Breaking News
Home / मराठी तडका / ह्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री आता कश्या दिसतात, का य करतात पहा

ह्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री आता कश्या दिसतात, का य करतात पहा

अभिनय हि अशी एक कला आहे, जी सादर करण्याची गोडी लागली कि ती कधीही जात नाही. आपण अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना बघितलं असेल जे सदैव नवनवीन भूमिकांबद्दल उत्सुक असतात. असे कलाकार सतत विविध माध्यमांतून, विविध भूमिकांतून आपल्याला भेटत असतात. अशाच काही अभिनेत्रींबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत ज्यांनी अभिनयाची सुरुवात केली, त्यातील काही जणींनी तर त्यांच्या करियर मध्ये ब्रेक हि घेतला होता, पण अभिनयाच्या आवडीपाई पुन्हा विविध भूमिकांमार्फत प्रेक्षकांच्या भेटीस आल्या.

निवेदिता जोशी सराफ

निवेदिताजींना आपण प्रामुख्याने ओळखतो ते सिनेमातील भूमिकांसाठी. त्यांचा हा प्रवास बालकलाकार म्हणून सुरु झाला होता, ‘अपनापन’ या हिंदी चित्रपटाद्वारे. यात त्यांनी बालकलाकार म्हणून पदार्पण केलं होत. पुढे त्यांनी अशी हि बनवाबनवी, धूम धडाका, दे दणादण, थरथराट, आमच्या सारखे आम्हीच, आणि अशी कित्येक नावं घेता येतील अशा लोकप्रिय सिनेमांत काम केलं होतं.

पुढे विनोदाचे सम्राट अशोक सराफ यांच्यासोबत त्याचं लग्न झालं आणि त्यांनी करियरमधून थोडा ब्रेक घेतला. पण या ब्रेक मध्येही त्यांनी स्वतःचा साड्यांचा व्यवसाय सुरु केला. तसेच काही काळापूर्वी त्यांनी पुन्हा टेलीविजन वर प्रवेश केला आहे. सध्या त्यांची आसावरी हि व्यक्तिरेखा खूप गाजते आहे. त्यांनी अभिनयासोबतच त्यांचं स्वतःच यु ट्युब चनेल हि सुरु आहे, ‘Nivedita Saraf Reciepes’ या नावाने. नावाप्रमाणेच त्यांच्या हातच्या चविष्ठ रेसिपीज या चॅनेल वर बघायला मिळतात. तर अशा या हरहुन्नरी निवेदिताजींना टीम मराठी गप्पातर्फे शुभेच्छा !

वर्षा उसगावकर

मराठी सिनेविश्वातील एक सुप्रसिद्ध नायिका म्हणजे वर्षा उसगावकर. वर्षाजींना आपण ओळखतो ते मराठी – हिंदी मनोरंजन विश्वातील त्यांच्या अनेक विविध भूमिकांसाठी. त्यांनी विनोदी, गंभीर, नायिका, खलनायिका अशा अनेक भूमिका बजावल्या आहेत. त्यांचे लक्षात राहिलेले सिनेमे म्हणजे म्हणजे गंमत जंमत, अफलातून, हमाल दे धमाल आणि असे बरेच. काही वर्षांपूर्वी आलेल्या दुनियादारी या लोकप्रिय चित्रपटातही त्या होत्या. पण ती भूमिका गंभीर स्वरुपाची होती.

अभिनयासोबत त्यांनी ‘मराठी तारका’ या कार्यक्रमातहि भाग घेतला होता. सिनेमे, रंगमंचावर काम करताना त्यांनी आपल्या अभिनयाने छोटा पडदाही गाजवला होता. दहा वर्षांपूर्वी त्यांनी ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेत काम केलं होत. आणि त्या नंतर तब्बल दहा वर्षांनी त्या मालिका करताहेत. सध्या त्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून आपल्या भेटीस येत आहेत. येत्या काळातही त्यांच्या चाहत्यांना अनेक विविध भूमिकांतून वर्षाजी भेटत राहाव्यात आणि त्यांच्या कामाचा आलेख सतत चढता रहावा याच टीम मराठी गप्पाकडून शुभेच्छा !

