Breaking News
Home / मनोरंजन / ह्या लहानग्या मुलीचे बोलणं ऐकल्यावर तुमचा देखील दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ

ह्या लहानग्या मुलीचे बोलणं ऐकल्यावर तुमचा देखील दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ

लहान मुलं आणि त्यांच्यातील कलागुण म्हणजे आपल्यासाठी कौतुकाचा आणि काही वेळेस आश्चर्याचा विषय असतो. कारण ही लहान मुलं, कधी काय बोलून जातील आणि कशी वागतील याचा नेम नसतो. बरं यात काही वावगं असावं असं ही नाही. ही छोटी मंडळी, उपजत निरागसपणाने वागत असतात. तसेच त्यांच्यात असलेल्या उपजत कुतूहल वृत्तीने प्रश्न विचारत असतात. तसेच जे मनात ते ओठात या पद्धतीने वागत असतात. त्यामुळे एकाचवेळी या लहानग्यांच्या सहवासात आपल्याला खूप छान वाटतं, तर कधी कधी त्यांचे प्रश्न ऐकून उत्तरं द्यायची आपली गोची होते.

पण बरेचदा असंही होतं की त्यांचं वागणं आपल्याला एवढं खळखळून हसवतं की इतर कोणीही त्याची बरोबरी करू शकणार नाही. अगदी एखादा आघाडीचा विनोदवीर जरी आला तरी या मुलांची निरागस मांडणी त्यालाही जमणार नाही. याचाच प्रत्यय आमच्या टीमला एक दोन दिवसांपूर्वी आला. आमच्या टीमने एका चिमुकलीचा भन्नाट विनोदी व्हिडियो पाहिला. अर्थातच विनोदवीर स्वतः लहान असल्याने विनोदही लहानांचे होते. पण बालिश नव्हते. त्यात असलेला एक समान धागा नक्कीच विचार करायला लावणारा होता. त्या समान धाग्याची ओळख व्हिडियोच्या सुरुवातीलाच होते.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला वर उल्लेख केलेली चिमुरडी मुलगी दिसून येते. मस्त पैकी फुलफुलांचा हेअर बँड घालून आणि हातात माईक घेऊन उभी असते. आता हातात माईक असला तर गाणं वगैरे म्हणणार असेल असं वाटतं. पण नाही. ही चिमुरडी चक्क स्टॅण्ड अप कॉमेडी सादर करते. तिला स्वतःला कदाचित याची जाणीव नसावी. पण तिचं सादरीकरण हे जसं विनोदी असतं तसचं विचार करायला लावणारं असतं. किंबहुना स्टॅण्ड अप कॉमेडी करणारे अनेक जण यानुसारच वागत असतात. समाजातील वैगुण्यावर हसत हसत बोट ठेवत खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देत असतात. अर्थात या मुलीने या स्टॅण्ड अप कॉमेडी मधून उपस्थित केलेले प्रश्न अगदी गहन प्रश्न नाहीयेत. ते ऐकून आणि त्यांना आई वडीलांची मिळणारी उत्तरं ऐकून हासायलच येतं. पण तरीही, ‘स्वातंत्र्य तर तुम्हा मोठ्यांना मिळालं, आम्हा लहानांचं काय’ हा धागा कायम दिसत राहतो. अदृश्य असतो पण परिणामकारक ठरतो. आणि या सगळ्याचं श्रेय दोन व्यक्तींना जातं. एक ज्यांनी कोणी ही स्क्रिप्ट लिहिली आहे त्यांना आणि दुसरं अर्थातच या गोंडस मुलीला ! कारण तिने ज्या आत्मविश्वासाने हा विनोदाचा प्रकार सादर केला आहे त्यास तोड नाही. तसेच त्यात अभिनयाची पण पेरणी केलेली आहेच. त्यामुळे हेल काढून बोलणं, चेहऱ्यावरचे हावभाव बदलणे हे सगळं या छोटीच्या परफॉर्मन्स मध्ये डोसून येतं.

अर्थात सगळं सुरळीत होतं असं नाही. गुलाबजाम आणि बटर चिकनचा विषय निघाल्यावर गाडी थोडावेळ थांबते. बहुधा मनात ते चित्र तरळून गेलं असणार. पण खर सांगायचं तर याच निरागसतेमुळे हा व्हिडियो एवढा सुंदर होतो. तसेच पुन्हा पुन्हा पहावा अस वाटतं. आमच्या टीमने तर हा व्हिडियो खूप वेळा पाहिला. त्यातील एक दोन वेळा पाहिला तो हा लेख लिहावा म्हणून. त्यानंतर मात्र केवळ आणि केवळ निखळ मनोरंजन म्हणून हा व्हिडियो पाहिला गेला. कारण हल्ली कॉमेडी किंवा त्यातही स्टॅण्ड अप कॉमेडी प्रकारात होणारे विनोद बहुधा मोठ्यांसाठीच असतात. त्यातही द्वियर्थीपणा असतोच. त्यामुळे निखळ मनोरंजन हरवत चाललंय की काय अस वाटू लागत. पण हे असे व्हिडियो बघितले की बरं वाटतं. भर तळपत्या उन्हातून घरी आल्यावर थंड पाणी प्यावं, मग कसं वाटतं. अगदी शांत वाटतं. तसंच हे व्हिडियो बघून बाहेरच्या कोलाहलातून बाहेर पडून निरागस शीतलता अनुभवली की वाटतं. असो. लिहीत राहिलो तर इथेच हा लेख अजून लांबेल. त्यापेक्षा आम्ही इथे थांबतो. तसेच आपल्याला या व्हिडियोचा आनंद ही घेता यायला हवा ना. त्यासाठी खासकरून आमच्या टीमने सदर व्हिडियो या लेखाच्या शेवटी शेअर केला आहे. हा लेख वाचून झाल्यावर आपण हा व्हिडियो बघू शकता.

बरं तर मंडळी, आता थांबतो. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या टीमचे अन्य लेखही आपण वाचले असतीलच. नसतील वाचले तर सदर व्हिडियो बघून झाल्यावर जरूर वाचा. कारण आपली टीम आपल्या वाचकांसाठी अगदी शोधून शोधून विषय निवडत असते. त्यावर माहिती घेऊन लिहीत असते. दिसलं काही तरी आणि लिहून दिलं अस होत नाही. अनेकवेळा तर विविध विषयांवर लिहिताना खूप वेळ ही जातो. पण आमची लिहायची आणि आपली वाचायची आवड यासाठी आम्ही हे अगदी मनापासून करत असतो. पुढेही करत राहू. गरज आहे ती आपल्या खंबीर पाठिंब्याची ! तो कायम मिळत राहू दे ही सदिच्छा ! लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या, आमचे सगळे लेख वाचा आणि आठवणीने शेअर करा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *