Breaking News
Home / जरा हटके / ह्या लहानश्या मुलाने जे काम केले ते मोठे सुद्धा करत नाहीत, बघा व्हिडीओ

ह्या लहानश्या मुलाने जे काम केले ते मोठे सुद्धा करत नाहीत, बघा व्हिडीओ

गेल्या काही वर्षांत पर्यावरणविषयक जनजागृती मोठया प्रमाणावर होताना दिसते. यातून मानवी जीवन आणि पर्यावरण यांचा किती घनिष्ठ संबंध आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. बहुतांशी तो यशस्वी होताना दिसतो. पण तरीही त्यास अजून १०० % यश मिळालेले नाही. यास कारणीभूत ठरतात त्या आपल्याच सवयी. मानवी कचऱ्यासंदर्भातील सवयी तर नित्याच्याच. आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडित. कचरा हा कचरा कुंडीत टाकावा आणि आजूबाजूस टाकू नये हा साधा नियम. पण दुर्दैवाने आपल्यापैकी अनेक जणं हा साधासा नियम पाळताना दिसून येत नाहीत. पण मग अशा नियम न पाळणाऱ्या मोठया व्यक्तींच्या मानाने लहान मुलं बेहत्तर असं वाटतं. यास पुष्टी देणारा एक व्हिडियो आमच्या टीमला नुकताच गवसला. तसा जुनाच व्हिडियो आहे.

पण या अर्ध्या मिनिटांच्या व्हिडियोत स्वयंशिस्त कशी असू शकते हे कळून येतं. या व्हिडियोत एक चिमुरडा आपल्या कुटुंबियांसमवेत एके ठिकाणी गेलेला असतो. बरेच जण फिरत असतात. कचरा होणार पण तो एके ठिकाणी गोळा व्हावा या हेतूने तेथे एक कचरा कुंडीही ठेवलेली असते. पाण्याचे कप वगैरे टाकण्याची व्यवस्था म्हणून. पण आपल्याला चित्र काय दिसतं, तर कचरा हा त्या कचरा कुंडीत असण्यापेक्षा त्याच्या बाहेरच जास्त असतो. पण हा चिमुकला कोणीही न सांगता हा कचरा त्या कचरा कुंडीत टाकायला सुरुवात करतो. पहिला एक कप, मग दुसरा असं त्याचं चालू असतं. कचऱ्यात कुठे काय करतो म्हणून एक व्यक्ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते खरी, पण हा पठ्ठ्या पुन्हा दुसऱ्या बाजूने कचरा उचलायला सुरुवात करतो. त्याचं हे सफाईकाम चालूच राहतं. आजूबाजूने येणारे जाणारे काही जण त्याच्या या कृतीकडे पाहत असतात. शेवटी पलीकडून एक काका येऊन या मुलाला बाजूला करतात आणि हा व्हिडियो सुद्धा संपतो.

अनेक वेळेस मुलं घरी सुद्धा खेळणी असू द्या किंवा इतर काही गोष्टी हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एखाद्या बॉक्स मध्ये टाकताना दिसतात. पण बाहेर जेव्हा असं काही करतात तेव्हा आपल्यालाच वाईट वाटतं. त्यांनी असं करू नये असं वाटतं. काही वेळेस आपण समजावतो, ओरडतो. पण हेच जर कचऱ्याच्या बाबतीत केलं तर कि’ळस वाटते. पण कुठे तरी या अस्ताव्यस्त कचऱ्यासाठी आपल्या सारखी मोठी माणसंच जबाबदार नाहीत का. समोर कचरा कुंडी दिसत असूनही त्यात कचरा न टाकणे हे योग्य नव्हेच. यावर उपाय म्हणून आपण या गंभीर विषयावर सजग होऊन सार्वजनिक स्थळांवर स्वच्छतेबाबत स्वयंशिस्त अंगी बाणवणं कधीही योग्य. यावर आपल्याला काय वाटतं ते आम्हाला क’मेंट्स मध्ये नक्की लिहून कळवा. तसेच स्वच्छतेबाबतची जनजागृती पसरवण्यात आपलाही हातभार लागेल हे पाहुयात. आपल्या टीमने लिहिलेले अन्य लेखही नक्की शेअर करा. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *