Breaking News
Home / मनोरंजन / ह्या लहान मुलाने नववधूला हटके स्टाईलमध्ये केलेला प्रपोज होतोय वायर’ल, पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल

ह्या लहान मुलाने नववधूला हटके स्टाईलमध्ये केलेला प्रपोज होतोय वायर’ल, पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल

लहान पोरं आणि त्यांचं वागणं हे नेहमीच आपल्या कौतुकाचे विषय राहिलेले आहेत. त्या लहान पोरांचं हसणं, बागडणं इतकंच काय तर रागावणं सुद्धा आपल्याला हवंहवंसं वाटतं. त्यांचा निरागसपणा भावतो. त्यांचं किती कौतुक करू नी किती नको असं होतं. अर्थात अस असलं तरी मुलामुलींमध्ये ही स्वभावाचा फरक असतोच. त्यामुळे कौतुक सगळ्यांविषयी वाटत असलं तरी काही जणांविषयी कौतुक हे अंमळ जास्त असतं.

खासकरून जी मुलं चुणचुणीत असतात त्यांच्याविषयी जरा जास्तच कौतुक असतं. कारणही तसंच असतं. कारण ही मुलं जे काही करतात ते अगदी आत्मविश्वासाने करतात. तसेच त्यांना जसजसं जास्त प्रोत्साहन मिळत जातं, तसतसे ते अजून प्रगती करत जातात. त्यातही काही मुलामुलींमध्ये लहानपणापासून शोमनशीप असते हे जाणवतं. त्यांचं वागणं, बोलणं यातून हे अगदी प्रकर्षाने जाणवतं. अशा मुलांमध्ये जसा आत्मविश्वास जबरदस्त असतो तसाच कालाक्षेत्राची आवड ही असते. अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात हे सुज्ञ वाचक जाणतातच. पण सहसा अशी छोटी मंडळी एखादी कला परफॉर्म करू लागली की त्यांचं विशेष कौतुक वाटतं. त्यातही एखाद्या लग्नात वगैरे ही मंडळी असतील तर बघायला नको.

सगळ्या लहान मुलामुलींच नायकत्व अघोषितपणे या मुलामुलींकडे येतं. तसेच मोठी माणसं सुद्धा त्यांच्याकडे कौतुकाने पाहतात. त्यातही यांना डान्सची आवड असेल तर दुधात साखरच जणू ! कारण लग्न म्हंटलं की गाणी आणि डान्स हे आलेच. मग काय विचारता, या छोट्या मंडळींची धमाल असते. अगदी नवरा नवरीच्या पुढ्यात जाऊनही ही मंडळी डान्स करून येतात. ते ही अगदी आत्मविश्वासाने ! कधी कधी वाटतं, हा एवढा आत्मविश्वास येतो कुठून एवढ्याश्या जीवांमध्ये ?याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडियो आपल्या टीमने नुकताच बघितला. हा व्हिडियो एका लग्नातील आहे हे काही वेगळं सांगायला नको. व्हिडियो सुरू होतो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला एक मस्त गाणं ऐकायला येतं. ते गाणं आणि व्हिडियो जसजसा पुढे सरकतो तसतसा एक छोटा मुलगा आपल्याला चालत येताना दिसू लागतो. पिवळ्या रंगाच जाकीट आणि काळ्या रंगाची पॅन्ट असते. सोबत हातात गुलाबाचं फुल असतं. यावरूनच लक्षात येतं की हा काही तरी डान्स तरी करेल नाही तर एखादी करामत करून दाखवेल.

आपला दुसरा अंदाज बरोबर येतो. पण ही करामत बघण्याआधी त्याचा अभिनय ही पाहता येतो. तो हातातील गुलाब घेऊन थेट नवरी मुलीकडे जातो. सगळा परफॉर्मन्स सेट असल्याने नवरीमुलगी ही अगदी साभिनय तो गुलाब घेणं नाकारते. आता पुढे काय होत बघूया म्हणेपर्यंत हा मुलगा पुन्हा मुळजागी येतो. आणि मग तिथून कोलांट्या उड्या मारत शेवटी अगदी थाटात तिच्या समोर मगासचाच गुलाब सादर करतो. आधीच त्याच्या निरागस वागण्याने खुश असलेली नवरीमुलगी आता त्याच्या या कारामतीने अजून खुश होते. त्यामुळे तिने अगदी आनंदाने तो गुलाब स्वीकार करणं हे होतंच. आता हा सगळा परफॉर्मन्स ठरवून केलेला असतो हे काही वेगळं सांगायची गरज नाही. पण या चुणचुणीत मुलामुळे त्यात अजून रंग भरतात आणि तो बघायला आवडतो हे नक्की. आपल्या टीमने हा व्हिडियो बघितला आणि आम्हाला आवडून गेला. आपल्या वाचकांना ही याविषयी जाणून घ्यायला आवडेल अस वाटलं आणि त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेलेला आहे.

आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *