Breaking News
Home / मनोरंजन / ह्या लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीने मुलांच्या ग्रुप सोबत केला जबरदस्त डान्स, पाहून तुमचे देखील पाय थिरकू लागतील

ह्या लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीने मुलांच्या ग्रुप सोबत केला जबरदस्त डान्स, पाहून तुमचे देखील पाय थिरकू लागतील

आपलं मनोरंजन हा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा घटक असतो. कारण सततच्या कामाने कंटाळा आलेला असतो आणि त्यावरचा जालीम उपाय म्हणजे मनोरंजन. बरं मनोरंजन हल्लीच्या काळात ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही स्वरूपात मिळत. पण गंमत अशी की ऑफलाईन स्वरूपात असलेलं मनोरंजन जर चित्रित केलं आणि त्याचा फोटो अथवा व्हिडियो सोशल मीडियावर अपलोड केला तर आपसूक ते ही ऑनलाईन मनोरंजन होतंच. आणि खरं सांगायचं तर अनेक वेळा प्रेक्षकांसाठी हे सोयीस्कर ठरतं.

आता बघा ना, आपल्याल एखादा कलाकार आवडत असतो. अनेक वेळेस मालिका, सिनेमे, वेबसिरीज यांतून आपण त्यांच्या कलाकृतींचा आस्वाद घेत असतो. पण हीच कलाकार व्यक्ती इतरत्र ही परफॉर्मन्स देत असते. प्रत्येक वेळी हा परफॉर्मन्स ऑनलाईन स्वरूपात दिसतोच असा नाही. पण त्याची गंमत मात्र तशीच असते जशी ऑनलाईन स्वरूपात बघायला मिळते. ही बाब खासकरून डान्स परफॉर्मन्सना लागू पडते. कारण टीव्ही वर विविध सोहळ्यांतून जबरदस्त डान्स परफॉर्मन्स करणारे कलाकार हे विविध ठिकाणी जाऊन तिथल्या मंचावर आपली कला सादर करत असतात. पण प्रत्येक ठिकाणी जाणं हे वेळेनुसार परवडणार नसतं. पण हेच परफॉर्मन्स पुढे ऑनलाईन बघायला मिळाले की आनंद होतो.

असाच आनंद आज आपल्या टीमला झाला. कारण आमच्या आवडत्या अभिनेत्री, नृत्यांगना असलेल्या मानसी नाईक यांचा एक (नेहमीप्रमाणे) अफलातून डान्स परफॉर्मन्स आम्हाला पाहायला मिळाला. बरं हा परफॉर्मन्स चार वर्षांपूर्वीचा असावा असा अंदाज आहे. पण त्यातील ऊर्जा आणि आनंद आजही कायम आहेत. त्यामुळे म्हंटलं आपल्या वाचकांना ही याविषयी थोडंसं कळलं तर ते ही हा परफॉर्मन्स बघू शकतील. हा परफॉर्मन्स एका समारंभाप्रसंगी केलेला आहे असं दिसून येतं. यात मानसी यांची एन्ट्री ही जबरदस्त असते. त्यात सुरुवातीला चार पाच मुलं येऊन काही डान्स स्टेप्स करतात. आपलं मनोरंजन होतं पण आपल्याला आतुरता असते ती मानसी यांनी मंचावर येण्याची. आणि जवळपास अर्ध्या मिनिटानंतर त्या प्रत्यक्ष स्टेज वर येतात. आपल्याला तर आनंद होतोच, पण समोर उपस्थित असलेले लोकं तर उत्साहाने उसळत असतात. आपल्या टीमने आजपर्यंत अनेक व्हिडियोज विषयी लेखन केलेलं आहे. पण आजपर्यंत एवढा जल्लोष कधी बघण्यात आला नव्हता. यावरून मानसी यांच्या लोकप्रियतेची कल्पना यावी.

अपेक्षेप्रमाणे मानसी या दाखल झाल्यापासून आपल्या नृत्याने संपूर्ण मंच व्यापून टाकतात. त्यांच्या डान्स स्टेप्स, त्यातील अदा यांमुळे परफॉर्मन्स अगदी धमाल होतो. तसेच मानसी यांची खासियत म्हणजे त्या प्रत्येक परफॉर्मन्स वेळी उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधतात. ते ही डान्स परफॉर्मन्स करत असताना. त्यामुळे आपसूकच त्यांचा परफॉर्मन्स प्रसिद्ध तर होतोच आणि लोकप्रिय सुदधा ठरतो. त्यात या व्हिडियोचं वैशिष्ट्य म्हणजे दोन उत्तम गाण्यांवर आपल्याला मानसी यांचा डान्स परफॉर्मन्स बघायला मिळतो. पहिलं गाणं हे टाईमपास चित्रपटातील ‘पहिल्या धारेच्या प्रेमाने’ हे आहे. त्यावर मानसी अशा जबरदस्त डान्स करतात की आपण त्या परफॉर्मन्स मध्ये कधी गुंगून जातो कळत नाही. पण हा तर फक्त अर्धा भाग असतो. पुढच्य गाण्यावरील परफॉर्मन्स तर अजून जबराट हिट ठरतो. हा परफॉर्मन्स असतो, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यावर.

आता हे गाणं आणि सादर करणाऱ्या आहेत मानसी नाईक म्हंटल्यावर काय विषय आहे का. धमाल, मजा, मस्ती आणि आनंद यांनी सगळं वातावरण भरून गेलेलं असतं. वर उल्लेख केल्याप्रमाणे चार वर्षे झाली तरी मानसी यांच्या परफॉर्मन्सची मोहिनी अजूनही आपल्या मनावर पडते. आपणही हा डान्स परफॉर्मन्स बघितला असेल तर आपल्यालाही पसंतीस पडला असेलच. पण आपण यदाकदाचित जर हा परफॉर्मन्स बघितला नसेल तर जरूर बघा. या परफॉर्मन्स मध्ये एवढी ऊर्जा आहे की आपण थकलेले जरी असाल तरी आपल्याल बरं वाटून जाईल. आपण या परफॉर्मन्सचा आनंद जरूर घ्याल आणि या लेखाचा आनंदही आपण घेतला असेल अशी अपेक्षा आहे.

मंडळी आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *