भारतीय नागरिक हे शिक्षण, व्यवसाय आणि उद्योगधंदे आणि इतर अनेक कारणांनी जगभर पसरलेले आहेत. त्यातही काही देशांमध्ये भारतीय हे काही विशिष्ठ कारणांनी जात असतात. रशिया या देशात भारतीय असण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे तेथील शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणे हे एक असते. अनेक वेळेस वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी म्हणून विद्यार्थी तेथे जातात. आणि जिथे जिथे भारतीय माणूस जातो तेथे तेथे तो स्वतःच्या संस्कृतीची छाप सोडून येतोच. त्यात रशिया सारखा भारतमित्र देश असेल तर बघायलाच नको. कारण भारतीय कलाकार आणि कलांविषयी रशियन कलाकारांना सदैव आदर राहिला आहे हे सर्वश्रुत आहे. तसेच अनेक कलाकार हे भारतीय कलाप्रकारात पारंगत असतात, हे ही आपण जाणतो. त्यांचे अनेक वायरल व्हिडियोज आपण पाहिले असतील.
आज या संगळ्यांची आठवण व्हावी असा एक व्हिडियो आपल्या टीमने पाहिला. परदेशात जेव्हा जेव्हा भारतीय संस्कृतीला साजेसा असं काही सादर होत असत तेव्हा आपल्याला आनंद होतोच. हेच जाणून, आज आपल्या टीमने पाहिलेल्या व्हिडियोविषयी आजचा हा लेख लिहिला जातो आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला अनेक मंडळी एका पार्कात उभी असलेली दिसतात. त्यातही भारतीय मंडळींचा भरणा जास्त दिसून येतो. तसेच त्यांच्या मध्ये एक मुलगी उभी असते. लाल रंगाच्या तिच्या पेहरावामुळे ती सगळ्यांत उठून दिसत असते हे काही वेगळं सांगायला नको. पण सोबतच ती इतरांपेक्षा जास्त हालचाल न करता उभी असते यावरून ती येत्या गाण्यावर डान्स करेल हे कळून येत असतं. आपला हा अंदाज बरोबर ठरतो. गाणं सुरू होतं आणि ही मुलगी ही डान्स करायला लागते. हे गाणं असतं गोलियों की रासलीला – रामलीला या चित्रपटातलं ‘नगाडे संग ढोल बाजे’ ! रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या अभिनय, नृत्य यांनी रंगलेला आणि सुप्रसिद्ध ठरलेला हा सिनेमा. अशा या सुप्रसिद्ध सिनेमातील लोकप्रिय गाण्यावर ही रशियन मुलगी अगदी उत्तम डान्स सादर करते.
काय नाचते हो ! जबरदस्त ! नगाडे संग ढोल बाजे वर ती करत असलेल्या स्टेप्स तर मस्तच वाटतात. पुढेही ती काही स्टेप्स करते त्या विशेष लक्षात राहतात. त्यात जमिनीवर बसून पुढे जाण्याची स्टेप खरं तर अवघड, पण ती स्टेप ही अगदी लीलया करते ही मुलगी. तसेच तिच्या समोर सगळी मंडळी गोलाकार उभी असतात. जागा थोडी कमी असते. पण तरीही उपलब्ध जागेचा पूरेपूर वापर करत ही मुलगी सगळ्या जागेचा वापर करत डान्स करते. तसेच जवळपास चार ते साडेचार मिनिटांचा हा व्हिडियो. पण अजिबात न थकता ही मुलगी नाचत राहते. एखाद्या कलाकृतीबद्दल आत्मीयता असेल आणि सादरीकरण उत्तम करण्याची जिद्द असेल तेव्हाच हे सगळं शक्य होऊ शकतं. या तिच्या परफॉर्मन्स मधून हेच अधोरेखित होतं. तिच्या सगळ्या परफॉर्मन्सचा आनंद आपण घेतो. पण प्रत्तेक कलाकार काही महत्वाच्या गोष्टी नेहमी शेवटच्या क्षणांसाठी राखून ठेवतात. तेव्हाच तर त्यांना प्रेक्षकांना आश्चर्यचकित करता येतं. या परफॉर्मन्स मध्येही हे दिसून येतं. कारण परफॉर्मन्स संपत आलेला असताना ही मुलगी काही पावलं मागे जाते.
तेव्हाच कळतं की ही काही तरी महत्वाची स्टेप करणार आहे. ही स्टेप असते ती स्वतः भोवती गिरकी घेण्याची. अर्थात एक दोन वेळेस असेल तर समजू शकतो. ही मुलगी वीस पेक्षा ही जास्त वेळेस स्वतः भोवती गिरक्या मारते आणि म्हणूनच तिच्याविषयी मनात कौतुक दाटून येतं. हीच भावना तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांची असते. हा परफॉर्मन्स जसा संपतो तसे सगळे जण अगदी टाळ्यांचा कडकडाट करतात. आपणही नकळतपणे त्यात सामील असतो.
असा हा मस्त व्हिडियो आपल्या टीमला आवडला. तसेच याविषयी वाचकांना लेख वाचायला आवडेल असं वाटलं आणि त्यातून हा लेख लिहिला गेलेला आहे. आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला नक्की आवडला असेल अशी अपेक्षा आहे. नेहमीप्रमाणे आपल्या सकारात्मक सूचना आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून कळू द्या. तसेच लेखही आताच शेअर करा बरं का, नंतर विसरून नका जाल. तसेच वाचक म्हणून आपला आणि आपल्या टीममधील स्नेह हा सदैव वाढीस लागू दे हीच सदिच्छा. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!
बघा व्हिडीओ :