Breaking News
Home / मनोरंजन / ह्या लहान मुलाचा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, संस्कार असावे तर असे

ह्या लहान मुलाचा व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, संस्कार असावे तर असे

मनोरंजन आणि सोबत प्रबोधन हे माणसाच्या आयुष्यात अतिशय महत्वाचे असते. कारण यामुळे आपल्याला थकलेल्या मनाला जशी विश्रांती मिळते त्याप्रमाणे दैनंदिन आयुष्यात आपलं वर्तन,आचार विचार कसे असावेत यासाठी अमूल्य असं मार्गदर्शन मिळतं.यासाठीच उत्तम उदाहरण म्हणजे भजन आणि कीर्तन. अतिशय रसाळ भाषेत, दैनंदिन उदाहरणं देत आणि लोकांना आनंद वाटेल अशा पद्धतीने लोकांचं प्रबोधन करण्याचं श्रेय भजन आणि कीर्तन यांना जातं. आजही कित्येक शतकांची ही परंपरा आपल्या महाराष्ट्रात जपली जाते आहे. याला कारण, प्रत्येक पिढीने या दोन्ही कलांचे महत्व ओळखून त्यांना जपून ठेवलेलं आहे. येणारी पिढी सुदधा यात मागे नाही अशीच काही चिन्हे कधी कधी आपल्यास बघावयास मिळत असतात. आपल्या टीमने आज बघितलेला व्हिडियो याचं उत्तम उदाहरण म्हणायला पाहिजे.

हा व्हिडियो केवळ ३० सेकंदांचा आहे.पण यात आपल्याला एक छोटा मुलगा आणि बाकीची मोठी मंडळी भजनात अगदी रंगून गेलेली दिसतात. खरं तर या छोट्याचं वय बघता त्याने भजन कीर्तनात रस घेण्याचे कारण वाटत नाही. पण असे असूनही त्याचा यात असलेला सहभाग हा सुखावून जातो. त्याला यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या त्याच्या पालकांचं यानिमित्ताने कौतुक वाटत राहतं. व्हिडियो सुरू होतो तेव्हा ज्ञानराज माऊलींचा गजर एव्हाना सुरू झालेला असतो. व्हिडियोत डाव्या बाजूला पेटी वाजवत एक दादा बसलेले असतात.

समोरच टाळ घेऊन अनेक मंडळी बसलेली असतात. आणि त्या मोठ्यांमध्ये कोणतीही भीडभाड न बाळगता, अगदी आत्मविश्वासाने बसलेला असतो तो हा चिमुकला. त्याचं अगदीच कमी वय पाहून सर्वप्रथम कुतूहल आणि कौतुक या दोन्ही भावना आपल्या मनात दाटून येतात. सोबत गजर चालू असतो म्हंटल्यावर आपणही त्यात नकळतपणे सामील होऊन जातो. अगदी लोकल ट्रेननेही प्रवास करताना जसे आपण भजनी ग्रुप्स सोबत सामील होत गायला लागतो अगदी त्याप्रमाणेच इथेही होतो. भजनाची म्हणून एक आसक्ती असते ती येथे अनुभवता येते. तेवढ्यात या छोट्यावर आपलं लक्ष खिळून राहतं. कारण सुरुवातीस अगदी जोरजोरात टाळ वाजवणारा हा चिमुकला आता इतरांसारखा लयीत टाळ वाजवायला लागतो. तेव्हढ्यात काही क्षणांत सगळेच अगदी वेगाने टाळ वाजवायला लागतात. त्यांच्या वेगाशी स्वतःला जुळवून घेत हा छोटा टाळ वाजवत राहतो. या टाळ वादनात तो अगदी गुंगून गेलेला असतो. त्याचं हे गुंगून जात टाळ वाजवणं आपल्याला अगदी भावून जातं. त्याच्या बाजूला बसलेल्या प्रत्येकाची तीच अवस्था असते. त्याच्या उत्साहाचं कौतुक वाटत असतं. पुढे एका क्षणी त्याच्या हातातली टाळ काहीशी सरकते म्हणून तो थांबतो. अन्यथा त्याच टाळवादन सातत्याने सुरू राहतं.खरं तर हा व्हिडियो खूप वेळ चालावा अस आपल्याला अगदी मनापासून वाटत असतं. पण तसं होत नाही आणि अवघ्या तीस सेकंदात हा व्हिडियो संपतो. खरं तर एवढ्या कमी वेळात समाधान वाटेल अस काही अनुभवणं म्हणजे विरळच.

पण या चिमुकल्याच्या ऊर्जेने भारलेला हा व्हिडियो आपल्याला मनापासून समाधान देऊन जातो. आपणही नकळतपणे नामस्मरण केल्याने अजून छान वाटत असतं. जर समजा आपण कामाने अगदी त्रस्त असू तर त्यावेळी मनावरचं दडपण काहीसं कमी करण्यात हा व्हिडियो मदत करतो. आपण हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला हा अनुभव आला असेल. नसेल बघितला तर नक्की बघा. आपल्या टीमला हा व्हिडियो आवडला आहेच, आपल्याला ही तो आवडेल हे नक्की.

तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख ही आपल्या पसंतीस उतरला असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करत आली आहे आणि यापुढेही करत राहील. गरज आहे ती आज आपला जो पाठिंबा आम्हाला मिळतो आहे तो यापुढेही मिळत राहण्याची. आणि आम्हाला खात्री आहे की तो पाठिंबा आम्हाला यापुढेही मिळत राहीलच. त्यानिमित्ताने आजपर्यंत आपण जो पाठिंबा आणि प्रोत्साहन आम्हाला देत आला आहात त्याबद्दल धन्यवाद. तसेच हा लेख इतर लेखांप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर शेअर करा. माऊलींच्या गजराचा आपण घेतलेला आनंद इतरांनाही घेऊ द्यात आणि ब्रम्हानंदी लिन होऊ द्यात.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *