Breaking News
Home / मनोरंजन / ह्या रिक्षावाल्या दादांनी ‘वाजले की बारा’ गाण्यावर केलेला लावणी डान्स होतोय वायरल, बघा व्हिडीओ

ह्या रिक्षावाल्या दादांनी ‘वाजले की बारा’ गाण्यावर केलेला लावणी डान्स होतोय वायरल, बघा व्हिडीओ

वायरल वायरल म्हणतो आपण. पण काही व्हिडियोज हे अगदी त्यापलीकडे जातात असं वाटायला लागतं. खासकरून तेव्हा, जेव्हा सोशल मिडियासोबतच प्रथितयश वृत्तसंस्था एखाद्या व्हिडियोची दखल घेतात. असंच काहीसं झालं आहे एका रिक्षावाल्या दादांसोबत. त्यांचं नाव आहे बाबाजी कांबळे. पेशाने रिक्षा चालक असणारे बाबाजी बारामती इथले रहिवासी आहेत. बारामती इथल्या गुणवडी गावचे ते रहिवासी. या गावातल्या ग्रामपंचायतीचे ते सन्माननीय सदस्य आहेत. गेल्या आठवड्यात ते आणि त्यांचे अन्य रिक्षा चालक मित्र नेहमीप्रमाणे पे’ट्रोल पंपावर गॅस भरून घेण्यासाठी गेले. पण तिथे काही तांत्रिक कारणांमुळे उशीर होत होता. पेट्रोल पंपवाल्यांनी त्यांना तीन तास वाट पहावी लागेल, असं सांगितलं. पुन्हा परत जावं आणि यावं एवढं इंधन नव्हतं. मग काय, वाट पाहत थांबावं लागणार हे उघडचं होतं.

मग काय सगळे ओळखीचे जमले होते आणि बाबासाहेबांची गाणी ऐकली जात होती. याच काळात बाबाजी आणि त्यांच्या मित्रांने पाहिलं तर खूप रिक्षावाले मित्र जमा झाले आहेत तर काही तरी अधिक मनोरंजक करू या. म्हणून मग बाबाजींनी ‘वाजले की बारा’ हे गाणं सुरू केलं आणि या लोकप्रिय लावणीवर डान्स करण्याचं ठरलं. त्यांनी डान्स करायला सुरुवात केली आणि त्यांना उपस्थितांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. तसाच प्रतिसाद हा आज महाराष्ट्रभर पाहायला मिळतो आहे. हा डान्स आज महाराष्ट्रात धुमाकूळ घालतो आहे. अनेक सोशल मीडियावरील नेटिझन्स नी एखाद्या लावणीसाम्राज्ञीच्या तोडीस तोड नृत्य केल्याची पोचपावती बाबा कांबळे यांच्या डान्सला दिली आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे अनेक प्रथितयश वृत्तसंस्थानी याचे वार्तांकन केलेले आहे. अनेकांनी अनेक सोशल मीडिया ग्रुप्समधून बाबाजी यांच्या डान्सचा व्हिडियो पाहिला असेलच. या व्हिडियो मध्ये अतिशय तन्मयतेने नृत्य करणारे बाबाजी दिसून येतात. गाणं सुरू झाल्यापासून ते गाणं संपेपर्यंत बाबाजी यांच्या नृत्यविष्कारात कुठेही लक्ष विचलित झालेलं दिसत नाही. तसेच कोणतीही पूर्वतयारी न करता अचानक नृत्य केले असतानाही हावभाव हे गाण्याला शोभेल असे दिसून येतात.

यावरून त्यांचं गाण्यावर आणि नृत्यावर असलेलं प्रेम सहज कळून येतं. तसेच त्यांची निरीक्षण शक्ती किती ती’व्र आहे हे सुद्धा लक्षात येते. या पूर्ण व्हिडियोत त्यांना साथ लाभते ती त्यांच्या रिक्षा चालक मित्रांची. वर उल्लेख केल्याप्रमाणे बाबाजी यांना अगदी सुरुवातीपासून ते गाण्याच्या शेवटच्या कडव्यापर्यंत या मित्रांची साथ लाभते. या मित्रांप्रमाणेच सध्या महाराष्ट्रातील तमाम जनता ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे ते सध्या बाबाजी यांचं कौतुक करताहेत. बाबाजी यांची अनेक वाहिन्यांवरील मुलाखती आपण पाहिल्या असतीलच. त्यातून बाबाजी यांना अगदी लहानपणापासून नृत्याची असलेली आवड प्रतीत होते. तसेच येत्या काळात संधी मिळाल्यास आपली नृत्य कला मोठ्या रंगमंचावर सादर करायला आवडेल असं त्यांच्या बोलण्यातून कळतं. बाबाजी यांच्या या नृत्य कौशल्याचं मराठी गप्पाच्या टीमलाही कौतुक आहेच. बाबाजी यांना मिळत असलेल्या लोकप्रियतेबद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

आपल्याला हा लेख आवडला असेलच. हा लेख आपल्या सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्याला विविध वायरल व्हिडियोज वरील लेख वाचायला आवडत असतील तर आपल्या या वे’बसाई’टवरील स’र्च ऑप्शनचा वापर नक्की करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून स’र्च करा, आपल्याला विविध लेख वाचनास उपलब्ध होतील. तसेच मराठी मनोरंजन क्षेत्राविषयी वाचण्यासाठी मालिका किंवा नाटक किंवा चित्रपट, सिनेमा किंवा वेबसिरीज असं काही लिहून स’र्च केल्यास आपल्याला अजून जास्त लेख वाचायला मिळतील. हे लेख आकाराने छोटे पण माहितीपूर्ण असल्याने आपला वेळ ही वाया जाणार नाही आणि वाचनाचा भरपूर आंनदही आपल्याला लु’टता येईल. मराठी गप्पाचे नियमित वाचक असण्यासाठी मराठी गप्पाच्या टीमतर्फे मनःपूर्वक धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *