असं म्हणतात कि लहान मुलं हि देवाघरची फुलं असं म्हणतात. ह्याचे मुख्य कारण म्हणजे हि लहान मुलं निरागस असतात. परंतु याच निरागसपणाने जेव्हा ही लहान मुलं, काही वेळेस असं काही वाक्य बोलून जातात, की भल्या भल्यांची बोलती बंद होते. त्यांच्या तोंडून अचानक निघालेल्या काही वाक्यांमुळे आपल्यासमोर केवळ हास्याशिवाय काही उत्तर नसते. तसेच त्यांच्या बाललीला ही आपल्या हमखास हसायला लावतात. गेल्या काही महिन्यांत आपल्या मराठी गप्पावर आपण अशाच काही बाललीला अनुभवल्या आहेत. कारण लॉक डाऊन मुळे घरी असलेल्या कलाकारांनी आपल्या मुलांसोबतचे पोस्ट केलेले व्हिडियोज होय. त्या मुलांच्या निरागस बोलण्याने आणि वागण्याने आपलं मनोरंजन झालंच. पण या कलाकारांच्या चाहत्यांच्या घरीही काही वेगळी परिस्थिती होती अशातला भाग नाही. कोणा ना कोणा परिचितांच्या घरी हे असं घडताना आपण प्रत्येकाने पाहिलं असेलंच. अशाच एका छोट्या मुलीचा व्हिडियो सध्या सोशल मिडियावरती प्रसिद्ध होतो आहे.
व्हिडिओमध्ये मुलगी घरातील एका मोठ्या व्यक्तीसोबत बोलताना दिसून येत आहे. तिच्या जवळच अभ्यासाची पाटी असून तिच्या चेहऱ्यावरून मात्र अश्रू येत आहेत. परंतु त्या पाठीवरती अभ्यास करायला हि मुलगी टाळाटाळ करत आहे. कारण काय तर बिचाऱ्या त्या मुलीला टीव्हीवरची मालिका पाहायची इच्छा आहे. आता तिच्या अभ्यासाची वेळ आणि मालिका एकत्र येत असाव्यात, त्यामुळे घरातील मोठी व्यक्ती तिला अभ्यास करायला सांगते आहे. पण शेवटी तिच्या रडवेल्या चेहऱ्यापुढे हार मानते आणि तिला मालिका पाहण्याची परवानगी देते. हे इतक्या गोड पद्धतीने चाललंय की बघणाऱ्याला अगदी हसू आवरत नाही. व्हिडियोच्या सुरुवातीलाच तिला विचारण्यात येतं, की तिला काय पाहायचं आहे. तिच्याकडून मग मालिकांची नावं सांगितली जातात. यात माझ्या नवऱ्याची बायको, अग्ग बाई सासूबाई, माझा होशील ना यांची नावं ही मुलगी घेते. मग व्यक्तिरेखांची नावं येतात. मग तिला प्रश्न विचारणारे असं म्हणतात की तुला अभ्यास करायला आवडतो का? तर उत्तर नाही असं येतं.
परंतु टीव्ही बघायला आवडेल का असं विचारलं असता, हो असं उत्तर येतं. शेवटी तिला टीव्ही बघायची परवानगी मिळते. तेव्हा कुठे तिचं रडणं थोडं कमी होतं. पण मग तिला असं विचारण्यात येतं, की ती लिहीत असलेली पाटी आणि पेन्सिल फेकून दिली तर चालेल का ? यावर मात्र तिचं जे उत्तर येतं आणि ते ऐकून हा व्हिडीओ पाहणारा हसत सुटतो. कारण ही छोटी मुलगी म्हणते की, नका टाकू पाटी, उद्या लागणार आहे. म्हणजे आज टीव्ही पाहायचा असला तरीही उद्याची शाळेची चिंता आहेच. या संपूर्ण व्हिडीओत त्या मुलीचा चेहरा हा रडवेला दिसतो. पण तिचं निरागस बोलणं आणि रडत असली तरीही जे वाटतं ते सांगणं यांमुळे हा व्हिडीओ पाहाणाऱयांच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटवतो. आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, तुम्ही नक्की पहा. आणि व्हिडीओ कसा वाटला, हे सांगायला विसरू नका.
बघा व्हिडीओ :