Breaking News
Home / मनोरंजन / ह्या रशियन तरुणींनी ‘अप्सरा आली’ ह्या मराठी गाण्यावर केला अप्रतीम डान्स, बघा व्हिडीओ

ह्या रशियन तरुणींनी ‘अप्सरा आली’ ह्या मराठी गाण्यावर केला अप्रतीम डान्स, बघा व्हिडीओ

आपल्या वाचकांसाठी वायरल व्हिडियोज वर लिहीत असताना अनेक समान वाटावेत असे व्हिडियोज सहज दिसून जातात. त्यातले काही वायलर व्हिडियोज असतात तर काही नसतात. पण आपलं लक्ष मात्र वेधून घेतात. पण त्यातही आपल्याला तेच व्हिडियोज आवडतात जे आपलं लक्ष खिळवून ठेवत असतील. असाच एक लक्ष खिळवून ठेवणारा एक व्हिडियो आपल्या टीमने पाहिला आणि आपल्या वाचकांना याविषयी वाचायला आवडेल असं वाटलं. म्हणून आजचा हा लेखनप्रपंच.

हा व्हिडियो आहे एका रशियन डान्स ग्रुपचा. म्हणजे यातील नृत्यांगना या रशियन आहेत म्हणून रशियन गृप. अन्यथा त्यांचा संपूर्ण ग्रुप हा भारतीय आहे. त्यांचं नावंही भारतीय आहे. इंडियन डान्स ग्रुप – चंपा असं या ग्रुपचं नाव आहे. नावाला साजेसा असा लोगो सुदधा या ग्रुपच्या नावात दिसून येतो. गेली काही वर्षे हा ग्रुप कार्यरत असल्याचं दिसून येतं. बहुतांश वेळेस रशियन मुलींनी एकत्र येऊन डान्स सादर केलेले दिसून येतात. तर काहींमध्ये भारतीय मुलं असल्याचं सुदधा दिसून येतं. त्यांचे सगळेच व्हिडियोज हे भारतीय भाषांतील गाण्यांवर आधारलेले असतात. त्यातही आनंदाची बाब अशी की काही मराठी गाण्यांवरही या ग्रुपमधील नृत्यांगनांनी डान्स केला आहे. आपल्या टीमने पाहिलेला आजचा डान्स हा सुद्धा एका सुप्रसिद्ध मराठी गाण्यावर केलेला डान्स होता.

हे मराठी गाणं म्हणजे ‘अप्सरा आली’ हे गाणं होय. सोनाली कुलकर्णी यांनी आपल्या उत्तम सादरीकरणाने या गाण्यातील शब्दांना अगदी जिवंत केलं होतं. त्यांचाच वारसा या रशियन मुली पुढे नेताना दिसतात. व्हिडियो आणि गाणं एकत्रच सुरू होतं. व्हिडियोच्या सुरुवातीपासून या मुलींच्या डान्सची भुरळ आपल्याला पडते. अगदी १०० टक्के महाराष्ट्रीय म्हणावा असा पेहराव घातलेल्या या मुली खरंच स्वर्गलोकीच्या अप्सरा वाटायला लागतात. व्हिडियो सुरू होतो तेव्हापासून त्यांनी केलेल्या कोरिओग्राफीचे सुद्धा कौतुक वाटते. कारण डान्स सुरू असताना अगदी कल्पकतेने स्टेप्स बसवल्याचं लक्षात येतं. खासकरून तेव्हा, जेव्हा प्रत्येक काही स्टेप्स मध्ये पाचजणी आलटून पालटून नाचतात तर काहींमध्ये शब्द आणि बिट्स पकडत डान्स केलेला असतो. तसेच या पाचजणींमध्ये प्रत्येकीला संचाच्या मध्यभागी येत डान्स करण्याची संधी मिळालेली दिसून येते. त्यामुळे एक मुख्य नर्तिका आणि बाकीच्या सह नर्तिका हे समीकरण जाऊन प्रत्येकीला मध्यवर्ती ठिकाणी राहून आपली कला पेश करता येते.

त्यांच्या या सुंदर आणि अप्रतिम नृत्याविष्काराला उपस्थितांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असतो. अप्सरा आली या शब्दांवर तर एके वेळेस एवढा जल्लोष होतो की विचारता सोय नाही. त्यातून या गाण्याची लोकप्रियता आणि या मुलींनी त्यावर केलेल्या डान्सला मिळालेली दाद लक्षात येते. आपल्या टीमने तर हा व्हिडियो अगदी अथ पासून ते इति पर्यंत पाहिला. अक्षरशः लक्ष खिळवून ठेवणारा असा हा व्हिडियो आहे.

आपणही हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्यालाही हा व्हिडियो आवडला असणार यात शंका नाही. तसेच आपल्या टीमने या विषयावर लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असेल यात शंका नाही. आपली टीम सातत्याने लिहीत असते आणि त्याच सातत्याने आपण या लेखांना उदंड प्रतिसाद देत असता. लेखांवर सकारात्मक प्रतिक्रिया देत असता आणि लेखही मोठ्या प्रमाणावर शेअर करत असता. आपल्या या प्रेमासाठी आपले मनःपूर्वक धन्यवाद. यापुढील काळातही आपलं हे प्रेम आपल्या टीमवर कायम राहू दे ही सदिच्छा. लोभ असावा ही विनंती. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *