Breaking News
Home / मनोरंजन / ह्या रशियन्स तरुणींनी पार्टीमध्ये सर्वांसमोर भारतीय गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

ह्या रशियन्स तरुणींनी पार्टीमध्ये सर्वांसमोर भारतीय गाण्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

जगात सगळ्यांत जास्त सिनेमे बनणाऱ्या देशांच्या यादीत भारत हा अव्वल देशांमध्ये येतो. जगभरात असलेले भारतीय आणि अनेक परदेशी नागरिक हे भारतीय सिनेमांचे चाहते असतात. आपल्या पैकी सिनेमाचे चाहते असलेल्यांना आठवत असेल की राज कपूर साहेबांच्या चित्रपटांना तर रशियातून किती मागणी असे. आजच्या काळातही भारतीय सिनेमांची जादू ही परदेशी नागरिकांवर असलेली दिसून येते. त्यामुळे काही परदेशी लग्नांमध्ये भारतीय सिने संगीतावर डान्स होताना दिसत असतो. याचीच काहीशी आठवण करून देणारा एक व्हिडियो आपल्या टीमने पाहिला. हा व्हिडियो आहे झारा स्टार या युट्युबरचा. ही तरुणी आहे मूळची रशियन. पण तिच्या आवडीच्या विषयात महत्वाच्या स्थानी एक विषय प्रामुख्याने दिसून येतो तो म्हणजे भारतीय संगीतावर आधारित नृत्य.

गेल्या दशकभराच्या काळात तिने वेळोवेळी आपल्या युट्युबच्या माध्यमातून भारतीय संगीतावर आधारित नृत्य सादर करणारे व्हिडियोज प्रसिद्ध केले आहेत. तसेच कथक हा भारतीय नृत्य प्रकार ही ती शिकवताना दिसून येते. तिला आपल्या भारतीय गाण्यांविषयी एवढं प्रेम कसं निर्माण झालं वगैरे माहीती विपुल प्रमाणात उपलब्ध होत नाही. पण तिच्या युट्युब चॅनेलवरून ती या कलेची जी साधना करत आली आहे त्याचा एक अंदाज येतो. तिचे व्हिडियोज हे असतात रशियन भाषेत. पण तिच्या नृत्य कलेमुळे भाषेचा अडसर जाणवत नाही. आपल्या टीमने या रशियन तरुणीच्या जो डान्स व्हिडियो पाहिला तो आहे एका समारंभातला. जवळपास आठ वर्षे जुना. यात त्यावेळेच्या आणि आजही सहज ओठावर रुळणाऱ्या एका गाण्यावर ही तरुणी आणि तिच्या सहकारी डान्स करताना दिसतात. हे गाणं म्हणजे ‘कजरारे’ ! बघा, फक्त एका शब्दांत तुमच्या डोळ्यासमोर त्या गाण्यांतील दृश्य आली असणार. तसेच ओठांवर त्या गाण्याचे शब्द तरळले असणार. एवढं हे गाणं आजही लोकप्रिय आहे.

याच लोकप्रियतेला साजेसा असं नृत्य ही तरुणी आणि तिचा ग्रुप करतात. या सिनेमातील अनेक स्टेप्स त्या या गाण्यात सहज करतात. तसेच झारा ही भारतीय नृत्यात नक्कीच पारंगत असणार हे कळून येतं. कारण एखाद्या सराईत डान्सर प्रमाणे तिच्या स्टेप्स होत असतात. प्रत्येक बिट पकडली जात असते. तसेच अनेक वेळेस परदेशी नागरिक भारतीय गाण्यांवर नाचताना एक अवघडलेपणा असतो. तो इथे दिसत नाही. त्यामुळे तिचं कौतुक वाटतं. आपल्या प्रमाणेच उपस्थित प्रेक्षकांना ही तिचा समरसून केलेला डान्स आवडलेला असतो. व्हिडियो संपताना ही तिने एक गिरकी मारत नृत्य संपवणे हे आवडून जातं. चेरी ऑन केक म्हणावा असा तो क्षण. असो.

आपण हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्याला आवडला असणार. तसेच आपल्या टीमने या विषयावर लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आणि खात्री आहे. आपला प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्याबद्दल धन्यवाद ! यापुढील काळातही आपला हा प्रतिसाद वाढत राहील हे नक्की. लेख शेअर करता आहात त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने शेअर करत राहा. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.