Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलीने सपना चौधरीच्या गाण्यावर केलेला हा अफलातून डान्स होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

ह्या मुलीने सपना चौधरीच्या गाण्यावर केलेला हा अफलातून डान्स होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

मराठी गप्पाच्या माध्यमातून विविध विषयांवरील लेख आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपली टीम करत असते. त्यासाठी सातत्याने व्हिडियोज बघणं, लेखन करणं ओघाने आलंच. यात काही व्हिडियोज असे येतात जे पाहून अचंबित व्हायला तर होतंच सोबत कौतुकही वाटतं. नियमित वाचकांनी ओळखलं असेल की आजच्या लेखाचा विषय कुठचा असेल ते. कारण या दोन्ही भावना आपल्या मनात एकत्रपणे सहसा येतात त्या लहान मुलांच्या व्हिडियोज मधून. मग त्यातून दिसणारं त्यांचं बुद्धीचातुर्य असो वा कलानिपुण असणं असो. आपल्याला आश्चर्याचे धक्के बसत असतात. आता आज पाहिलेला व्हिडियो ही काहीसा असाच.

आपल्या पैकी अनेकांना सपना चौधरी हे नाव माहिती असेल. हरयाणा मधील एक प्रसिद्ध नृत्यांगना. सपना यांच्या अनेक युट्युब व्हिडियोजना कित्येक कोटींमध्ये प्रेक्षक लाभतात. तसेच त्यांच्या कार्यक्रमांचं जेव्हा जेव्हा आयोजन होत असे तेव्हा तेव्हा तुफान गर्दी होत असे. त्यामुळे आपल्याला त्यांच्या लोकप्रियतेची कल्पना यावी. प्रत्येक लोकप्रिय कलाकाराची एखादी तेवढीच लोकप्रिय कलाकृती असतेच. सपना यांच्या बाबतीत तो मान जातो तो ‘तेरे आख्यो का यो काजल’ या गाण्याला. हे गाणं एवढं प्रसिद्ध आहे की काही परदेशी युवतींनी ही या गाण्यावर डान्स करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं. पण या गाण्यावर एक गोड मुलगी जो डान्स करते त्याला तोड नाही. या मुलीचं नाव कळत नाही पण तिने केलेला डान्स मात्र छान वाटतो.

हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा ही चिमुकली एका भिंतीजवळ उभी असते. जवळच मोठी माणसं ही उभी असतात. वर उल्लेख केलेल्या गाण्याची धून वाजायला सुरवात होते. ही छोटी चिमुकली मग त्या धूनवर डान्स करायला लागते. पहिली दहा सेकंद ती केवळ डुलत असते. पण जसं गाणं सुरू होतं तश्या तिच्या विविध डान्स स्टेप्स करताना आपल्याला ती दिसून येते. सपना चौधरी यांनी केलेली एक प्रसिद्ध स्टेप ही ती यात करताना दिसते. तेरे आख्यो का यो काजल या ओळीवरची ती स्टेप. पुढेही तिचा तिचा डान्स चालू असतो. पण तेवढ्यात ‘प्रेक्षकांना’ इथून तिथे जाण्याची हुक्की येते.यावर, काय बोलणार अशी आपली प्रतिक्रिया येते न येते तेवढयात एक तरुण थेट या चिमुकली समोर जाऊन उभा राहतो. कपाळावर हात मारण्याचीच वेळ येते आपल्यावर. बरं जातो तरी का तर कौतुक म्हणून पैसे द्यायला. पण त्याला बाजू केलं जातं. आणि ही छोटू चिमुकली तर डान्स करण्यात दंग असते. तेवढ्यात बाजूला असलेल्या काकू दोन कॅडबरी तिला देतात. ‘आता ही काय कॅडबरी देण्याची वेळ आहे का, नाचू दे ना व्यवस्थित’ असे भाव या मुलीच्या चेहऱ्यावर असतात. ती थेट कॅमेऱ्यामागील व्यक्तीला कॅडबरी देऊन विषय निकालात काढते आणि डान्स कडे वळते.

मग मात्र तसा काही अडथळा येत नाही. जवळपास सवा दोन मिनिटांचा हा व्हिडियो. पण त्यात या मुलीने जो डान्स सादर केला तो करत असताना जो आत्मविश्वास दाखवला त्याचं कौतुक वाटतं. तसेच वेळोवेळी तिच्या चेहऱ्यावर डान्स करताना येणारे भाव अचंबित करतात. या लहान वयात हे भाव अभिनयातून कसे काय आणत असेल याचं अप्रूप वाटतं. तिच्यात डान्स साठी हवा असणारा ताल तिच्यात आपसूक आहे असंच वाटतं. तसेच आत्मविश्वास ही लाजवाब. अतिशय छोट्या वयातही डान्स विषयी एवढी गती असणाऱ्या या मुलीचं कौतुक.

आपल्याला हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे. कारण खास आपल्यासाठी म्हणून मराठी गप्पाची टीम सातत्याने विविध लेख प्रसिद्ध करत असते. आपल्याला ही हे लेख आवडतात हे आम्हाला कळत असतंच. आपला मराठी गप्पा प्रति असणारा स्नेह असाच वाढू दे ही सदिच्छा. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *