एकेकाळी आपल्या अभिनयाने आणि नृत्याने साऱ्यांनाच अभिनेता गोविंदाने वेड लावलं होतं. गोविंदाची झलक जरी दिसली तरी चेहऱ्यावर हास्य यायचं. गोविंदा म्हणजे डान्स, गोविंदा म्हणजे कॉमेडी, गोविंदा म्हणजे भन्नाट अभिनय… हे सगळे गुण एकत्र असणारा गोविंदा एकेकाळी सुपरस्टार होता. अमिताभ बच्चन यांच्यानंतर गोविंदाचे नाव घेतले जायचे. जसा काळ बदलला तसे गोविंदाला बदलायला जमले नाही, मात्र त्याने केलेल्या भूमिका, डान्स या गोष्टींनी आजही लोकांच्या मनात घर केले आहे. खरं पाहिलं तर बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा याचा डान्स म्हटल्यावर बॉलीवूडमधले भले भले डान्सर फिके पडतात. अशा डान्सर गोविंदाची अदाच काही वेगळी आहे. सध्या सोशल मीडियावर गोविंदाच्या गाण्यावर सेम टू सेम डान्स करणाऱ्या 2 पोरींचा एक भारी असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याला प्रेक्षकांची मोठी दाद मिळाली आहे. त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.
काही नेटकऱ्यांनी त्या डान्सची तुलना ही थेट गोविंदाशी केली आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ गोविंदानं बॉलीवूडमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. 90 च्या दशकांत गोविंदाचे जे चित्रपट प्रदर्शित झाले त्यात त्याच्या डान्सला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. बॉलीवूडमधील लोकप्रिय डान्सर म्हणून गोविंदाची वेगळी ओळख त्याच्या चाहत्यांना परिचित आहे. अगदी त्याची हीच एकमेव ओळख आजही टिकून आहे आणि इथून पुढेही टिकून राहील. 1998 च्या ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील या जोडीला चाहत्यांची जबरदस्त पसंती मिळाली होती. या चित्रपटातील ‘मेरे प्यार का रस जरा चखना, ओये मखना’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. एवढेच नाही, तर या गाण्यातील गोविंदाने केलेला डान्स अजूनही लोकांच्या लक्षात आहे.
अगदी गोविंदासारखे कडक एक्सप्रेशन्स देत सेम स्टेप्स नाचणाऱ्या 2 पोरींचा नादखुळा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओतील मुलींचा डान्स एवढा जबरदस्त आहे, की तो पाहून लोकांना थेट चित्रपटातील गोविंदाच्याच डान्सची आठवण येत आहे. या व्हिडिओत दोन्ही मुली गोविंदा स्टाईलमध्ये जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. या डान्समुळे या दोन्ही मुली रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. गोविंदाचे या गाण्यात जसे किलर हावभाव आहेत, अगदी तसेच हावभाव या मुलींचे आहेत. डान्सला तर यांच्या तोडच नाही. सुरुवातीलाच यांचा डान्स पाहून आपल्याला वाटतं की, या पोरी एकदम जबरदस्त डान्स करणार आहेत, आणि पुढे ते खरे होताना दिसते. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :