Breaking News
Home / जरा हटके / ह्या लहानग्या मुलाने डोळ्यांवर पट्टी बांधून जी कला सादर केली ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल, बघा व्हिडीओ

ह्या लहानग्या मुलाने डोळ्यांवर पट्टी बांधून जी कला सादर केली ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल, बघा व्हिडीओ

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ही सुप्रसिद्ध म्हण आपण ऐकली किंवा वाचली असेल. अनेक वेळेस जेव्हा मोठ्या वयाच्या आणि यशस्वी व्यक्तींचा आयुष्यातील प्रवास आपण पाहतो तेव्हा आपल्याला ही म्हण आठवते. कारण अनेक वेळेस त्यांनी मोठया वयात गाजवलेल्या कर्तृत्वाची पाळंमुळं कुठे तरी बालपणात दडलेली असतात, हे निरीक्षणाअंती कळतं. पण काही वेळेस हे गुण सुप्तावस्थेत असतात आणि वाढत्या वयासोबत पुढे येत जातात. काही मुलांच्या बाबतीत मात्र लहानपणापासून भविष्यात ते बरंच मोठं यश संपादन करू शकतात, असं वाटणाऱ्या घटना घडत असतात. किंबहुना त्यांनी दाखवलेली बुद्धिमत्ता आपल्याला त्यांच्या उज्ज्वल भविष्याविषयी आश्वस्त करते. आज हे सगळं मांडण्याचं कारण म्हणजे आपल्या टीमने पाहिलेला एक वायरल व्हिडियो. हा व्हिडियो आहे एका चिमुकल्याचा. अवघ्या एका मिनिटाचा हा व्हिडियो.

पण यातून त्याचं कौशल्य बघून मन जसं हरखून जातं तसंच आश्वस्त ही होतं. मन हरखून जाण्याचं कारण म्हणजे हा चिमुरडा खरंच चिमुरडा आहे हो. जेमतेम ४-५ वर्षे वय असेल याचं. पण पियानो हे वाद्य तो अशाप्रकारे हाताळतो की एखादा मोठा मुलगा ते हाताळत असावा, असा भास व्हावा. योहान जॉर्जकुट्टी असं या छोट्या जादूगाराचं नाव. मूळचा केरळ मधला हा छोटा बाळ. त्याच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी तो पियानो वाजवू शकतो, हे त्याच्या पालकांच्या लक्षात आलं. बाळाचे पाय पाळण्यात दिसले म्हणा ना. आपल्या पाल्यात असलेलं हे वेगळं कौशल्य बघून त्यांनीही त्याला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. सुदैवाने या काळातले विविध व्हिडियोज बघण्यास उपलब्ध आहेत. यातील एक व्हिडियो म्हणजे आमच्या टीमने पाहिलेला व्हिडियो. या व्हिडियो मध्ये योहान डोळ्यावर पट्टी बांधून पियानोवर आपली जादुई बोटं फिरवताना आणि त्यातून आपल्या भारतीय राष्ट्रगीताचे स्वर उमतावताना दिसतो. व्हिडियोच्या सुरुवातीसपासून ते शेवटा पर्यंत पूर्ण वेळ त्याच्या डोळ्यावर पट्टी असते. पण एखाद्या गोष्टीचा सराव असेल तर उत्तम कामगिरी साधता येते.

इथेही तसंच दिसून येतं. कशावरून ? तर आपलं राष्ट्रगीत हे जवळपास ५२ सेकंदांत पूर्ण होतं. योहान सुद्धा जवळपास तेवढाच वेळ घेतो. त्याचं लहान वय पाहता आणि डोळ्यावर पट्टी असताना त्याने जास्त वेळ घेतला असता तरीही कोणाचा आक्षेप नसता. पण या छोट्याश्या जादूगाराची मेहनत फळास येते म्हणू. अगदी योग्य वेळेत तो हे राष्ट्रगीत पूर्ण करतो. त्याचं कौतुक वाटतं त्यामुळे त्याच्या विषयी जास्त माहिती घ्यावी, असं वाटत राहतं. युट्यु’ब वर सर्च केलं असता त्याच्या नावाचं युट्यु’ब चॅनेल ही दिसतं. या चॅ’नेल ला पाहिल्यावर तर अजून उर अभिमानाने भरून येतो. कारण एवढ्याशा मुलाकडून आपण कशाची अपेक्षा करू शकतो? बालगीतं, बडबडगीते वगैरे ! पण हे छोटे महाशय तर जगतविख्यात बिथोवेन यांनी साकार केलेल्या सुरावटीही अगदी लीलया पियानोवर वाजवताना दिसतात.

तसेच ख्रि’श्चन सॉंग्ज, ओ’णम साठीचं गीत ही आपल्या पियानोवर सादर करताना हा चिमुकला दिसतो. तसेच त्याच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ही त्याने केलेलं पियानोवादनही आपल्याला बघता येतं. त्याचवेळी या चिमुकल्याच्या या कलेची नोंद ‘इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये घेतल्याचं कळतं आणि आपल्याला मनापासून आनंद होतो. या चिमुरड्याचं कौतुक करावं तेवढं थोडं. मराठी गप्पाच्या आपल्या टिमकडून या छोट्या जा’दूगाराला मनःपूर्वक शुभेच्छा आणि भरपूर आशिर्वाद.

आपल्याला हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा, जसे तुम्ही नेहमीच करता. तसेच खास तुमच्या सारख्या नियमित वाचकांसाठी आपली टीम सातत्याने विविध विषयांवर लेखन करत असते. तेव्हा हे नवनवीन लेख आवर्जून डोळ्याखालून घाला. तुम्हाला हे लेख नक्की आवडतील याची आम्हाला खात्री आहे. आपल्या वेळेसाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ:

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *