Breaking News
Home / मनोरंजन / ह्या लहान मुलीने सर्वांसमोर ‘दिलबर दिलबर’ गाण्यावर केला अप्रतिम डान्स, शेवट नक्की बघा

ह्या लहान मुलीने सर्वांसमोर ‘दिलबर दिलबर’ गाण्यावर केला अप्रतिम डान्स, शेवट नक्की बघा

सोशल मीडियामुळे आपल्या आयुष्यात बरेच सकारात्मक आणि नकारात्मक बदल झाले आहेत आणि होत आहेत. पण या सगळ्यांतील एक ठसठशीत सकारात्मक बदल म्हणजे अनेक होतकरू तरुणांना आपली कला सादर करण्यासाठी मिळालेलं हक्काचं व्यासपीठ होय. कारण या व्यासपीठावर जगाच्या कानाकोपऱ्यातुन कुठेही असलो तरी स्वतःला व्यक्त होता येतं. त्यामुळेच की काय अनेकांनी या माध्यमातून स्वतःतील कला सादर करण्यास सुरुवात केली.

बरं यात केवळ तरुणांचा समावेश आहे असं ही नाही. आबालवृद्ध सगळ्यांनी वेळोवेळी या नवं माध्यमाचा वापर करत आपले सुप्त कलागुण पेश केलेले आहेतच. त्यातूनच मग अनेक जण पूढे सोशल मीडिया आयकॉन, इन्फ्लुएन्सर्स झालेले दिसून येतात. पण असं असलं तरी आपल्या आजूबाजूला होणारं प्रत्येक सादरीकरण हे काही सोशल मिडियासाठी केलेलं नसतं. अनेक वेळेस कलेचं सादरीकरण हे केवळ एखादया समारंभापुरतं मर्यादित असतं. पण तरीही कोणी तरी त्याचं रेकॉर्डिंग केल्याने अनाहूतपणे हे सादरीकरण सरतेशेवटी सोशल मीडियावर येतं.

जर हे सादरीकरण उत्तम असेल तर आपल्याला आपसूक आवडून जातं हे नक्की. आज आपल्या टीमने एक व्हिडियो पाहिला आहे जो अशाच पद्धतीचा असावा असं वाटतं. या व्हिडियोतून एका लहान मुलीचा गोड डान्स बघण्याची संधी मिळाली. डान्स करतानाचा तिचा हसरा चेहरा बघूनच आपलं मन खुश होतं. बरं का, लहान मुलांची ही एक खासियत जरूर असते. त्यांचं निरागस हसणं आपलं मन आपोआप जिंकून जातं. या व्हिडियोच्या बाबतीत ही तेच होतं. तिचं हसणं, तिची डान्स करतानाची उत्सुकता यांमुळे हा सगळा डान्स परफॉर्मन्स बघून आनंद वाटतो. बरं यात वापरलेलं गाणं ही मस्त आहे आणि लोकप्रिय सुदधा. दिलबर दिलबर हे मूळ गाणं तर आपण जाणतोच. सुश्मिता सेन आणि संजय कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आहे. सिर्फ तुम या चित्रपटातील हे लोकप्रिय गाणं आहे. तसेच याचं नवीन व्हर्जन ही गेल्या काही वर्षांपूर्वी आपल्याला बघायला मिळालं होतं. त्यात नोरा फतेही यांचा जबरदस्त डान्स बघायला मिळाला होता. असो. जर आपणही या लहनगीचा डान्स व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आवडला असेलच.

तसेच वर उल्लेख केलेली मूळ गाणी ही आठवली असतील. पण आपण जर हा व्हिडियो बघितला नसेल तर एकदा पहा. या छोट्या मुलीचा हा गोड परफॉर्मन्स आपल्याला आवडून जाईल हे नक्की. तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *