नमस्कार वाचकहो ! आपण मराठी गप्पाच्या वैविध्यपूर्ण लेखांना देत असलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद. वाढत्या वाचकसंख्येमुळे मराठी गप्पाच्या टीमला नवनवीन विषय आपल्या भेटीस घेऊ येण्यासाठी प्रोत्साहन मिळत असते. आज पर्यंत आपण मराठी गप्पावरील लेखांतून अनेक मराठी अभिनेत्रींनी सुरू केलेले नवनवीन व्यवसाय या विषयी वाचलं असेलंच. आज आपण अशा एका अभिनेत्रीविषयी आणि त्यांच्या पती विषयी जाणून घेणार आहोत, जे व्यवसाय क्षेत्रातलं एक मोठ्ठं नाव आहे.
या अभिनेत्रीचं नाव आहे किशोरी गोडबोले. एक अष्टपैलू अभिनेत्री. गंभीर, विनोदी, चरित्र भूमिका अशा विविध प्रकारच्या भूमिकांतून त्यांनी सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलेलं आहे. तसेच विविध माध्यमांतून आणि दर्जेदार कालाकृतींमार्फत त्या सतत आपल्या समोर येत असतात. सध्या त्या ‘मेरे साई’ या लोकप्रिय मालिकेत बायजा माँ ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारत आहेत. तसेच नव्याने दाखल झालेल्या ‘कॉमेडी बिमेडी’ या हास्य कार्यक्रमातही त्या दिसून आल्या होत्या. याआधीही त्यांनी ‘फु बाई फु’ या गाजलेल्या कार्यक्रमातुन त्यांच्या विनोदी टायमिंग ने अनेक प्रहसनं गाजवली होती. तसेच त्यांची ‘मिर्सेस तेंडुलकर’ ही एका विनोदी मालिकेतील व्यक्तीरेखाही खूप प्रसिद्ध झाली होती. टिव्हीसोबतच त्यांनी सिनेमांतूनही विपुल प्रमाणात अभिनय केलेला आहे. तसेच अनेक जाहिरातींतूनही त्यांनी अभिनय केलेला आपण पाहिला आहेच.
कलाक्षेत्रातील एवढं व्यस्त वेळापत्रक असतानाही त्या आपल्या पतीला त्यांच्या व्यवसायात जमेल त्या प्रमाणे मदत करत असतात. त्यांचे पती म्हणजे सचिन गोडबोले. त्यांचं ‘गोडबोले स्टोअर्स’ हे दादर मध्ये असलं तरीही अगदी जगभर पसरलेल्या मराठी आणि भारतीय जनांमध्ये ते खूपच लोकप्रिय आहे. याचं कारण जेव्हा भारतीय नागरिक परदेशात वास्तव्य करतात, तेव्हा त्यांना भारतीय पदार्थ खाता येतातच असे नाही. खासकरून दिवाळी फराळ. त्यांची हीच गरज ओळखून सचिन यांनी परदेशात उत्तम दर्जाचा फराळ उपलब्ध होईल याची व्यवस्था गोडबोले स्टोअर्स मार्फत केली आणि त्यांचा हा व्यापार आज कित्येक वर्षे मोठ्या प्रमाणावर चालू आहे. जवळ जवळ १७६ देशांमध्ये हा फराळ ऑनलाईन पोहोचवला जातो. अनेक प्रथितयश वृत्तसंस्थानी वेळोवेळी आपल्या बातम्यांमधून त्यांचं कौतुक केलेलं आहे.
किशोरी आणि सचिन यांची मुलगी म्हणजे सई गोडबोले. ती सध्या ‘व्हिसलिंग वुडस इंटरनॅशनल’ मधून अभिनयाचं प्रशिक्षण घेते आहे. तसेच तिचं स्वतःचं एक युट्युब चॅनेल ही आहे. काही काळापूर्वी या चॅनेलच्या माध्यमांतून तिने गोडबोले स्टोअर्सचं काम कसं चालतं याचा एक व्हिडियो बनवला होता. त्यावरून त्यांच्या कामाची व्याप्ती आणि नावीन्य याची हलकीशी झलक मिळते. अगदी त्या व्हिडियो च्या शेवटी शेवटी दाखवलेली अस्ट्रोनॉट फूड ही संकल्पना तर एकदम भारी वाटली. आम्ही व्हिडीओ खाली देत आहोत. नक्की पाहून घ्या. एकूणच गोडबोले कुटुंबीय हे सातत्याने वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार काम करताना आपल्याला दिसतं. मग ते काम कलाक्षेत्रातील असो वा व्यवसायातील. मराठी गप्पाच्या टीमकडून किशोरीजी, सचिनजी आणि सई यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
गोडबोले स्टोअर्स चं काम कसं चालतं, बघा व्हिडीओ :