मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, पण या बाळाचे पाय काहीतरी वेगळेच सांगत आहे. मोठा होऊन हा मुलगा उत्कृष्ट फुटबॉलपटू होऊ शकतो असं त्याचे पाय सांगू इच्छित आहे. त्याचे वडील त्याला याच गोष्टीसाठी प्रोत्साहन देत आहेत. मुलांच्या हातात मोबाईल देण्याच्या वयात जर योग्य वेळी योग्य गोष्ट दिली तर त्याचं काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ आहे. पुन्हा-पुन्हा पहावा असा हा व्हिडिओ. बापलेकांनी यात एखाद्या फुटबॉल पटूलाही लाजवतील असा परफॉर्मन्स दिला आहे. बालपणात मुलं जितके ऍक्टिव्ह असंतिल तितकं छान खेळणं बागडणं होत. या सगळ्यात जिथे जिथे अडचण येतील तिथे तिथे पालकांनी मदत करावी. आव्हानांवर मात करण्यासाठी चांगले प्रशिक्षण द्या आणि मग अशा तऱ्हेने देशाला चांगले चॅम्पियन्स मिळतात कि नाही ते बघा. मोबाईल मध्ये प’ब्जी आणि इतर व्हिडिओ गेम च्या नादात अनेक वेळा मुलांना जीवही गमवावा लागल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे अशा मोबाईल खेळांपासून सावध राहावे. केव्हा आहे केव्हाही हेच फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. खेळामुळे भवितव्यही सुधारेल आणि उत्साह कायम राहील अशी अपेक्षा करू. या मुलांना ऍक्टिव्ह राहिल्यामुळे त्यांच्या या सगळ्या कलागुणांना वाव मिळत जातो.
आता थोडा पालकांचा बाबतीतही पाहूया. धाकधुकीच्या लाईफ स्टाईल मध्ये मुलांकडे अशाप्रकारे लक्ष देण्याची सवय पालक विसरून गेलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला किमान रोज तासभर तरी देता येईल का याची काळजी घेतली पाहिजे. मुलांना रोज आपल्याशी मनातलं बोलता येत का याचाही मूल्यमापन केला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं की अनेकदा मुलांशी संवाद नसल्याने त्यांचे बालपण कोमेजून जातं. आणि भविष्यही अंधारात जाण्याची शक्यता असते. त्यांना योग्य संगत मिळाली नाही तर ते वाईट मार्गाला जाण्याची जास्त शक्यता असते. नागराज मंजुळे यांचा झुंड हा सिनेमा अशाच काहीशा गोष्टींवर बोट ठेवतो. मुलांच्या गोष्टी बारकाईने बघितल्या तर लक्षात येईल की, त्यांना शिकण्यासाठी फार काही वेळ लागत नाही. काही नव्या गोष्टी ते प्रामुख्याने शिकत जातात, कितीही कठीण अभ्यास असो वा फुटबॉलची टेक्निकल किक असो, आपल्या आवडीच्या विषयात ते लवकर पारंगत होत जातात. त्यांच्या या कलागुणांचा पुढे चांगला वापर होऊ शकतो, मुलांना घडवला म्हणजे एखाद्या मातीच्या गोळ्याला मूर्तीचा आकार देण्या सारखाच कसबीचं काम आहे. ते प्रत्येकाला जमेलच असं नाही, पण आईवडिलांनी मुलांना आपला 100% वेळ जर यात लावला तर ते सत्कारणी लागेल, यात मात्र शंका नाही. प्रत्येकाच्या आवडीनुसार त्याला दिलेलं काम किंवा त्याला दिलेला क्षेत्रातील योगदान भविष्यात त्याला फायदेशीर ठरू शकतो. याची चुणूक या व्हिडिओतून आपल्याला दिसून येते. काय होतं की सारखा अभ्यासाला बस. अभ्यासाला बस. म्हणून अभ्यासही मुलांना नकोसा वाटू लागतो.
मग त्यांना एक क्लासची शिक्षा मुलांच्या माथी मारली जाते. ट्युशनसाठी वेगळा क्लास. शाळेत सहा सहा तास. वेगवेगळे विषय अभ्यासक्रम. त्यानंतर 4-5 ट्युशन साठी जाणार. त्यानंतर पुढील काही तास डान्स क्लास. फुटबॉल क्लास. कोचींग क्लासेससाठी वेळ घालवले जातात. स्विमिंग क्लास असा मुलांचा दिवसच संपूर्णपणे निघून जातो. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठायचं पुन्हा शाळेत जायचं पुन्हा क्लासला जायचं, असं त्यांचं सुरू असते. एखादा दिवस रविवार मिळाला किंवा सुट्टी मिळाली तर त्यांना पालकांची साथ लाभेल, असं काही नाही. कारण त्या दिवशीही ज्यांना वेगळ्या अभ्यासासाठी बसवलं जातं. मग सगळं कंटाळवाणा होऊ शकत. त्यामुळे त्यांच्या पातळीवर उतरून त्यांच्याशी मनाप्रमाणे गोष्टी केल्या तर कदाचित ती बालमूर्ती चांगली घडू शकते. बऱ्याचदा काय होतं ते आपल्या बाळाकडे आपणच लक्ष दिलं नाही, तर इतरच लोक त्याचे संगोपन योग्य प्रकारे करतीलच असं नाही. कारण प्रत्येकाला आपापला वेळ आपल्या आपल्या पद्धतीने घालवायला आवडतो. इतर लोक आपल्या मुलावर तसं काही ही विशेष मेहनत घेतील असं नाही. आपण दिलेला व्हिडीओ सुद्धा ह्या संबंधित आहे. तुम्ही व्हिडीओ पहा बघा किती टॅलेंट आहे ते ह्या मुलामध्ये.
बघा व्हिडीओ :