Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलीने सर्वांसमोर स्टेजवर केलेला हा कोळी डान्स होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

ह्या मुलीने सर्वांसमोर स्टेजवर केलेला हा कोळी डान्स होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

महाराष्ट्राला लाभलेल्या सांस्कृतिक परंपरेत गीतं, नृत्य, नाट्य या विविध कलाप्रकारांनी आपलं अमूल्य योगदान दिलेलं आहे. त्यामुळे त्यांचं आपल्या आयुष्यात असलेलं महत्व हे अनन्यसाधारण आहे. या लोकप्रिय कालाप्रकारांत कोळीनृत्य आणि कोळीगीतं यांचं नाव अगदी अग्रक्रमाने येतं. हे दोन्ही कलाप्रकार आपल्या अगदी जिव्हाळ्याचे. कोळीगीतं ऐकून पाय थिरकले नाहीत अशा व्यक्ती नसतीलच बहुधा. त्या गीतांमध्ये असणारी ऊर्जा एवढी भ’न्नाट असते की प्रत्येकाला नाचावसं वाटतंच. त्यात असणारा गोडवा मनाला प्रफुल्लित करून जातो. आपण अनेक शाळांमधील सांस्कृतिक कार्यक्रमांतून कोळी नृत्य बघतोच. एवढंच कशाला आपल्यापैकी अनेकांनी शाळेत कोळीनृत्य सादर केलेली असणारच. कोणत्याही काळात आपल्याला ऊर्जा देण्याची जादू या कोळी गीतांत आणि नृत्यात असते. आज कोळी गीतं आणि नृत्य यांची आठवण यायचं कारण म्हणजे एक वायरल व्हिडियो. तसा जुनाच आहे, पण त्यातलं कोळी गीत आणि त्यावर एका शालेय मुलीने सादर केलेलं नृत्य आजही आपलं मन प्रसन्न करतं.

ही शालेय वयातली मुलगी आहे. अगदी लहान पण अगदी चुणचुणीत अशी ही मुलगी. तिच्यातील हुशारी तिने सादर केलेल्या नृत्यातून दिसून येते. तिने नृत्य सादर केलेले गीत हे अतिशय प्रसिद्ध असे गीत आहे. एकविरा दे’वीची स्तुती करणारं हे गीत आहे. गाणं सुरू होतं आणि ही चिमुकली नाचायला लागते. तिच्या पाठी असलेल्या बोर्ड वरून ती माळवणी येथील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या प्राथमिक शाळेत असावी असं कळून येतं. तिचं हे नृत्य जिथे सादर होत असतं, तिथे कुठच्याही प्रकारची विशेष व्यवस्था दिसून येत नाही. जसे की रंगमंच, प्रकाशयोजना वगैरे. पण कलाकार दमदार असेल आणि आपल्या कलेचा मनापासून आनंद घेत असेल तर बाकीच्या गोष्टी महत्वाच्या राहत नाहीत. असंच काहीसं झालंय या व्हिडियोत. ही मुलगी ज्या प्रसन्नतेने आपलं नृत्य सादर करते, इतर गोष्टी तिथे नसल्याचं जाणवत नाही. हा विडियो संपल्यावर आपल्याला या नसलेल्या गोष्टींची जाणीव होते. या संपूर्ण व्हिडियोत या मुलीची ऊर्जा, तिने केलेल्या स्टेप्स आणि तिचा हसतमुख चेहरा आपल्याला खिळवून ठेवतो. एवढ्या लहान वयातही तिच्यात असणारी नृत्याची समज तिच्या स्टेप्स करण्यामधून समजून येते. जवळपास सहा मिनिटांच्या या व्हिडियोत तिची ऊर्जा कमी झाली आहे, असं क्वचितच दिसून येतं.

याउलट ती प्रत्येक स्टेप लक्षात ठेवून आणि लक्ष देऊन करते याचं कौतुक वाटतं. तसेच दिलेल्या प्रॉ’पर्टीचा म्हणजे नावेची वल्ही, माशांची टोपली यांचा वापरही ती योग्य वेळी योग्य तितका करते हेही कौतुकास्पद. तिच्या या नृत्याला पहिल्या क्षणापासून ते नृत्य संपेपर्यंत दाद द्यायला अनेक जण उपस्थित असतात. तीही अथपासून ते इतिपर्यंत तेवढ्याच उत्साहात आपलं नृत्य सादर करते, त्यामुळे दर्दी रसिकांनी दिलेली दाद ही आपल्याला संपूर्ण व्हिडियोभर पाहायला मिळते. या चिमुकलीच कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तिच्या अंगी असलेले कलागुण कोणालाही कळून यावेत असेच. तिच्या या कलागुणांना आणि तिने सादर केलेल्या उत्तम नृत्याला मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा. आमच्या टीमने पाहिलेल्या उत्तम वायरल व्हिडियोज पैकी हा एक व्हिडियो होता हे नक्की.

आमच्या टीमने वायरल व्हिडियोज वर अनेक लेख लिहिले आहेत. त्यांना असंख्य वाचक लाभले हे आमच्या टीमच्या मेहनतीचं आम्ही फळ मानतो. पण म्हणून आम्ही अजून जोमाने आणि उत्साहाने आपल्यासाठी नवनवीन लेख घेऊन येत असतो. आपल्याला हे लेख वाचायचे असल्यास आमच्या वे’बसा’ईटवर असलेल्या स’र्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून स’र्च करा. आपल्याला अनेक उत्तम लेख वाचायला मिळतील. आपले आणि आमचे ऋणानुबंध नेहमीच घट्ट राहोत ही सदिच्छा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.