Breaking News
Home / मनोरंजन / ह्या लहान मुलाने केलेला जगावेगळा डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

ह्या लहान मुलाने केलेला जगावेगळा डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

संगीत आणि त्यासोबत येणारं नृत्य असे हे असे दोन कलाप्रकार अगदी वैश्विक म्हणावे असेच. जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात निदान या दोहोंचा वापर करत कलाकृती, मनोरंजन यांची निर्मिती होत असते. काही वेळेस तर अगदी सहज म्हणून या कलाप्रकारांत काही सादर केलं जातं. पण हल्लीच्या सोशल मीडियाच्या जगात सहज म्हणून केलेलं काही तरी सुद्धा वायरल होऊन जातं. असाच एक वायरल व्हिडियो आपल्या टीमने पाहिला. त्यातील आनंद आपल्या टीमने तर घेतलाच आणि सोबतच आपल्या वाचकांना सुदधा याचा आनंद घेता यावा म्हणून आजचा हा लेख लिहीत आहोत. चला तर मग या वायरल व्हिडियोविषयी जाणून घेऊयात. हा वायरल व्हिडियो आहे एका लहान मुलाच्या अतरंगी डान्सचा. यात त्याला साथ लाभली आहे ती अजून एका लहान मुलाची. या दोघांनी केलेला डान्स तर अगदी धमाल म्हणावा असाच असला तरी यातील पहिला मुलगा असा काही नाचतो की तोच आपल्या जास्त लक्षात राहतो.

व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा आपल्याला समोर एक मोठा समूह दिसून येतो. बरेचसे जण उभे राहून कॅमेऱ्याच्या उजव्या बाजूस काही तरी बघत असतात. तसेच सगळे हलके हलके डुलत असतात. पण या ग्रुपच्या बाजूलाच वर उल्लेख केलेली दोन मुलं उभी असतात. एव्हाना आपल्या कानावर ही गाण्याची धून पडायला लागलेली असते. ही गाण्याची धून खरच ऐकल्यापासून मन डोलायला लावणारी अशीच वाटते. आपल्या समोर नाचणाऱ्या मुलाचं ही तसच काहीसं झालं असावं. पण या त्याच्या मन डोलण्यासोबतच त्याच तन ही अस काही डोलत असतं की विचार नका. अगदी लयीत कंबर हलवत त्याचा डान्स सुरू असतो. त्याची ही स्टेप चट्कन चेहऱ्यावर हसूच आणते. दुसरं काही सुचत नाही. त्याच्या सोबत असलेल्या मुलाची ही आपल्यासारखीच अवस्था असावी. पण मग तो ही आपल्या या मित्रासोबत डान्स करायला लागतो. त्याचीही कंबर हलायला लागते. पण पहिल्या मुलाच्या डान्समध्ये असणारी लय याच्या डान्समध्ये दिसून येत नाही. एव्हाना आपण समोर पाहिलं तर बाकीची मंडळी ही डान्स करत असतात. पण त्या सगळ्यांपेक्षा या मुलाचा डान्स अगदी आवडून जातो. तसच आतापर्यंत आपल्या कानावर केवळ संगीत पडत असतं.

आता या संगीताला जोड मिळते ती शब्दांची. आपल्याला शब्द कळत नाहीत. पण आपल्या मानेने धरलेला ठेका मात्र कायम असतो. इथे या मुलाने ही त्याच्या स्टेप्स बदललेल्या असतात. हात फैलावत आणि थोडीशी जास्त जागा घेत आता तो नाचत असतो. तेवढ्यात बाजूने अजून तिसरं मूल येत आणि ते ही या दोघांमध्ये सामील होऊ पाहतं. याच नादात हा व्हिडियो कधी संपतो ते कळत नाही. अवघ्या एका मिनिटाचा असा हा व्हिडियो आहे. पण हे एक मिनिट सुद्धा आपलं मनोरंजन करण्यास पुरेसं ठरतं. यात अंतर्भूत असलेलं गाणं हे बलोची असल्याचं कळतं. त्यामुळे हा डान्स होत असलेला प्रांत सुद्धा बलोच इथला असावा असा अंदाज करायला हरकत नाही. आपल्याला हा व्हिडियो आवडतो तो त्यातील त्या मुलाचा निरागसपणा आणि त्याने अगदी मनापासून कोणाचीही भीडभाड न बाळगता केलेल्या डान्स मुळे. कोणतीही कला, भीडभाड न बाळगता अगदी स्वच्छंदपणे सादर झाली की आवडतेच आणि तिचा आनंद घेता येतोच. असो.

आपण हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याही आवडला असणारच. तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्या पसंतीस उतरला असणार हे नक्की. आपली टीम नेहमीच आपल्या वाचकांसाठी विविध विषयांवर लेखन करत आलेली आहे आणि यापुढेही करत राहील. आवश्यकता आहे ती आपला पाठिंबा सातत्याने मिळत राहण्याची जो आजही सातत्याने मिळतो आहे. यापुढेही तो असाच मिळत राहील हे नक्की. आपले लेख वाचत राहा, शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *