तीस भीरभिरल्यासारख व्हावं. पण अवनीचं लक्ष केवळ डान्सवर असतं. तसेच या संपुर्ण वेळेत आणि नंतर ही पूर्ण व्हिडियोभर ती हसतमुखाने डान्स करत राहते. तिच्या या प्रसन्न स्वभावाचं कौतुकच.

हे गाणं मुळातच ऊर्जेने भरलेलं आहे. त्याच्याशी स्वतःच्या ऊर्जेचा मेळ घालत अवनी डान्स परफॉर्मन्स देणं सुरू ठेवते. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव ही तसेच पटकन बदलत असतात. पण एकामागोमाग होणाऱ्या स्टेप्स अगदी मस्तपणे होत असतात. या गाण्यावरील मूळ डान्स परफॉर्मन्स मधील काही स्टेप्स ही बघायला मिळतात याचाही आनंद घेता येतो. सोबतच तिची एक स्टेप लक्षात राहते ती म्हणजे खाली बसून गिरक्या घेणं. या स्टेप्स करताना चपळाईने खाली बसणं, डान्स स्टेप करणं आणि पटकन उठत दुसऱ्या स्टेप्स करण यासाठी खूप ऊर्जा लागते. ही सगळी ऊर्जा अवनीच्या डान्स परफॉर्मन्स मध्ये दिसून येतेच. या डान्स परफॉर्मन्सचा समारोप ही छान होतो. एकंदर काय तर हा डान्स परफॉर्मन्स बघणं म्हणजे एक छान असा अनुभव ठरतो. आपणही हा डान्स परफॉर्मन्स पाहिला असेल तर आपल्याला ही हे पटेल. नसेल पाहिला तर आवर्जून पहा.

तसेच आपल्या टीमने लिहिलेला लेखही आपल्यास कसा वाटला हे नक्की सांगा. कारण आपल्या टीमला वाचकांसाठी नवनवीन विषयांवर लेखन करायला आवडतं. पण त्यासाठी प्रोत्साहन आवश्यक असतं. आमचं सुदैव अस की आपले वाचक हे आमच्या टीमला कायमच प्रोत्साहन देत असतात. यापुढेही हे प्रोत्साहन आमच्या टीमला मिळत राहो हीच सदिच्छा. आमची टीमही उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस आणत राहील हे नक्की. लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत आपल्या टीमचे लेख वाचत राहा, शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *