Breaking News
Home / मनोरंजन / ह्या लुंगीवाल्या काकांनी भर रस्त्यात केल्या खतरनाक स्टेप्स, पाहून प्रभुदेवाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही

ह्या लुंगीवाल्या काकांनी भर रस्त्यात केल्या खतरनाक स्टेप्स, पाहून प्रभुदेवाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही

काही दिवसांपूर्वी इंटरनेटर डब्बू अंकलचा डान्स व्हायरल झाला होता. त्यांनी गोविंदाच्या सुपर हिट गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता. त्यानंतर पुन्हा सोशल मीडियावर आपल्या मराठमोळ्या वाईच्या सुर्वे काकांचा एक अफलातून डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. त्यांनी या व्हिडिओत अमिताभ बच्चनचा प्रसिद्ध ‘डॉन’ या चित्रपटातील ‘खाय के पान बनारसवाला’ या व्हिडिओवर जबरदस्त डान्स केला होता. आता अजून एका अशाच लुंगी वाल्या अंकलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

या डान्स करणाऱ्या काकांचे वय जास्त असले तरीही ते एखाद्या तरुणाप्रमाणे फिट आहेत. विशेष म्हणजे याआधी जे 2 काका व्हायरल झाले होते, ते ज्या स्टाइलने डान्स करत होते, ती साधी होती आणि त्या काकांचे वय जास्त असल्याने ते लोकप्रिय झाले. या काकांचे मात्र थोडे उलटे झाले… यांचे वय कमी असले तरी त्यांनी इतका जबरदस्त डान्स केला आहे, त्यामुळे ते व्हायरल झाले.

सोशल मीडियाचं विश्च अगदीच मजेदार आहे. या माध्यमात एक वेगळीच ताकद असल्यामुळे लहान मुलांपासून ते तरुण आणि वृद्धसुद्धा यावर सक्रिय असतात. आपल्या भोवाताली असणारे काही काका किंवा काकूसुद्धा यामध्ये मागे नाहीत. सध्या अशाच एका काकांचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ आपल्याला पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या ताकदीची आणि लोकप्रियतेची प्रचिती करुन देतोय. या व्हिडीओमध्ये काकांनी केलेला डान्स एखाद्या तरुण, तडफदार आणि नव्या दमाच्या डान्सर मुलालाही लाजवेल असाच आहे.

तर या व्हायरल व्हिडीओत आपल्याला दिसून येईल की, साधारण चाळीशीच्या घरातील वय असणारा व्यक्ती 2-3 लोकांच्या समोर डान्स करत आहे. आपल्याला वाटतं की, हा माणूस चेष्टा करतोय… मात्र पुढे ज्या स्टाईलने या काकांनी थेट डान्सचा गुरू प्रभु देवाच्या गाण्यावर डान्स केला आहे, तो एकदम अफलातून आहे. इतक्या सेम टू सेम डान्स स्टेप्स याआधी कुणीच नव्हत्या केल्या. विशेष म्हणजे या काकांचे कुठलेही प्रोफेशनल डान्स शिक्षण झालेले नाही. फक्त बघून बघुन ते एवढा भारी डान्स शिकले आहेत.

हे काका प्रभू देवाच्या साऊथ गाण्यावर नाचले आहेत. विशेष म्हणजे त्यांचा पोशाखही एकदम।पारंपरिक आहे, या गाण्यावर नाचताना ते आपल्याला शर्ट आणि लुंगीवर दिसून येतात. 1993 मधील Gentleman या चित्रपटातील प्रभु देवाचं प्रसिद्ध गाण ‘चिक्कू बुक्कू रायली’ यावर या काकांनी कडक डान्स केला आणि तो शूट करून कुणीतरी सोशल मीडियावर व्हायरल केला.

या व्हिडीओमध्ये हे काका प्रभु देवाच्या डान्सची हुबेहुब नक्कल करताना दिसत आहे. या काकांनी थेट मूनवॉक पण केला आहे. सोशल मीडियावर या काकांचा डान्स जबरदस्त व्हायरल होतोय. सोशल मीडियावर या व्हिडीओला आतापर्यंत सर्वाधिक व्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ Instagram वर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *