Breaking News
Home / मनोरंजन / ह्या लहान मुलाने केलेला डान्स पाहून तुम्हीही कौतुक कराल, बघा हा व्हिडीओ

ह्या लहान मुलाने केलेला डान्स पाहून तुम्हीही कौतुक कराल, बघा हा व्हिडीओ

पंजाबी माणूस कसा असतो? असं भारतात कुणालाही विचारलं तरी एकदम सरळसोट उत्तर येईल. प्रामाणिक, दिलखुलास, स्वतःही दणकून खाणारा तसेच सर्वांना खाऊ घालणारा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनमौला, मनसोक्तपणे जगणारा. कोरोना काळात घर घर लंगर ही सेवा खूप लोकांना कळली. त्यापाठीमागे हजारो पंजाबी माणसांचे हात होते. पंजाबी संस्कृती ही ‘मके दि रोटी, सरसो दा साग’ किंवा मोठ्या ग्लासमधील अमृतसरी घट्ट लस्सी ही पंजाबच्या खानपान पद्धतीची ओळख होय. आणि पंजाबमधील कला संस्कृती बघायला गेलं तर भांगडा डान्स सगळ्यात फेमस. म्हणजे भलेही तुमच्या-माझ्या सारख्या अनेकांना हा डान्स माहिती नसेल. नाचायला गेलं तर पंजाबी डान्स सगळ्यात फेमस. हो जायेगी बल्ले, बल्ले… हो गई तेरी बल्ले, बल्ले… आणि काला कव्वा काट खायेगा, अशा अनेक गाण्यांवर आपण भांगडा डान्स केला असेल.

ढोल घेऊन नाचणारे, गाणारे अनेक पंजाबी तुम्ही बघितले असतील. आता भांगडा डान्स हा पंजाब व्यतिरिक्त इतर राज्यात सुद्धा केला जातो. पंजाबी लोक जिथे जातात तिथे ते त्यांची संस्कृती घेऊन जगतात. त्यांची सर्व संस्कृती, खानपान, राहणीमान आणि नृत्य या 3 गोष्टी तर ते कधीच सोडत नाहीत. एकदा का ढोल वाजायला सुरू झाला आणि एखाद्या पंजाबी माणसाने भांगडा सुरू केला तर आपलेही अंग डुलायला लागते. खरं तर हा डान्स पंजाबप्रमाणेच जम्मू मधील डोग्रा (योद्धा) जमातीतील पुरूषही भांगडा नृत्य करतात. सर्वात महत्वाची बाब म्हणजे भांगडा डान्समधील अंगविक्षेपांवर निर्बंध नसतात. जे काही करायचं ते पंजाबी लोकांच्या स्वभावाप्रमाणे… एकदम मनसोक्त आणि मनमुरादपणे… जोशपूर्ण, उत्साह व उत्स्फूर्त अशा या मुक्त नृत्यआविष्कार क्षमतेमुळे भारतीयांबरोबरच परदेशीयांचेही या डान्सविषयीचे आकर्षण वाढत आहे. त्यामुळेच राष्ट्रीय लोकनृत्य म्हणण्याइतपत ह्याची लोकप्रियता वाढलेली आहे. आता याच डान्सचा एक भन्नाट असा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिले आहे. एक छोटा पंजाबी मुलगा एकदम मनसोक्तपणे एका पंजाबी गाण्यावर डान्स करत आहे. एखादा समंजस माणूस जसा गाण्यावर एकदम भारी एक्सप्रेशन्स देऊन नाचतो, त्याच पद्धतीने हा मुलगा नाचत आहे. हे गाणं फार फास्ट आणि उडत्या चालीवरच नसलं तरीही या मुलाचा डान्स बघून आपण हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघतो. गाणं शुद्ध पंजाबत असल्याने आपल्याला शब्द कळत नाहीत. पण तो मुलगा ज्या पद्धतीने नाचतो, बिट पकडतो आणि हातवारे करतो, त्यावरून गाण्याचे शब्द काय असतील, याचा आपण अंदाज बांधू लागतो. दो वारी जट असं या गाण्याचं नाव असून अवघ्या 1 मिनिटाचा हा व्हिडीओ आहे. तब्बल 14 लाख लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे.

हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.