अलका कुबल

अलका कुबल हे नाव म्हणजे महाराष्ट्रासाठी सुपरिचित असं नाव आहे. नटसम्राट सारख्या लोकप्रिय कलाकृतीचा त्या बालकलाकार म्हणून भाग होत्या. पुढे मराठी आणि इतरही भाषांत त्यांनी कामे केली. त्यांनी विविध भूमिका केल्या पण त्यातही त्यांच्या कौटुंबिक भूमिका खूप गाजल्या. माहेरची साडी हा तर आजही लक्षात असलेला सिनेमा. त्यांच्या या भूमिकांमुळे शहरांपासून ते अगदी खेड्यापाड्यातल्या प्रेक्षकांपर्यंत त्या पोहोचल्या आहेत.

अभिनयासोबतच त्यांनी निर्मिती क्षेत्रातही पदार्पण आधीच केलं होतं. नुकतीच, ‘काळूबाईच्या नावाने चांगभलं’ हि मालिका त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीस आणली आहे. या मालिकेच्या जश्या त्या निर्मात्या आहेत तशाच यातील काळूबाई देवीची मुख्य भूमिकाही त्या साकारत आहेत. लॉकडाऊन नंतर या मालिकेचं शुटींग चालू झालं पण आशालताजी वाबगावकर यांच्या निध नाने या पूर्ण युनिटला ध क्काच बसला आहे. यातून सावरून येत्या काळात हि मालिका लोकप्रिय व्हावी या मराठी गप्पाच्या टीम कडून शुभेच्छा !

सुकन्या मोने

सुकन्या मोने यांना आपण मालिका, सिनेमे, नाटक अशा विविध माध्यमांतून पाहिलं आहे. आभाळमाया, चूक भूल द्यावी घ्यावी, जुळून येती रेशीमगाठी, सरकारनामा, कुसुम मनोहर लेले, दुर्गा झाली गौरी या त्यांच्या काही गाजलेल्या कलाकृती. गेल्या काही काळात त्यांच्या प्रेमळ आई आणि सासू या पद्धतीच्या भूमिका गाजल्या आहेत.

सध्या ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेतील आई म्हणून त्या आपल्या समोर आल्या आहेत. मुलाने लवकरात लवकर लग्न करावं म्हणून पाठी लागणारी आई अशी गोड भूमिका यांत आहे.

अश्विनी भावे

अश्विनीजींना आपण ओळखतो ते त्यांच्या सिनेमा-नाटकांतील भूमिकांसाठी. पण याच बरोबर त्यांनी नाटक आणि टेलीविजनवरही काम केलं आहे. अभिनयाबरोबरच त्या उत्तम लेखिकाही आहेत. एका प्रथितयश वृत्तपत्रासाठी त्यांनी काही काळापूर्वी लेखनही केले होते. नुकत्याच ३२ वर्षे पूर्ण केलेल्या ‘अशी हि बनवाबनवी’ मध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती. त्यांनी मराठी सोबतच, हिंदी सिनेमातही काम केलं आहे. ‘हीना’, ‘पुरुष’ या त्यांच्या गाजलेल्या कलाकृती.

लग्नानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या होत्या. पण तरीही काही निवडक कलाकृतींतून त्या सतत आपल्याला भेटत आल्या आहेत. ‘द रायकर केस’, ‘मांजा’, ‘ध्यानीमनी’ हि काही उदाहरणं. अगदी अनलॉकच्या काळातही ‘माझं ऑनलाईन थिएटर’ या ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे भेटीस आल्या होत्या. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

रेणुका शहाणे

‘हम आपके हे कौन’ असं सिनेमाचं नाव म्हंटल्यानंतर काही नाव पट्टदिशी डोळ्यासमोर येतात. त्यातलं एक नाव म्हणजे रेणुका शहाणे. या सिनेमातला त्यांचा अंदाज हा अगदी लाजवाब होता. अभिनयासोबतच त्या उत्तम सूत्रसंचालिका आहेत. त्यांनी ‘सुरभी’ या त्या वेळेच्या प्रसिद्ध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अगदी उत्तम केले होते. या सुत्रासंचालनामुळे त्या घराघरात पोहोचल्या. तसेच सर्कस, इम्तिहान अशा प्रसिद्ध मालिकांमध्येही त्या झळकल्या होत्या. पुढे त्यांनी काही सिनेमे केले.

