Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलीने सर्वांसमोर जो डान्स केला तो पाहून तुम्हीदेखील शेअर केल्याशिवाय राहणार नाहीत

ह्या मुलीने सर्वांसमोर जो डान्स केला तो पाहून तुम्हीदेखील शेअर केल्याशिवाय राहणार नाहीत

सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये काही व्हिडीओ अतिशय मजेदार असतात. तर काही व्हिडीओ पाहून आपण थक्क होऊन जातो. लहान मुलांपासून ते तरुण आणि वृद्ध लोकांचे डान्स व्हिडीओ तर खास चर्चेचा विषय ठरतात. अशा व्हिडीओंना आवडीने पाहिले जाते. सध्या एका 3-4 वर्षाच्या मुलीचा डान्स प्रचंड व्हायरल होतोय. या चिमुकलीचा बहारदार डान्सचा व्हिडीओ एकदा बघून तुमचं मन भरणार नाही, हे मात्र नक्की. तिच्या डान्स स्टेप्स आणि मूव्ह्स पाहून सोशल मीडियावर तिला ‘भविष्यातील बॉलिवूड अभिनेत्री’ असं म्हटलं जातंय.

सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हा व्हिडीओ एका गणपती उत्सवात सुरू असलेल्या कला सादरीकरणचा आहे. आता गणेशोत्सव म्हटलं की लहान मुलांची गाणी, महिलांचे संगीतखुर्ची सारखे कार्यक्रम… खऱ्या अर्थाने गणेशोत्सव कुटुंबाला बांधणारा, रक्ताची नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा असतो.

पाहुणे, मुलांची धम्माल, जुन्या-नव्या पिढीसोबत गप्पा, नाच-गाण्यांच्या कार्यक्रमांची जागरणं, अगदी विरोधी मताची माणसं एकत्र येणं, असा हा ऊर्जावर्धक सण आहे. याच गणेशोत्सव कला सादरीकरण प्रकारात अनेक मोठे मोठे कलाकार घडतात. कुणी डान्स करत तर कुणी नाटक करत तर कुणी आपली अंगभूत असणारी आणि लोकांचं मनोरंजन करणारी कला दाखवतं. अशीच आपल्याला अंगभूत असणारी नृत्य कला एका मुलीने दाखवली आहे. तिचा हा डान्स पाहून भले भले हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये डान्स करत असलेल्या मुलीचे मूव्स पाहून एखादी प्रोफेशनल डान्सर डान्स करत असल्याचा भास होतो. या व्हिडिओमधील मुलीच्या चेहऱ्यावरील हावभाव कौतुक करण्यासारखे आहेत. आता तिचं वय पाहता तिने केलेला डान्स हा अफलातून आहे. तसं पहायला गेलं तर हल्लीची लहान मुलं फक्त म्हणायला लहान असतात, त्यांच्यात अप्रतिम टॅलेंट पहायला मिळतं. मग ते गाणं असो वा डान्स.

आता तर लहान मुलंही कशातच कमी नाहीत. विशेषत: गायन किंवा डान्सिंगमध्ये आजकालच्या लहान मुलांचा मेळ नाही. असला भारी डान्स भल्या भल्याना जमणार नाही, असा डान्स या मुलीने केला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तीन ते चार वर्षांची ही चिमुरडी अतिशय मनमोहक पद्धतीने नाचताना दिसत आहे, हिचा क्यूटपणा पाहून तुमचे मन आनंदित होईल, हे मात्र नक्की. ही मुलगी इतका सुंदर डान्स करत आहे की ते पाहून तुम्ही सगळं काही विसरून जाल. कोणीतरी हा व्हिडिओ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. या व्हिडिओला नेटिझिन्सनी खूप चांगली पसंती दिली आहे. इतक्या लहान वयात मुलीने केलेला हा जबरदस्त डान्स पाहून प्रत्येक जण हैराण होताना दिसून येत आहे.

हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *