Breaking News
Home / मनोरंजन / ह्या मुलीला तिच्या मित्रांनी जे वाढदिवसाचे गिफ्ट दिले ते पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

ह्या मुलीला तिच्या मित्रांनी जे वाढदिवसाचे गिफ्ट दिले ते पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

मैत्री केवळ दोन शब्दांचा मेळ खरा पण त्यातला अर्थ मात्र गहिरा. र’क्ताचं नसलेलं पण काही वेळेस र’क्ताच्या नात्यांतून अधिक विश्वास वाटावा असं नातं म्हणजे मैत्री. अर्थात आपल्यातील काही जणांची मतं वेगळी असू शकतात. पण आपल्या प्रत्येकाचं एका गोष्टीवर एकमत होतं, ते म्हणजे मैत्री शिवाय आयुष्यात मजा ही नाही आणि अर्थही नाही. कारण हे मित्रच असे असतात की कितीही नालाय’क वाटले तरी वेळप्रसंगी नक्की धावून येतात. पण त्यांनाही आपली ही भावना माहिती असते. त्यामुळे आपण त्यांच्यावर जास्त रागावणार नाही हे ही त्यांना माहिती असतं. याचाच सगळ्यात जास्त फायदा घेतला जातो ते आपल्या वाढदिवसाला. त्या दिवशी यांच्या अंगात जे काही कलात्मकतेचं वारं संचारतं की काही विचारू नका. एका पेक्षा एक भन्नाट कल्पना सुचतात यांना.

आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो म्हणजे याचं उत्तम उदाहरण. हा व्हिडियो पश्चिम भारतातील वाटतो. कदाचित बंगाल येथील असावा. कारण या व्हिडियोत बोलली जाणारी भाषा तशी वाटते. तर या व्हिडियोत आपल्याला दिसतो तो एक मित्रांचा घोळका. त्यांच्या ग्रुप मधील मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सगळे जण अगदी आवर्जून आलेले दिसतात. सोबत एक भलं मोठ्ठं गिफ्ट ही आणलेलं असतं. ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना एवढं मोठ्ठ गिफ्ट बघून आनंद होणारच. त्या मुलीलाही होतो. बॉक्स एवढा मोठा असतो की नक्कीच काही मोठं गिफ्ट् असणार असं वाटत राहतं. त्या गिफ्ट भोवतालचं वेष्टन (रॅपर) काढल्यावर तशी खात्री पटते. पण ती आपली. कारण हा तर एका मिक्सरचा बॉक्स दिसत असतो. त्या मुलीला ही तसच वाटत असत. पण मित्र असतात कशाला. त्यात मिक्सर नसतोच मुळी. पहिला पचका इथे होतो. आता यात काही तरी अतरंगी भेटवस्तू असणार हे या मुलीने ताडलेलं असतं. आपल्यालाही तसच वाटत असतं.

पण तिला कल्पना आलेली असावी. कारण हा मिक्सरचा बॉक्स दूर सारल्यानंतर ही मुलगी तब्बल पाच वेळेस वृत्तपत्राची पाच रॅपर बाजूला काढते आणि बाहेरून दिसतो तो घडाळ्याचा बॉक्स. आता घड्याळ म्हंटलं की आपण सांभाळून हाताळू. पण तिला अंदाज आलेला असतो. त्यामुळे अगदी दणक्यातच ती तो बॉक्स आ’पटते. पहिल्यांदा व्हिडियो बघताना आपल्याला पण आश्चर्य वाटतं. पण व्हिडियो जस जसा पुढे सरकत जातो तसं तसं ती जे वागली ते बरोबत वाटत जातं. कारण किती ते गिफ्ट पेपर व्रॅप्स आणि पेपरचे वेष्टन. कारण हे गिफ्ट पॅक करणाऱ्याने काही तास तरी या कामात अगदी मनापासून मेहनत केलेली दिसून येते. अगदी फुरसत मध्ये हे गिफ्ट विकत घेऊन पॅक केल्याचं वाटत राहतं. त्यातही कलात्मकता असतेच. कारण पूर्ण व्हिडियो भर आपण कोणतं गिफ्ट असेल, कोणतं गिफ्ट असेल याचे आडाखे बांधत असतो. घडाळ्याच्या बॉक्स नंतर वाटतं की कधी मनगटी घड्याळ आहे की काय? तर कधी कधी वाटतं की एखादं उत्तम दर्जाचं पेन भेट म्हणून दिलंय की काय.

पण आपले अंदाज चुकीचे ठरत असतात. त्यात या मुलीच्या घरातून एक काकू उत्सुकता म्हणून काय चाललंय हे पाहायला येतात. त्यांचीही उत्सुकता आपल्या सारखीच ताणलेली असते. पण जेव्हा खरं गिफ्ट बाहेर पडतं तेव्हा मात्र हसून हसून सगळ्यांचीच पुरेवाट झालेली असते. जीचा वाढदिवस आहे तिची सपशेल मस्करी करण्यात तिचे मित्र आणि मैत्रिणी अगदी यशस्वी झालेल्या असतात. ह्या मित्रांनी वाढदिवसाचे गिफ्ट काय दिले आहे हे पाहण्यासाठी तुम्हांला व्हिडीओ पाहावा लागेल. कारण इथे सांगून आम्हाला तुमचा सस्पेन्स घालवायचा नाही आहे. पाहून मग आपणही एवढे हसतो आणि नकळत आपल्या जुन्या आठवणीत जातो. आपणही असे प्रकार शाळा कॉलेज मध्ये असताना केल्याचं आठवतं. आपल्या बाबतीतही असं काही झालं असेल तर त्याच्या आठवणी तर अजून ताज्या होतात.

असा हा जुन्या आठवणी ताज्या करणारा व्हिडियो, आपल्याला आनंदी करून जातो. या व्हिडियो प्रमाणेच हा लेखही आपल्या आनंदात भर घालणारा ठरला असेल हे नक्की. कारण आपली टीम सातत्याने विविध विषयांवर लेखन करत असते आणि आपणही त्यास सकारात्मक प्रतिसाद देत असता. आपल्या कमेंट्स मधून, आपण आपले लेख सोशल मीडियावर शेअर करता तेव्हा, आपल्या टीमला आपल्या पाठिंब्याची जाणीव होत असते. या पुढेही आपला पाठिंबा कायम राहील हे नक्की. असाच लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.