लहान मुलं आणि त्याचं निरागस वागणं हे आपल्या सगळ्यांना नेहमी आनंदित करत असंत. त्यात त्यांचा अभिनय, नृत्य आणि गायन पाहून इतकं गोड कोण कसं काय असू शकतं, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. त्यात आमच्या टीमने नजीकच्या काळात अनेक वायरल व्हिडीयोज विषयी लेख लिहिले आहेत. त्यामुळे आम्हालाही हा प्रश्न पडतोच आणि या लहान मुलांची अदाकारी पाहून मनही भारावून जातं. असाच एक मन भारावून टाकणारा व्हिडियो आमच्या टीमच्या दृष्टीस पडला आणि त्याविषयी लिहावं असं आमच्या टीमने ठरवलं. या व्हिडियोची सुरुवात होते ती एका गोड मुलीच्या भाजीवालीच्या पेहरावात. मुरडत मुरडत हि छोटी भाजीवाली येते आणि स्वतःची ओळख करून देते. मी मॉडर्न शांताबाई असल्याचं सांगते आणि भाजीची टोपली खाली ठेवते.
सोबत द्यायला कॅमेऱ्याच्या पाठीमागून कोणी स्त्रीचा आवाज येत असतोच. म्हणजे हि भाजीवाली बाई, या बाईंकडे येऊन नेहमीच भाजी विकते असं छोटंसं कथानक यातून दृष्टीस पडतं. बरं मग या भाजी घेणाऱ्या बाई थोडावेळाने येते सांगतात तेव्हा या मॉडर्न शांताबाई ‘मै टॅन तो नही ना हो गयी’ म्हणत मेकअप करणं सुरु करतात तेव्हा मजा येते. बरं याच कारण विचारलं तर म्हणे फ्रेश भाजी विकणारी भाजीवाली पण फ्रेश दिसायला हवी न. व्हिडियो पुढे सरकत असतो आणि पाहणाऱ्याला या चिमुरडीच्या अभिनयाचं कौतुक वाटत राहतं. मग पुढे तिने भाजी कुठून कुठून आणली हे सांगताना विविध राज्यांची नावं ती घेते. व्हिडियो संपता संपता मग कॉलीफ्लॉवर घेण्याचा निर्णय कॅमेऱ्याच्या पाठीमागून घेतला जातो. पण मग पैसे कसे देणार. तर यावर भारताचे पंतप्र’धान श्री. नरेंद मो’दी यांनी प्रोत्साहन दिलेल्या कॅ’शलेस पे’मेंट ची आठवण करून दिली जाते. यात एका आघाडीच्या पे’मेंट ऍपचं नाव दिलं जातं. अर्थात हा व्हिडियो तीन वर्षे जुना आहे, त्यामुळे यात दिलेला कॅशलेस पेमेंटचा संदेश हा बऱ्याच अंशी आपल्या पैकी अनेकांच्या जगण्याचा भाग झालेला आहेच. कारण आपल्या पैकी अनेकांनी या कॅशलेस व्यवहारांचा अनुभव गत काळात घेतलेला असेलंच.
खासकरून लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी ज्यांनी आधी कॅशलेस पेमेंट चा पर्याय वापरला नाहीये, त्यांनीही हा पर्याय वापरण्यास सुरुवात केली असेलंच. पण हा संदेश देणारी हि चिमुरडी आणि तिचा तो निरागस अभिनय हा व्हिडियो पाहणाऱ्याचं मन जिंकून जातात. असेच काही वायरल व्हिडीयोज विषयीचे लेख आपल्याला वाचायचे असल्यास वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च केल्यास आपल्याला आमच्या टीमने लिहिलेले विविध लेख मिळतील. तसेच या लेखातून कॅ’शलेस पे’मेंट किंवा यात उल्लेख झालेल्या पे’मेंट ऍपचं प्र’मोशन करणं हा आमचा उद्देश नाही हे कृपया लक्षात घ्या. तसेच यातून कोणाच्याही भावना दुखावणे, हाही आमच्या टीमचा उद्देश नाही. आपण आमचे प्रिय वाचक आहात. आम्ही लिहिलेले लेख आपण नेहमीच शेअर करत असता, त्याबद्दल आमच्या टीमकडून आपले मनापासून आभार ! आम्ही ह्या मॉडर्न भाजीवाल्या मुलीचा व्हिडीओ खाली देत आहोत, नक्की पाहून घ्या.
बघा व्हिडीओ :