Breaking News
Home / मनोरंजन / ह्या रशियन तरुणींनी भारतीय गाण्यांवर केला सुंदर डान्स, पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल

ह्या रशियन तरुणींनी भारतीय गाण्यांवर केला सुंदर डान्स, पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल

एखाद्या देशाची संस्कृती जगभरात पोहोचवण्याचं काम त्या त्या देशातील कलाकार करत असतात. मग ते लेखन असो, गायन असो, वादन असो, नृत्य असो, चित्रकला असो वा इतर कोणतीही कला असो. पण हेच काम इतर देशांतील कलाकारांनी ही केलं तर? अर्थातच उत्तम आहे. किंबहुना हे उत्तम काम गेली काही दशकं होतं आहे. ज्या देशाच्या कला जगभरात नेण्याचं काम होतं आहे तो देश म्हणजे आपला भारत देश होय. तर आपल्या कला जगभरात सादर करणारा दुसरा देश म्हणजे रशिया होय.

अर्थात रशियातील सगळेच जण अस करत नसले तरी असंख्य डान्स ग्रुप्स हे काम अगदी नेमाने कित्येक दशकं करताहेत. यातील एक आघाडीचा डान्स ग्रुप म्हणजे मयूरी हा आहे. होय, हा डान्स ग्रुप सुरू करणाऱ्यांनी या ग्रुपचं नावंही अस्सल भारतीय ठेवलं आहे. किंबहुना त्या स्वतः अनेक अंगांनी भारतीय आहेत असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. वेरा एव्हग्राफोवा असं त्यांचं नाव आहे. त्या मूळच्या रशियन. पण लहानपणीच भारतीय संगीत आणि डान्सच्या प्रेमात पडल्या.

त्यातही ‘गीत गाया पथ्थरोने’ या सिनेमाचा त्यांच्या जीवनावर विशेष प्रभाव पडल्याचं त्यांच्या वेबसाईटवर असलेल्या माहीतीतून लक्षात येतं. पूढे पुढे तर भारतीय संगीताची त्यांना इतकी गोडी लागली की त्यांनी त्याचा यथावकाश अभ्यास ही केला. पण केवळ अभ्यास करून त्या थांबल्या नाहीत. त्यांनी स्वतःचा एक डान्स ग्रुप तयार करण्याचं ठरवलं आणि पुढे हाच डान्स ग्रुप खूप मोठा झाला. आज तोच डान्स ग्रुप ‘मयुरी’ या नावाने ओळखला जातो. आज जवळपास साडे तीन दशकं हा ग्रुप आणि अर्थातच वेरा या भारतीय गीतं, नृत्य पूर्ण जगभरात नेण्याचं काम करत आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पेज वरून त्यांच्या विविध देशांतील कार्यक्रमांची माहिती मिळते. बरं या कार्यक्रमात केवळ डान्सच होतो अस नाही बरं का. या ग्रुप मधील काही जण ही उत्तम गातात सुद्धा. एवढंच नव्हे तर या ग्रुप मार्फत भारतीय संस्कृती विषयीची माहीती ही वेळोवेळी दिली जाते असं त्यांच्या वेबसाईटवर असलेल्या माहितीतून कळून येतं. खरं तर या ग्रुपचा प्रवास खुप मोठा आहे. त्यामुळे लिहावं तेवढं कमीच आहे.

पण आज आपल्या टीमला हा ग्रुप सापडला तो एका व्हिडियोद्वारे. तेव्हा त्याविषयी ही थोडंसं सांगायला हवं. हा व्हिडियो मयुरी ग्रुपच्या काही सदस्यांनी सादर केलेल्या एका नृत्याचा आहे. जवळपास एका दशकापूर्वी हा व्हिडियो अपलोड केलेला होता. पण आजही त्यातील डान्स परफॉर्मन्स हा उत्तम आणि पुन्हा पुन्हा बघवासा वाटतो. या ग्रुपने तेव्हा ‘निंबुडा, निंबुडा’ या गाण्यावर डान्स केला होता. त्याची कोरिओग्राफी ही वेरा यांनी स्वतः केली होती तर सेनिया सिगालोवा या प्रमुख नृत्यांगना म्हणून सहभागी झाल्या होत्या. सेनिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला डान्स इतका उत्तम होता की जवळपास एक करोडहुन अधिकांनी हा व्हिडियो पाहिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात पसंत ही केलेला आहे. या परफॉर्मन्स मध्ये आपल्याला दिसतात त्या सगळ्या रशियन युवती. पण सगळ्यांचा डान्स इतका उत्तम असतो की प्रत्येक स्टेप अगदी एखादी भारतीय युवती जशी करेल त्याचप्रमाणे त्या सगळ्याजणी करतात. तसेच चेहऱ्यावरचे हावभाव ही उत्तम असतात. अनेक वेळेस परदेशी डान्सर्सना भारतीय स्टेप्स जमतात. पण हावभाव मात्र बदलता येत नाहीत. इथे मात्र असं होताना दिसत नाही.

या सगळ्याच जणी गाण्याच्या अनुसार आपले हवभाव बदलत असतात. त्यामुळे जेव्हा नटखट हावभाव असतील किंवा अगदी प्रसन्नपणे वावरायचं असेल तेव्हा त्या त्या प्रमाणे या सगळ्याच जणी चपखल हावभाव दाखवतात. तसेच हा सगळा परफॉर्मन्स एकाच गाण्यावर अगदी अथपासून ते इतिपर्यंत पाहता येतो. त्यामुळे तो आवडून ही जातो आणि लक्षात ही राहतो. आमच्या टीमने ही हा परफॉर्मन्स पाहिला आणि आम्हाला आवडून गेला. म्हंटलं यांच्याविषयी माहिती ही घ्यायलाच हवी. माहिती वाचून ती आपल्या वाचकांना कळायला हवं असं वाटलं आणि त्यातूनच आजचा हा लेख मांडला गेला. तुम्हाला आमच्या टीमचा हा प्रयत्न आवडला असेल अशी अपेक्षा आहे.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *