जेव्हा पण आपण सुंदरतेविषयी चर्चा करतो तेव्हा नेहमी बॉलिवूड अभिनेत्रींचा चेहरा समोर येतो. आणि ह्यात काही चुकीचेही नाही आहे. कारण त्या खरंच खूप सुंदर असतात. परंतु आज आम्ही तुम्हांला काही वेगळ्या विषयांवर सांगणार आहोत. बॉलिवूडमध्ये येण्यासाठी तुम्हांला चांगल्या अभिनय येणे आवश्यक असते परंतु एक कॉमेडियन बनण्यासाठी तुमच्यामध्ये स्वतःचे वेगळे टॅलेंट असणे गरजेचे असते. बॉलिवूडमध्ये असे अनेक कॉमेडीअन्स आहेत ज्यांनी टॅलेंटच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. आपण बॉलिवूडच्या अश्या अनेक कलाकारांना ओळखतो जे आपल्याला जोरजोरात हसवतात. परंतु आज आपण त्याच्या ग्लॅमरस पत्नी बद्दल जाणून घेणार आहोत. आम्ही तुम्हांला लोकप्रिय कोमीडियन्सच्या पत्नीसोबत ओळख करून देणार आहोत ज्या मीडियाच्या प्रसिद्धीच्या झोकात खूप कमी आहेत, परंतु त्यांची सुंदरता काही कमी नाही आहे. चला तर एक एक करून पाहूया आपल्या लोकप्रिय कॉमेडीयन्सच्या पत्नी.
जॉनी लिव्हर
एका जमान्यात जॉनी लिव्हरची कॉमेडी जवळजवळ सर्व मोठ्या बजेट चित्रपटात पाहायला मिळायची. ह्यानंतर हळूहळू जॉनी लिव्हर चित्रपटापासून दूरच होत गेला. आताही जॉनी लिव्हरचा कॉमेडीचा तडका काही चित्रपटांमधून आपल्याला पाहायला मिळतो. जॉनी लिव्हर ह्यांच्या पत्नीचे नाव सुजाता आहे. दोघांनाही एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगी जॅमी लिव्हर एक स्टँडअप कॉमेडियन आहे. तर मुलगा जेस ह्याने काही चित्रपटांत काम केले आहे.
परेश रावल
परेश रावल ह्यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुरुवातील त्यांनी व्हिलन म्हणून बॉलिवूडमध्ये नाव कमावले. परंतु त्यानंतर मात्र ‘हेरा फेरी’, ‘वेलकम’, ‘हंगामा’, ‘भागामभाग’ ह्यासारखे अस्सल विनोदी चित्रपट करून एक भन्नाट कॉमेडियन म्हणून आपली छबी निर्माण केली. परेश रावल ह्यांच्या पत्नीचे नाव स्वरूप संपत असून त्यांनी काही हिंदी चित्रपटांत आणि टेलिव्हिजन मध्ये काम केले आहे. त्याच प्रमाणे स्वरूप संपत ह्यांनी १९७९ मध्ये मिस इंडिया स्पर्धा सुद्धा जिंकलेली आहे. आता त्या समाजसेविका असून दिव्यांग मुलांना अभिनय शिकवतात. परेश रावल आणि स्वरूप संपत ह्यांना दोन मुले असून, आदित्य आणि अनिरुद्ध अशी मुलांची नावे आहेत.
कपिल शर्मा
भारतीय टेलिव्हिजन जगातील सर्वात लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा एक ३८ वर्षीय अभिनेता आहे. कपिल शर्माने अनेक कॉमेडी सर्कस शो चे विजेतेपद जिंकलेले आहेत. कपिलने ‘द कपिल शर्मा शो’, ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ आणि ‘कॉमेडी सर्कस शो’ मधून खूप लोकप्रियता मिळवली. तो २००७ पासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. त्याच्या पत्नीचे नाव गिन्नी चतरथ असून, दोघांचेही २०१८ मध्ये लग्न झाले होते.
राजू श्रीवास्तव
भारतीय टेलिव्हिजनच्या दुनियेत कपिल शर्मा नंतर कॉमेडीमध्ये राजू श्रीवास्तवचे नाव येते. सध्या राजू श्रीवास्तव प्रसिद्धीपासून दूर दिसून येत आहे. राजू श्रीवास्तवच्या पत्नीचे नाव शिखा आहे. त्यांना दोन मुले आहेत, मुलगी अंतरा आणि मुलगा आयुष्यमान श्रीवास्तव. राजू श्रीवास्तवचा छोटा भाऊ दिपू श्रीवास्तव सुद्धा एक स्टँडअप कॉमेडियन आहे.
अली असगर
‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ ह्या शो मध्ये ‘दादी’ चे पात्र साकारणारा अभिनेता अली असगरने आपल्या ३० वर्षाच्या अभिनय कारकिर्दीत अनेक मोठे रिऍलिटी शो आणि टीव्ही सीरिअल मध्ये काम केले आहे. परंतु कपिलच्या शो मध्ये त्याला खूप लोकप्रियता मिळाली. त्याच्या पत्नीचे नाव सिद्धीका असगर आहे. २००५ मध्ये दोघांचे लग्न झाले होते.
कृष्णा अभिषेक
कपीलच्याच शो मध्ये काम करत असणारा आणि लोकप्रिय कॉमेडियन कृष्णा अभिषेक ह्याच्या पत्नीचे नाव कश्मीरा शाह आहे. जी अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटांत काम केले आहे. कश्मिरा शाहने अनेक मराठी चित्रपटांत आपल्या अभिनयाची कमाल दाखवलेली आहे. कश्मिराने ‘लालबाग परळ’, ‘रेवती’, ‘शिकारी’ ह्यासारख्या मराठी चित्रपटांत काम केले आहे.
राजपाल यादव
आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना हसवणाऱ्या अल्पावधीतच लोकप्रिय होणाऱ्या राजपाल यादवने अनेक बॉलिवूड चित्रपटांत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. राजपाल यादवच्या पत्नीचे नाव राधा असून दोघांचे २००३ मध्ये लग्न झाले होते.
सुनील ग्रोवर
सुनील ग्रोवर ला तर सर्वच ओळखतात, ज्याने ‘गुत्थी’ आणि ‘डॉक्टर गुलाटी’ सारखे लोकप्रिय पात्र निभावून आपल्या सर्वांना पोटभरून हसवलं आहे. सुनील ग्रोवर च्या पत्नीचे नाव आरती आहे. ती लाइमलाईटमध्ये खूपच कमी दिसून येते.
किकू शारदा
किकू शारदाच्या पत्नीचे नाव प्रियांका शारदा आहे आणि दोघेही एकत्र ‘नच बलिये’ मध्येसुद्धा दिसून आले होते. आणि तेव्हाच लोकांना माहिती झाले होते कि किकू शारदा ची पत्नी तर खूपच सुंदर आणि प्रेमळ आहे.
चंदन प्रभाकर
कपिलच्या शो मध्ये चंदू चायवाल्याचे पात्र साकारणारा अभिनेता चंदन प्रभाकर हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. चंदन प्रभाकर हा कपिल शर्माचा बालपणीचा मित्र आहे. चंदनने अनेक कॉमेडी शो मध्ये एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून काम केले. त्याच्या पत्नीचे नाव नंदिनी खन्ना असून दोघांचेही २०१५ मध्ये लग्न झाले. नंदिनी खन्ना खूपच सुंदर आहे.