तसेच बदलत्या काळानुसार त्या आता वेबसिरीज आणि शॉर्ट फिल्म्सकडेही वळल्या आहेत. सायलेंट टाइज, एक कदम, व्हॉट द फोक्स हि त्यातील काही उदाहरणं. याचबरोबर अनेक कार्यक्रमात त्या जज च्या भूमिकेतूनही त्या भेटल्या आहेतच. येत्या काळातही त्यांच्या भूमिका असलेले सिनेमे, शॉर्ट फिल्म्स प्रेक्षकांच्या भेटीस येत राहतील यात शंका नाही. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी, मराठी गप्पाच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा !

ऐश्वर्या नारकर

महाश्वेता ते स्वामिनी असा ऐश्वर्याजींचा मोठा प्रवास आहे. यात त्यांनी नाटकं, सिनेमे, मालिका अशा विविध माध्यमांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. त्यांच्या अभिनय असलेल्या लोकप्रिय कलाकृती म्हणजे या सुखांनो या, समांतर, तिघी, ओळख, झुळूक, घे भरारी, सून लाडकी सासरची, गंध निशिगंधाचा. त्यांनी हिंदीतही काम केलं आहे. घर कि लक्ष्मी बेटीयां या मालिकेत त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती.

गेल्या काही काळापूर्वीपासून लोकांच्या भेटीस आलेल्या सोयरे सकळ या नाटकातही त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती. ज्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत. तसेच येत्या काळात त्यांची ‘श्रीमंता घरची सून’ हि मालिकाही प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हि मालिकाही त्यांच्या इतर मालिकांप्रमाणेच लोकप्रिय होईल यात शंका नाही. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा !

मृणाल कुलकर्णी

मराठी कलाकारांनी हिंदी मनोरंजन क्षेत्रातही काही अशा व्यक्तिरेखा साकारल्या आहेत ज्या आजही प्रेक्षकांच्या लक्षात असतात. सोनपरी हि त्यातलीच एक व्यक्तिरेखा. हि लोकप्रिय व्यक्तिरेखा निभावली होती मृणाल कुलकर्णी यांनी. त्यांच्या या प्रसिद्ध भूमिकेबरोबरच, अवंतिका ही भूमिकासुद्धा खूप गाजली. त्यांनी राजा शिवछत्रपती, फर्जंद, स्वामी, अशा मालिकांतून ऐतिहासिक भूमिका सुद्धा केल्या आहेत. तसेच अभिनयासोबतच गेल्या काही वर्षांपूर्वी त्या दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही उतरल्या होत्या.

या लॉकडाऊनमध्ये त्या लक्षात राहिल्या त्या एका प्रसिद्ध चहा ब्रँडच्या जाहिरातीत. त्या जाहिरातीत त्यांनी त्यांचे पती श्री. रुचिर कुलकर्णी यांच्या सोबत काम केलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमवेत एक फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला होता. त्यामुळे येत्या काळात त्यांची एखादी नवीन दर्जेदार कलाकृती बघायला मिळेल यात शंका नाही. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

प्रिया बेर्डे

प्रिया बेर्डे यांना आपण ओळखतो ते मराठी सिनेमांसाठी. त्यांचे अनेक सिनेमे गाजले. त्यात अशी हि बनवाबनवी, अफलातून, जत्रा, फुल ३ धमाल, अशा अनेक सिनेमांची नावे घेता येतील. काही काळापूर्वी त्यांचा रंपाट हा धमाल सिनेमाही येऊन गेला. यात त्यांनी फिल्मी आई अशी गंमतीशीर भूमिका यात बजावली होती. या सिनेमाचं वैशिष्ठ्य म्हणजे यात अभिनय या त्यांच्या मुलासोबत त्यांनी एकत्र काम केलं होतं.

प्रियाजी अभिनयासोबतच सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेतच. मनोरंजन क्षेत्रातील गरजू व्यक्तींना गेल्या काही काळात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत अन्नधान्याचे वाटप केले आहे. येत्या काळातही त्यांच्याकडून मनोरंजन विश्वात आणि सामाजिक क्षेत्रातही भरीव काम होईल यात शंका नाही. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *