Breaking News
Home / मनोरंजन / ह्या लहान मुलाने केलेल्या स्टेप्स पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा अतरंगी डान्स व्हिडीओ

ह्या लहान मुलाने केलेल्या स्टेप्स पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा अतरंगी डान्स व्हिडीओ

आपल्या पैकी प्रत्येकाला कलेची आवड ही असतेच. ती ही अगदी लहानपणापासून. कारण एकप्रकारे कलेचं सादरीकरण करणं असो वा हे सादरीकरण बघणं असो, आपल्याला आनंद देऊन जातं. पण होतं काय की कामाच्या रहाटगाडग्यात आपली आवडती कला पाठीशी राहून जाते आणि मग कधी काळी अचानक अशी काही घटना घडते की आपलं कलेवर असणारं जून प्रेम अचानक जागृत होतं. अनेक वेळेस लहान मुलांना आपली आवडती कला सादर करताना आपल्याला नॉस्टॅल्जिक झाल्यासारख हमखास वाटतं.

कारण लहान मुलं त्यांची आवडती कला सादर करताना अगदी मनापासून सादरीकरण करत असतात. बरं त्यात हल्लीची लहान मुलं ही नक्कीच हुशार आहेत. त्यामुळे अनेक वेळेस आपल्या अपेक्षेपलिकडे जाऊन ही छोटी मंडळी आपल्याला चकित करतात. याचीच ग्वाही देणारा एक व्हिडियो आज आपल्या टीमने बघितला. आता आम्हाला सांगा, डान्स हा कलाप्रकार कोणाला आवडत नाही? बहुतेक सगळ्यांनाच आवडणारा हा कलाप्रकार आहे. म्हणूनच की काय वायरल व्हिडियोज मध्ये डान्सच्या वायरल व्हिडियोजचं प्रमाण हे लक्षणीय असतं.

आजचा हा व्हिडियो ही असाच डान्स वायरल व्हिडियो आहे. हा एका लहान मुलाचा डान्स व्हिडियो आहे हे सुज्ञ वाचकांनी ओळखलं असेलच म्हणा. या डान्स व्हिडियोत हा मुलगा आपल्याला हिप हॉप हा डान्स प्रकार सादर करताना दिसतो. त्याच्या डान्स मुव्ह्ज केवळ आपलं लक्ष वेधून घेत नाहीत तर आपलं मन सुद्धा जिंकून घेतला. टीप टीप बरसा पानी या गाण्यावर त्याने केलेला हा परफॉर्मन्स खरंच भाव खाऊन जाणारा ठरतो. इतका की अनेकांनी आपल्या युट्युब चॅनेल वरून या व्हिडियोला अपलोड करत या मुलाचं कौतुक केलेलं आहे. त्यातील बहुतांश व्हिडियोज वर पडलेला व्ह्यूज आणि लाईक्सचा पाऊस पाहून आपल्या पैकी जवळपास प्रत्येकाला हा डान्स आवडला असंच वाटतं.

अर्थात याचं सगळं श्रेय त्या मुलाला आणि ज्या व्यक्तिने हा व्हिडियो रेकॉर्ड केला आहे त्यांना जातं. या मुलाला हा डान्स प्रकार कुठून तरी कळला असावा आणि आवडला ही असावा असं दिसतं. या आवडीतूनच मग त्याने हा छोटेखानी परफॉर्मन्स दिला असणार. त्यामुळेच की काय या पूर्ण परफॉर्मन्स भर त्याची चर्या उत्साही दिसते आणि आनंदाने उजळलेली असते. खरं तर त्याचे कपडे जुने वाटतात आणि तो एक गरीब कुटुंबातील मुलगा वाटतो. त्यामुळे तो डान्स क्लासेस वगैरे ना जात नसावा. त्यामुळे त्याने केलेला परफॉर्मन्स हा त्याच्या स्वतःच्या निरीक्षण शक्तीतून आला असावा याची शक्यता जास्त आहे. त्यामुळेच त्याचं जास्त कौतुक वाटतं. तसेच तो आपली कला त्याच्या पद्धतीने जोपासतो आहे हे बघून ही बरं वाटलं.

आपणही जर हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आवडून गेला असणारच. तसेच थोडासा नॉस्टॅल्जिक ही करून गेला असणार हे नक्की. हा रॉकस्टार येत्या काळात एखाद्या रियालिटी शो मधून तरी पूढे यावा असं आपल्याला वाटून गेलं असणार हे नक्की. पण जर का हा छोटेखानी परफॉर्मन्स आपण बघितला नसेल तर जरूर पहा. जास्त वेळ लागणार नाही, पण एकदा बघून आपलं मनही भरणार नाही हे नक्की. आपण हा व्हिडियो पुन्हा पुन्हा बघाल या छोट्याच्या डान्सचा आनंद घ्याल हे नक्की.

तसेच मंडळी, आजचा हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *