Breaking News
Home / जरा हटके / ह्या लहानग्या मुलाचे किचनमधील कौशल्य पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल, बघा हा व्हायरल व्हिडीओ

ह्या लहानग्या मुलाचे किचनमधील कौशल्य पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल, बघा हा व्हायरल व्हिडीओ

गेल्या वर्षी याच काळात लॉ’कडाऊन लागला होता आणि सगळं काही ठप्प पडलं होतं. मग अनेकांनी या तेव्हाच्या न्यू नॉर्मल मध्ये वेळ घालवण्यासाठी स्वयंपाक घराची वाट धरली. मग काय एकेक नवनवीन रेसिपीज समोर येऊ लागल्या. एरवी कामाच्या रागाड्यात लपलेले ‘शेफ’ मग सोशल मीडिया वरती आपल्या रेसिपीज शेअर करु लागले आणि प्रशंसा मिळवू लागले. एक वर्ष पूर्ण होता होता या आठवणी पुन्हा ताज्या न होतील तरच नवल. या आठवणींना उजाळा मिळत असतानाच एक जुना वायरल व्हिडियो आमच्या टीमला दिसला. एका लहान मुलाने चपात्या लाटण्याचा हा व्हिडीओ. हे वाचून सहज वाटू शकतं की काय असेल त्या व्हिडियोत. तर एखादं मुल किचन मध्ये लुडबुड करतानाचा व्हिडियो असेल आणि गंमत येईल. काही अंशी सत्य आहे. पण या मुलाच्या हातच्या चपात्या म्हणजे १० पैकी १० मार्क असलेल्या चपात्या बघा म्हणजे अगदी गोलाकार. एखाद्या निष्णात खानसाम्याने तयार केल्या सारख्या.

या व्हिडियोत हा चिमुरडा कणकेचा गोळा घेतो. त्यास हलकासा मळतो आणि मग त्याला तेल लावतो. मग लाटणं घेऊन इतक्या सफाईने पोळी लाटतो की त्याचं कौतुक वाटल्यावाचून राहत नाही. एवढ्याश्या वयात त्याला कसं जमत असेल हे सगळं म्हणून आश्चर्य वाटत राहतं. बरं त्यात कॅमेऱ्यामागून कोणी तरी त्याला त्याचं नाव विचारतात. तर अंकित असं उत्तर येतं. पूर्ण नाव सांगावं बाळा असं म्हंटल्यावर मग अंकित महेंद्र वाघ असं संपूर्ण नाव तो सांगतो. त्याच्या लहान वयाला शोभेल असं त्याचं बोलणं चालू असतं. हे सगळं सांगायचं महत्व हे की कितीही बडबड चालू असली तरीही चपाती मात्र एकदम झकास बनवतो. एका अर्थाने हे कौशल्यंच.

अशा या कौशल्यवान छोटू शेफ विषयी थोडी जास्त माहिती घेतली असता तो राहणारा पुण्याचा असल्याचं कळतं. काही प्रथितयश वृत्त वाहिन्यांनी केलेल्या त्याच्या वरील बातमीत त्याच्या कुटुंबातील सदस्यांविषयी माहिती मिळते. तसेच अतिशय लहान असल्यापासून तो किचन मधील कामांमध्ये रस घेत असल्याचे कळतं. याची खात्री पटते ती अंकित याच्या युट्युब चॅनेल वरून. गेली काही वर्षे वेळोवेळी अंकित याने किचन मध्ये केलेली मदत या युट्युब चॅनेल द्वारे बघता येते.

जसा तो चपात्या उत्तम लाटतो तसाच भाकऱ्या आणि पराठे थापून देण्यात आघाडीवर असतो. त्याच्या एका व्हिडियोत तर हा लहानगा छानसं सँडविच करताना ही दिसतो. त्याच्या अवघ्या सहा ते आठ वर्षांच्या वयात, रेसिपीज करण्याची त्याची आवड आपल्याला थक्क करून सोडते. जसजसे दिवस पुढे जात आहेत तसतसा अंकित ही आपल्या कौशल्यांना एक स्टेप पुढे घेऊन जाताना दिसतो आहे. काही महिन्यांपूर्वी या युट्युब चॅनेल वर त्याचा एक व्हिडिओ अपलोड केला गेला होता. ज्यात त्याने अवघ्या काही सेकंदात पूर्ण चपाती लाटून तयार केली होती. हे करत असताना कॅमेऱ्यामागून त्याचे वडील त्याला प्रोत्साहन तर देत होतेच सोबत त्याची काळजी घेतानाही दिसत होते. त्यामुळे अंकितच्या या आवडीला त्याच्या घरच्यांच्या असलेला पाठिंबा आश्वासक वाटतो. येत्या काळात अंकित हा नवीन जमान्याचा मास्टर शेफ म्हणून नावारूपास आल्यास त्याच आश्चर्य वाटणार नाही, पण अभिमान नक्की वाटेल. या लिटिल शेफ ला आमच्या टिमकडून त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! तसेच त्याला खंदा पाठिंबा देणाऱ्या त्याच्या आई वडिलांना मानाचा मुजरा !

आपल्याला हा लेख आवडला असणारचं. तेव्हा हा लेख आठवणीने शेअर करा. पण मग तुम्हाला वायरल व्हिडियोज वरील दुसरे लेख ही वाचायचे असतील ना. मग इतर कुठे जाऊ नका. आमच्या वे’बसाई’टवर असलेल्या स’र्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून स’र्च करा. आमच्या टीमने अतिशय मेहनतीने अनेक वायरल व्हिडियोज वर लेख लिहिले आहेत. त्यांचा आस्वाद घ्या. आपल्या नियमित पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.