Breaking News
Home / मनोरंजन / ह्या लहान मुलाने पार्टीमध्ये सर्वांसमोर केला अफलातून डान्स, बघा एकदा हा व्हिडीओ

ह्या लहान मुलाने पार्टीमध्ये सर्वांसमोर केला अफलातून डान्स, बघा एकदा हा व्हिडीओ

बॉडी असून पण एकदम ढासू नाचणारे 2 च सुपरस्टार बॉलिवूडमध्ये आहेत. पहिला म्हणजे हँडसम हंक, लाखो दिलो की धडकन हृतिक रोशन आणि दुसरा म्हणजे आताच नविन नवीन असलेला टायगर श्रॉफ… जॅकी श्रॉफचा पोरगा. आता हे दोघेही अभिनयासाठी कमी आणि डान्ससाठी जास्त ओळखले जातात. विशेषतः टायगर श्रॉफला अभिनय येत नसेल तरीही डान्सच्या जीवावर त्याची फिल्म चालून जाते. आजकाल डान्सचे रिऍलिटी शो आल्यामुळे डान्सविषयी लोक जागरूक झाले आणि अनेक लोकांनी मुलांना डान्समध्ये करियर करण्यात परवानगी दिली. एवढंच नाही तर या क्षेत्रात करिअर होऊ शकते, याचाही अंदाज आणि आत्मविश्वास मुलांना आला. त्यामुळे आता दर 2 घरामागे 1 तरी पोरगा डान्स क्षेत्रात असतोच असतो. आम्हीही तुम्हाला कायम डान्स करत असलेले अवलिया दाखवत असतो, जे नॉर्मल डान्सपेक्षा काहीतरी वेगळं करतात आणि आपली वेगळी क्षमता दाखवून देतात.

असाच एक व्हायरल झालेला व्हिडीओ आमच्या टीमकडे आला आणि आम्ही हा डान्स बघून चाट झालो. आम्ही लै आटू-पटू लोक बघितले पण हे असले अचाट क्षमता असलेली पोरं बघितले की, आम्हाला आमचं बालपण आठवतं. म्हणजे असं आठवतं बघा… ज्या वयात आम्ही फार फार तर गोट्या आणि इट्टी-दांडू खेळायचो आणि घरी पाव्हने आले तर त्यांच्यासमोर जायला सुद्धा लाजायचो. त्याच वयात आताची पोरं युट्यूब बगलेत, डान्स करतेत. आणि पाहुणे आले तर स्वतः पाहुण्यांसमोर जाऊन डान्स पण करतेत. आता आज ज्या पोराचा व्हिडीओ आमच्याकडे आला आहे, त्याचं वय असेल फार फार तर 8 वर्षे. म्हणजे दुसरीत असेल बॉ तो. आम्ही मात्र या वयात बे एके बे, बे दुणे चार करायचो. डान्स तर सोडा… मधल्या सुट्टीत खेळायला गेलो तरी चड्डी धरून पाळावा लागायचं. मात्र त्याच वयातील आजची पोरं… हजारो पब्लिक समोर असताना एकदम टाईट-फिट कपड्यात येतात आणि सगळ्यांसमोर नादखुळा डान्स करून लोकांना दिवाना करून जातेत.

असाच नादखुळा डान्स या पोराने केला आहे. हा पोरगा पुढे जाऊन सेम हृतिक नाहीतर टायगरसोबत नक्कीच झळकणार. असं आम्हाला वाटून गेलं, इतकाच भारी डान्स केला त्याने. आता या बारक्या पोराचा डान्स म्हणजे फक्त डान्स नाही बर का… हा डान्स म्हणजे एनर्जी, एक्सप्रेशन्स आणि वातावरण प्रसन्न करणार एक पॅकेज आहे. याचा डान्स आणि उत्साह बघून आपलाही मूड भारी बनून जातो.

आता हा व्हिडीओ एवढा व्हायरल का झाला? आम्ही या पोराचं एवढं कौतुक करतोय तर व्हिडीओ बघावाच लागणार ना भाऊ… हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *